ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How To Increase Stamina In Marathi

स्टॅमिना कसा वाढवायचा आपल्या जेवणात हे आहार समाविष्ट करून (Stamina Vadhavnyache Upay In Marathi)

थोडं चालल्यानंतरसुद्धा अथवा जिने चढताना तुम्हाला थकायला होत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कारण अशी समस्या ही शरीरातील स्टॅमिना कमी होण्यामुळे निर्माण होत असते. स्टॅमिना आणि ताकद हे काही प्रमाणात एकच असं आपण समजू. चांगल्या आरोग्यासाठी चांगला स्टॅमिना असणंही गरजेचं आहे. तुमच्यामध्ये स्टॅमिना नसेल तर जिममध्ये घाम गाळल्याने, सकाळी तासभर धावल्याने अथवा मॉर्निंग वॉक केल्याने काहीही फरक पडणार नाही. पण त्यासाठी घाबरून जाण्याचीही गरज नाही. आम्ही तुम्हाला स्टॅमिना वाढवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची मदत होईल. तुम्ही स्वतःला अधिक उत्साही आणि तजेलदार बनवू शकाल.

स्टॅमिना म्हणजे काय? (What Is Stamina In Marathi)

स्टॅमिना अर्थात अंतर्गत बळ. साधारण शब्दात सांगायचं झालं तर स्टॅमिनाचा अर्थ आहे कोणत्याही व्यक्तीद्वारे कोणतंही काम कितीही वेळ लागला तरीही पूर्ण करण्याची मानसिक अथवा शारीरिक ताकद. वास्तविक रोजच्या आयुष्यात खेळ, व्यायाम, पायी चालणं, दैनिक गोष्टींसाठी अथवा मेहनतीच्या कामात स्टॅमिना हा शब्द वापरण्यात येतो.

स्टॅमिना कमी असण्याचं कारण (What Decreases Stamina In Marathi)

दैनंदिन जीवनात थोडासा थकवा येणं हे साहजिक आहे पण तुम्हाला सतत थकवा येत असेल तर तुमचं शरीर खूपच कमकुवत असू शकतं. शरीरामध्ये स्टॅमिना कमी होण्यासाछी एकच नाही तर अनेक कारणं आहेत. तुमच्या शरीरामध्ये कोणत्या कारणांमुळे कमतरता आणि थकवा निर्माण होतो याची कारणं जाणून घेऊया –

झोपेची कमतरता (Lack Of Sleep)

Food to increase stamina in marathi

तुम्ही दर दिवशी 7 ते 8 तास झोप घेत नसाल तर, तुमच्या शरीरातील ताकद हळूहळू कमी होत जाते आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही.

ADVERTISEMENT

कमी पाणी पिणं (Drink Less Water)

बऱ्याचदा शरीरात कमी पाणी असल्यामुळेदेखील स्टॅमिना कमी होतो. आपल्या शरीरामध्ये 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तरीही थोड्या थोड्या वेळाने आपल्या शरीराला पाण्याची गरज भासते. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाणी प्राप्त न झाल्यास, स्टॅमिना कमी होणं साहजिक आहे.

कार्बोहायड्रेटची कमतरता (Carbohydrate Deficiency)

बरचसे लोक डाएटिंगच्या मागे लागून कार्बोहायड्रेट आपल्या जेवणात घेणं पूर्णच बंद करून टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कार्बोहायड्रेट घेतल्यामुळे शरीराला सर्वात जास्त एनर्जी मिळत असते. तुम्ही जर जिम अथवा फिटनेस वर्कआऊट करत असाल तर तुमच्या शरीराला जास्त कार्बोहायड्रेटची गरज भासते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यात कार्बोहायड्रेटची मात्रा संतुलित ठेवणं आवश्यक आहे.

वाचा – चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही

शरीरात स्टॅमिना कमी होण्याची लक्षणं (Symptoms Of Low Stamina In Marathi)

– मेहनतीशिवाय अंगातून घाम येणं

ADVERTISEMENT

भूक न लागणं

– प्रत्येकवेळी थकवा जाणवणं

– चक्कर येणं

– डोळ्यांसमोर कधी कधी काळोखी येणं

ADVERTISEMENT

– कोणत्याही कामात लक्ष न लागणं

– हातापायात सतत दुखणं

– झोप न येणं

स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करावे? (How To Increase Stamina Naturally In Marathi)

स्टॅमिना वाढवण्याचा अर्थ आहे शरीरातील कमतरता दूर करणं. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपात तुम्ही स्वतःला मजबूत करायला हवं जेणेकरून तुम्ही जे काम कराल ते कोणत्याही थकव्याशिवाय आणि न दमता पूर्ण करू शकाल. तसं तर बाजारामध्ये अनेक विटामिन्स आणि सप्लिमेंट्स आरामात मिळतात ज्यामुळे शरीराचा स्टॅमिना आणि एनर्जी वाढते. पण तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचा स्टॅमिना वाढवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही योग्य पद्धती आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय (stamina vadhavnyache upay in marathi) सांगतो. ज्याचा वापर करून तुम्ही स्टॅमिना वाढवू शकता.

ADVERTISEMENT

तणावापासून दूर राहा (Stay Away From Stress)

आताच्या धावपळीत तणाव सतत येत असतो हे सर्वांनाच पटेल. प्रत्येक दुसरा माणूस तणावग्रस्त असल्याचं सांगत असतो. तणाव तुमच्या शरीर आणि मनावर अतिशय वाईट परिणाम करत असतो. त्यामुळे तणावापासून जितकं दूर राहाता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रोज मॉर्निंग वॉक करा. चांगलं संगीत ऐका आणि योगा करा. काही दिवसांतच तुम्हाला तुमचा उत्साह वाढलेला दिसून येईल.

कमी साखर खा (Avoid Sugar)

साखर तुमची थोड्या वेळासाठी एनर्जी वाढवू शकते. पण याचा परिणाम लवकर संपतो. असं म्हटलं जातं की, साखरेच्या स्तरातील चढउतारामुळेच तुमच्या शरीरातील एनर्जीचा स्तर कमी होत असतो. हे तुमच्या शरीरासाठी अतिशय वाईट आहे. त्यामुळे साखरेपासून जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करा. तुम्हाला गोड खावंसं वाटत असेल तर नैसर्गिक गोड पदार्थ खा.

भरपूर झोप घ्या (Get Plenty Of Sleep)

बऱ्याच लोकांना कामापुढे झोपायला वेळ मिळत नाही. पण असं करू नका. झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. एका रिसर्चनुसार, 20 ते 30 टक्के लोकांना पूर्ण झोप मिळत नाही. त्यामुळे दिवसभर त्यांना थकवा वाटत राहातो. त्यामुळे रोज किमान 7 ते 8 तास झोप पूर्ण करा.

व्यायाम करा (Exercise)

Priyanka Chopra Fitness 4

रोज व्यायाम केल्यामुळे सुस्तपणा आणि आळस शरीरामध्ये राहात नाही. तसंच तुम्ही हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर आजारांपासून सुरक्षित राहाता. एका रिसर्चनुसार, तुम्ही जर रोज 10 मिनिट्स व्यायाम केलात तर तुमच्या एनर्जीचा स्तर वाढतो. त्यामुळे रोजच्या रोज वर्कआऊट करणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

वाचा – वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावं (Foods That Increase Stamina And Energy In Marathi)

food for stamina

स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटामिन सी, आयर्न आणि अन्य पोषक तत्वांची आवश्यकता असते. आम्ही तुम्हाला इथे काही असा आहार सांगणार आहोत, ज्याचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवू शकता. जाणून घेऊया असं काही खाद्यपदार्थ ज्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो –

बदाम (Almond)

स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि शरीरातील कमतरता दूर ठेवण्यासाठी बदाम खूपच फायदेशीर असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक मूठभर बदाम आणि काळे चणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी काळे चणे आणि बदाम खा. काही दिवसातच तुमचा थकवा निघून जाईल.

ओट्स (Oats)

तुम्ही जर ओट्स खात असाल तर यामुळे तुमचा सुस्तपणा आणि थकवा निघून जाईल. हो हे खरं आहे. ओट्स हळूहळू पचतात त्यामुळे रात्रीपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहाते. यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीराचा स्टॅमिना योग्य राखतो.

ADVERTISEMENT

बीट (Beet)

बीटरूटमध्ये विटामिन ए आणि सी चं प्रमाण भरपूर असतं. जे थकवा घालवण्यासाठी फायदेशीर असतं. वर्कआऊट करण्याऱ्यांनी रोज बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे शरीरातील स्टॅमिना टिकून राहातो.

अक्रोड (Walnut) 

अक्रोड खाणं तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी खूपच फायदेशीर आहे. रोज अक्रोड खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलस्ट्रॉल कमी होतो आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत होते.

दूध, दही (Milk, Dahi)

दूध आणि दही यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं आणि दातांना मजबूत करतं. शरीर योग्य तऱ्हेने काम करण्यासाठी दूध आणि दह्याचं सेवन करणं आवश्यक आहे.

केळं (Banana)

केळं तुमच्या शरीराला एनर्जी देतं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं, जे शरीराला साखरेशिवाय एनर्जी देतं. महिलांसाठी केळं खाणं जास्त फायदेशीर आहे कारण त्यामुळे हाडं मजबूत होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केळं खाणाऱ्या लोकांची एनर्जी ही अन्य लोकांच्या तुलनेपेक्षा अधिक असते.

ADVERTISEMENT

मूगडाळ (Peanut)

मूगडाळ खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी होते. मूगडाळीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, हे शरीराला चांगली एनर्जी मिळवून देते. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर आजारी व्यक्तींना त्यांच्यातील कमजोरी दूर करण्यासाठी मूगडाळ खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते.

टरबूज (Watermelon)

यामध्ये पाणी आणि इलेक्‍ट्रोलाइट्सचं चांगलं प्रमाण असतं. जे खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहातं. टरबूज खाल्ल्याने लगेच एनर्जी मिळते. उन्हाळ्यात टरबूज खाणं हे उत्कृष्ट समजलं जातं.

रताळं (Soaked)

रताळ्याला एनर्जीची पेटी म्हटलं जातं. यामध्ये असणारी पोषक तत्व आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. आयर्नच्या कमीमुळे आपल्या शरीरात एनर्जी राहात नाही. तसंच रोगप्रतिरोधक क्षमतेवर परिणाम होतो आणि ब्लड सेल्सदेखील नीट निर्माण होत नाहीत. पण  रताळं आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

पालक (Parents)

पालकदेखील भरपूर एनर्जीचा स्रोत मानला जातो. पालकमध्ये आयर्नशिवाय अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या पूर्ण दिवस एनर्जी राखण्यासाठी मदतशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या जेवणात पालक या भाजीचा समावेश असणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

वाचा – प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या

स्टॅमिना वाढवण्यासाठी काही योग टिप्स (Yoga Tips To Increase Stamina)

yoga for stamina

तसं तर रोज चालण्याने आणि स्पोर्ट्स खेळल्यानेदेखील स्टॅमिना टिकून राहातो. पण तुम्हाला जर अधिक चांगला परिणाम हवा असेल तर तुम्ही रोज योगा करू शकता. योग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा तिन्हीचं संतुलन होतं. यामुळे शरीर निरोगी राहातं आणि शरीराच्या रोगांपासून मुक्ती मिळते. योगामुळे थकवा आणि तणाव दोन्ही दूर होण्यास मदत होते. योगासन केल्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढवता येतो. योग गुरू बाबा रामदेवद्वारे सांगण्यात आलेली ही तीन योगासनं कमी वेळात चांगला परिणाम दाखवून देऊ शकतात –

भुजंगासन (Bhujangasan)

या आसनाला कोब्रा पोझ असंही म्हटलं जातं. शरीराच्या पुढच्या भागाला या आसनात कोब्राच्या फण्याप्रमाणे उचलायचं असतं. भुजंगासन करण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. यामुळे वजन नियंत्रणात राहातं आणि शरीराचा स्टॅमिनादेखील योग्य राहतो.

धनुरासन (Sagittarius)

या आसनामध्ये शरीर एकमद धनुष्याप्रमाणे दिसतं. त्यामुळेच याला धनुरासन असं म्हटलं जातं. धनुरासन केल्यामुळे शरीरामध्ये उत्साह आणि एनर्जी चांगली राहाते. तसंच या आसनाचे अनेक लाभही शरीरासाठी होतात.

ADVERTISEMENT

पश्चिमोत्तासन (Westward)

हे आसन सुरुवातील करणं थोडं कठीण आहे. पण रोज करायला लागल्यानंतर तुम्हाला ते जमू शकतं. या आसनामुळे तुमच्या तणावाच्या जीवनशैलीतून तुमची सुटका होऊन नवा उत्साह येतो. तुम्ही स्वतःच स्वतःला एनर्जेटिक असल्याचं दिसू लागेल.

स्टॅमिना वाढवण्यासाठी लक्षात ठेवा काही मुख्य गोष्टी (Key Things To Keep In Mind)

  • स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात पहिले गरजेचं आहे ते म्हणजे आपली लाईफस्टाईल योग्य करणं. रोज सकाळी वेळेवर उठणं, व्यायाम करणं, योग्य डाएट फॉलो करणं, पौष्टीक आहार घेणं आणि वेळेवर झोपण्याची सवय लाऊन घेणं
  • शरीर एखाद्या गोष्टीचा दबाव जाणवून घेईल इतकं ओझं घेऊ नका. तुम्हाला जमेल तितकंच काम करा. कामाचं लोड घेऊ नका
  • रोज सकाळी फिरायला जा आणि लक्षात ठेवा की, धावण्यापूर्वी कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्यायला हवं स्टॅमिना वाढवण्याच्या मागे शारीरिक क्षमता किती आहे ते विसरू नका. तुम्हाला सोप्या असतील अशाचा व्यायामांची निवड करा
  • आपल्या आहारात योग्य धान्य आणि फायबरयुक्त आहाराचा समावेश करून घ्या
  • दारू, सिगारेट आणि तंबाखूसारख्या वाईट सवयींपासून दूर राहा. यामुळे तुमचं शरीर अधिक कमकुवत होतं तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. वजन कमी अथवा जास्त असल्यास स्टॅमिनावर परिणाम होत असतो

स्टॅमिनाबद्दल विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं FAQS

FAQ

1. स्टॅमिना वाढवण्यासाठी दुधीच्या बिया खाऊ शकतो का?

हो. दुधीच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात विटामिन्स, प्रोटीन आणि फॅटी अॅसिड असतं जे शरीराला एनर्जी मिळवून देतं आणि शरीरातील थकवा दूर करतं.

2. स्टॅमिना हा सेक्स पॉवरशी निगडीत आहे का?

स्टॅमिना म्हणजे अंतर्गत बळ, ज्याच्या मदतीने आपण न थकता जास्त वेळ काम करू शकतो. स्टॅमिना तुमच्या शरीरातील ऊर्जा आहे जी कोणतंही काम पूर्ण करू शकते. केवळ सेक्स पॉवरशी याचा संबंध नाही. अर्थात सेक्समध्येही स्टॅमिना महत्त्वाचा असतो.

3. एनर्जी ड्रिंक प्यायल्यामुळे नुकसान होतं का?

आज 50 टक्के तरूणाई एनर्जी ड्रिंक पिण्याला प्राधान्य देत आहे. एनर्जी ड्रिंक कॅफीन आणि साखरयुक्त असतं. हे प्यायल्याने काही काही एनर्जी वाटते. पण हे प्यायल्याने तुम्हाला खूप झोपही येते हे त्याचं नुकसान आहे.

ADVERTISEMENT

4. पोळी खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो का?

हो धान्यामुळे स्टॅमिना वाढतो. गव्हाच्या पोळीमुळे अथवा गव्हाने बनलेले पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणात समाविष्ट करून घ्या. यामुळे स्टॅमिना वाढवायला मदत होते.

5. घरी एनर्जी ड्रिंक कसं बनवयाचं?

यासाठी तुम्हाला एक कप पालक, एक कप कापलेलं सफरचंद आणि तीन चमचे लिंबू आणि एक अननस घ्यावं लागले. हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या आणि थंड करून एनर्जी ड्रिंक म्हणून पिऊ शकता.

20 Apr 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT