सध्या अनेक कुटुंबातील मुली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या मागे धावताना वयाची पंचविशी गाठतात. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे वय वाढत गेल्याने तिशीनंतर बऱ्याच महिला गर्भधारणेचा विचार करतात. उशीराने आई होताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तिशीनंतर जर महिला आई होण्याचे स्वप्न पाहत असतील तर त्यांनी नेमकं काय करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांशी नक्कीच संवाद साधायला हवा. अशीच काही महत्त्वाची माहिती आम्ही घेतली आहे डॉ. रितू हिंदूजा, फर्टिलिटी कन्सल्टंट नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांच्याकडून. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीची इच्छा आहे. आई होण्याच्या या प्रवासात महिलेचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. प्रत्येक जोडप्यांसाठी पालक होऊन एका नवीन जीवाला जन्म देणं हे एक स्वप्न असतं. परंतु, काळाच्या ओघात करिअर, उशीरा विवाह, आर्थिक अस्थिरता आणि आरोग्याच्या विविध समस्या यामुळे अनेक जोडपी ठरवून गर्भधारणा पुढे ढकलतात. त्यामुळे जर आपण वयाच्या तिशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर अशा महिलांना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वाढत्या वयात गर्भधारणा झाल्यास अनेक समस्या उद्भव शकतात. म्हणून उशीरा गर्भधारणेचा विचार करत असाल तर डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे.
गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर
उशीरा गर्भधारणेचा विचार करणं योग्य किंवा अयोग्य?
Shutterstock
1. आता अनेक महिला करिअरकडे विशेष प्राधान्य दिल्यानंतर योग्य वेळेचे नियोजन करून मगच गर्भधारणेचा निर्णय घेतात. याशिवाय बहुतांश जोडपी आर्थिक स्थिरता आणि एखाद्या मुलाची जबाबदारी आपण स्वीकारू शकतो का? याचा विचार करून मुलाला जन्म द्यायचा की नाही हे ठरवतात. वाढत्या वयानुसार गर्भाशयात तयार होणाऱ्या बिजांची संख्या कमी होते. अशावेळी ३० व्या वयात गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणूनच एखाद्या जोडप्याला विवाहानंतर गर्भधारणा पुढे ढकलायची असल्यास फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
2. ऑटोइम्युनिटी डिसऑर्डर या विकाराने पिडित महिला गर्भधारणेची योजना पुढे ढकलत असेल तर अशा महिला आपले स्त्री-बीज फ्रिजिंग करून ठेवू शकतात. कारण ऑटोइम्युनिटीमुळे महिलेच्या अंडाशयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे अंडाशयातील अंडी तयार होण्याची संख्या घटू शकते. याशिवाय महिलेला कर्करोग किंवा हायपरथायरॉईडीझम यांसारखे आजार उद्भवू शकतात. मुळात, उपचार सुरू असताना एखादी महिला गर्भवती राहिल्यास तिच्या गर्भातील बाळावर या औषधांचा परिणाम होऊ शकतो. या महिला अनेक वर्षांपासून उपचार घेत असल्याने गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यामुळे अशा त्रास असलेल्या महिलांनी उपचार सुरू करण्यापूर्वी अंडी फ्रिजिंग करण्यासाठी ठेवावीत.
3. कोणतीही स्त्री स्वतःची स्त्री-बीज(अंडी) फ्रिझ करून ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. जर महिला विवाहित असल्यास तिचे स्त्री-बीज आणि पुरूषांचे शुक्राणू फ्रिजिंगसाठी ठेवता येऊ शकतात. जर महिला अविवाहित असल्यास ती फक्त स्वतःचे स्त्री-बीज फ्रिझ करू शकते.
प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान म्हणजे काय, गर्भधारणेसाठी उपयुक्त
4. कोणतीही स्त्री वेळेत आपली प्रजनन क्षमता गोठवण्याची योजना आखू शकते, जर तिचे लग्न झाले असेल तर ती तिचे गर्भ (गर्भा = अंडे + शुक्राणू) किंवा ती अविवाहित असेल तर तिचे ऑयोसाइट्स (अंडी) क्रायोप्रीझर (गोठवणे) निवडू शकते. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त महिलांनी नंतरच्या वेळेस गर्भधारणेची योजना आखली पाहिजे कारण एंडोमेट्रिओसिस ही अशी स्थिती आहे जी काळानुसार वाढत जाते, म्हणूनच आपण अविवाहित नसल्यास आधीच्यापेक्षा गर्भधारणा करणे योग्य ठरेल.
5. महिलांना असलेल्या अनेक आरोग्या समस्यांपैकी एंडोमेट्रिओसिस ही एक आरोग्य समस्या आहे. या समस्येनं पिडित महिलांनी गर्भधारणेची योजना पुढे ढकलली पाहिजे. कारण एंडोमेट्रिओसिस हा आजार काळानुसार वाढत जातो. यावर योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.
6. तुम्ही गर्भधारणा पुढे ढकलत असाल तर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ३५ वर्षाहून अधिक वयाच्या आणि पहिल्यांदाच गर्भवती महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा महिलांना गर्भारपणात मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणा पुढे ढकलण्याचा विचार करण्यापूर्वी जोडप्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कृपया लक्षात ठेवा की केवळ मुलं जन्माला घ्यालण्यासाठीच नव्हेतर मुलाला जन्म दिल्यानंतरही महिलेचे आरोग्य तंदुरूस्त राहणे गरजेचं आहे. त्यामुळे गर्भवती राहण्याचे नियोजन विवाहानंतर लगेचच केले पाहिजे.
7. एका नाण्याच्या नेहमीच दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक जोडप्याने तिशीनंतर कुटुंब नियोजनाचा विचार करताना यामुळे होणारे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं आहे. फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक