ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

घरी स्वतःचा मेकअप करण्याची अथवा मेकअप कीट खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा अनेकजणी संभ्रमात पडतात. कारण बऱ्याचजणींना मेकअप करण्याचं ज्ञान नसतं. पण प्रत्येकीला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी नवीन करावं असं नक्कीच वाटत असतं. तुम्हाला स्वतःचा मेकअप स्वतःच करता यावा यासाठी आम्ही तुम्हाला काही मेकअप टीप्स देणार आहोत. कमी वेळात, स्वस्तात आणि अगदी साजेसा मेकअप करण्यासाठी या मेकअप टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. मेकअप करण्याआधीच प्रत्येकीला या मेकअप टीप्स माहित असणं फार गरजेचं आहे. शिवाय या सर्व टीप्स आम्ही आधी करुन पाहिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्या अगदी निर्धास्तपणे करू शकता.आम्ही या मेकअप टीपचे काही व्हिडीओदेखील शेअर करत आहोत.मेकअप करण्यापूर्वी हे व्हिडीओ पाहायला मुळीच विसरू नका.

the-best-makeup-hacks-skin-hair %281%29 marathi

यासाठी जाणून घ्या जीवनात आमुलाग्र बदल करण्याऱ्या या मेकअप टीप्स.

डोळ्यांसाठी मेकअप करताना…

ADVERTISEMENT

कोणतंही पेन्सिल आयलायनर तुम्ही जेल लायनर म्हणून वापरू शकता

जर तुमच्याकडे जेल आयलायनर संपलं असेल तर काळजी करू नका. कारण लगेच जेल आयलायनर खरेदी करण्यासाठी तुम्हाला कॉस्टेमेटिक्सच्या दुकानात जाण्याची गरज नाही. आम्ही दिलेली ही टीप तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरेल. तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही आयलायनर पेन्सिलच्या टोकाला अगदी काही सेंकद लाईटर अथवा मेणबत्तीच्या ज्योतीवर धरा.आता त्या टोकाला स्पर्श करून ते फार गरम नाही याची काळजी घ्या. ही तुमची साधी आयलायनर पेन्सिल आता तुम्ही जेल आयलाईनर प्रमाणे वापरू शकता. आहे की नाही अगदी  मजेशीर आणि उपयुक्त मेकअप टीप.

Also Read Primer For Dry Skin In Marathi

हलक्या रंगाच्या आयशॅडोसाठी व्हाईट आयलायनरचा आयशॅडोचा बेस म्हणून वापर करा

ADVERTISEMENT

बऱ्याचदा हलक्या रंगाचे अथवा पेस्टल कलरच्या आयशॅडो उठून दिसत नाहीत. यासाठी डोळ्यांचा मेकअप करताना आधी पापणीवर व्हाईट आयलायनरचा बेस द्या आणि मग तुम्हाला हवी ती आयशॅडो डोळ्यांवर लावा. यामुळे तुम्हाला ब्राईट कलरचा अनुभव मिळेल.

तुमच्या डोळ्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी व्हाईट आयलायनरचा वापर करा

हॅंग ओव्हर, अपूरी झोप यामुळे तुमचे डोळे थकलेले आणि निस्तेज दिसू लागतात. जेव्हा तुम्हाला अशा प्रसंगाना सामोरं जावं लागतं तेव्हा आमची ही टीप तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. फक्त तुमच्या डोळ्यांच्या कडांवर व्हाईट आयलायनर लावा आणि तुमचा लुक बदला.

मस्कारा आयनायनर सारखा वापरा
जर तुम्ही आयलायनर कॅरी करण्यास विसरला असाल तर काळजी करू नका. तुम्ही तुमचा मस्कारा देखील आयलायनर प्रमाणे वापरू शकता. मस्काराच्या ब्रशमधील एखाद्या चांगलं टोक किंवा क्यू टीप घ्या आणि तुमच्या डोळ्यांवर लायनरसारखं वापरा.

ADVERTISEMENT

जुन्या अथवा सुकलेल्या जेल आयलायनरला फेशिअल तेलाने पूर्ववत करा

तुमचं जेल आयलायनर सुकलं आहे का? काहिच हरकत नाही. कारण तुम्ही तुमच्या लायनरमध्ये काही थेंब एखादं फेशिअल अथवा बेबी ऑईल टाकलेत आणि काही मिनीट ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवलंत तर ते पुन्हा पूर्ववत होईल. वितळलेलं आयलायनर फक्त चांगलं व्यवस्थित मिक्स करायला विसरू नका. थंड झाल्यावर ते जेल आयलायनरसारखं वापरा.

Also Read: Best Concealer For Your Skin Type In Marathi

स्मोकी आईज मेकअप करताना

ADVERTISEMENT

परफेक्ट स्मोकी आईज करण्यासाठी तुमच्या डोळ्यांच्या कडांवर हॅशटॅग काढा. पण लक्षात ठेवा # हॅशटॅगचे हे चिन्ह तुमच्या पापण्यांपेक्षा मोठे नसावे. त्यानंतर तुमच्या बोटांनी अथवा ब्रशने ते व्यवस्थित ब्लेंड करा. आता  बघा तुम्हालाच तुमच्या या कौशल्यावर कौतुक वाटायला लागेल.

मस्कारा वापरताना तुमच्या पापण्यांवर चमचा ठेवा

जर तुमचे डोळे लहान आकारचे असतील तर मस्कारा लावल्यावर तो तुमच्या पापण्यांना लागण्याची  शक्यता अधिक असते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मस्कारा लावताना चमचा तुमच्या पापण्यांवर ठेऊ शकता. ज्यामुळे मस्करा पापण्यांवर न लागता चमच्यावर पसलेल.

सुकलेला मस्कारा पूर्ववत करा

ADVERTISEMENT

जर तुमचा मस्कारा सुकला असेल तर त्यामध्ये काही थेंब लेंस सोल्यूशन टाका. ज्यामुळे तुम्ही तो आणखी काही दिवस वापरू शकता. तसंच गरम पाण्याच्या ग्लासमध्ये काही वेळ मस्कारा बुडवून ठेवा. ज्यामुळेदेखील मस्करा सोल्यूशन गरम होऊन पुन्हा वापरण्यासाठी तयार होईल.

इंन्स्टंट आयलॅश लिफ्ट करण्यासाठी

ब्लो ड्रायरवर तुमचं आयलायनर कर्लर काही वेळ गरम करा आणि तुमचे आयलॅशेस कर्ल करा. हेअर ड्रायरच्या हीटमुळे तुमचे लॅशेसनां परफेक्ट आकार मिळेल.

फोडलेल्या ओठांसाठी ओठांच्या मलम विषयी देखील वाचा

ADVERTISEMENT

तुमचे आयलॅशेस आकर्षक दिसण्यासाठी

तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बेबी पावडर लावा. मस्काराच्या दोन कोटमध्ये ही पावडर लावा. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या पापण्यांचा लुक मिळेल.

डोळ्यांखाली कन्सिलर लावताना त्रिकोण काढा

डोळ्यांच्या खाली कन्सिलर लावताना ते त्रिकोणी आकारात लावा. ज्यामुळे तुमची डार्क सर्कल्स झाकली जातील. या टीपमुळे तुमचा चेहरा एकसमान दिसू लागेल.

ADVERTISEMENT

डार्क सर्कल झाकण्यासाठी लिपस्टिकचा वापर करा

मेकअप करताना तुमच्याकडे डार्क सर्कल लपविण्यासाठी करेक्टर उपलब्ध नसेल तर काहीच काळजी करू नका. कारण यासाठी तुम्ही तुमच्याकडची लाल अथवा ऑरेंज लिपस्टिकदेखील तुम्ही वापरू शकता. लिपस्टिक लावा आणि त्यावर फाऊंडेशन अथवा कन्सिलर लावा. तुमच्या बोटांनी ते व्यवस्थित ब्लेंड करा. रेड आणि ऑरेंज कलर नैसर्गिक रंग असल्याने त्यामुळे तुमचे डार्क सर्कल झाकले जातात.

आयब्रो शेजारी कन्सिलर लावा

मेकअप करताना जेव्हा तुम्हाला तुमच्या भुवया उठावदार दिसाव्या असं वाटत असतं. तेव्हा या टेक्नीकचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. भुवयांंच्या शेजारी कन्सिलरचा एक पातळ थर लावा आणि ते चांगलं ब्लेंड करा.ज्यामुळे तुमच्या भुवया पटकन सर्वांचं लक्ष वेधतील. जेव्हा तुम्हाला थ्रेडींग करायला वेळ नसतो तेव्हा तुमच्या भुवयांशेजारील वाढलेले केस लपविण्यासाठीदेखील ही युक्ती नक्कीच कामी येईल.

ADVERTISEMENT

 

आयब्रो  उठावदार करण्यासाठी त्यावर पावडर लावा

डार्क ब्राऊन आयशॅडो अथवा पावडर ब्रो प्रॉडक्टमुळे तुमच्या भुवया लांब आणि उठावदार दिसू शकतात.

ओठांचा मेकअप करताना…

ADVERTISEMENT

ओठ आकर्षक दिसण्यासाठी

मेकअप करताना ओठांवर लिपस्टिक लावल्यावरच तुमचा चेहरा खऱ्या अर्थाने आकर्षक दिसू लागतो. यासाठी वरच्या ओठांवर लिप लायनरने आऊटलाईन काढा. लक्षात ठेवा तुम्ही वापरत असलेल्या लिपस्टिकपेक्षा लिप लायनर एक शेड हलक्या रंगाची असावी. त्यानंतर तुमची लिपस्टिक त्या आऊटलाईनच्या आतल्या भागात व्यवस्थित लावा. आऊटलाईनमुळे तुमचे ओठ लांब आणि उठावदार दिसू लागतील. अधिक चांगल्या इफेक्टसाठी तुम्ही थोडं लिप ग्लॉसदेखील ओठाच्या मध्यभागी डीप करू शकता.

तुमची लिपस्टिक जास्त वेळ टिकण्यासाठी

the-best-makeup-hacks-skin-hair %283%29 marathi

ADVERTISEMENT

आजकाल बाजारात अनेक लास्ट लॉंगर लिपस्टिक उपलब्ध असतात. पण तुमच्याकडे असलेली कोणतीही लिपस्टिक आता तुम्ही जास्त वेळ ओठांवर टिकवू शकता. यासाठी लिपस्टिक लावल्यावर टिश्यू पेपर त्यावर डॅब करा. मग पुन्हा लिपस्टिकचा एक लेअर लावा आणि पुन्हा डॅब करा.असं काहीवेळा केलंत तर तुमची लिपस्टिक खूप वेळ टिकेल. तुम्ही यासाठी आणखी एक युक्ती करू शकता. लिपस्टिक लावल्यावर टिश्यूचा पातळ तुकडा ओठांवर ठेवा आणि त्यावर पावडर लावा. टिश्यू पेपरमधून पावडर तुमच्या ओठांवर शोषली जाईल ज्यामुळे लिपस्टिक जास्त वेळ टिकेल.

नवीन रंगाची लिपस्टिक तयार करा

तुम्ही तुमच्याकडील आयशॅडो लिपस्टिकमध्ये मिसळून एक वेगळ्याच रंगाची लिपस्टिक तयार करू शकता. यासाठी थोडं वॅसलिन त्यामध्ये मिसळा. मॅटॅलिक फिनिश लिपस्टिक तयार करण्यासाठी त्यात मॅटॅलिक आयशॅडो वापरा.

फेशिअल ऑईलचा लिप बामसारखा वापर करा

ADVERTISEMENT

लिक्वीड अथवा मॅट फिनिश लिपस्टिक लावण्यासाठी काही थेंब फेशिअल ऑईल ओठांवर वापरा. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि ओलसर राहतीलच शिवाय तुमची लिपस्टिकदेखील स्मूथ होईल.

लिपस्टिक पसरल्यावर ओठांच्याशेजारी कन्सिलर लावा.

लिपस्टिकचा एखादा बोल्ड कलर लावल्यावर ती लवकर पसरते का? असं असेल तर मुळीच काळजी करू नका कारण लिपस्टिक ओठांशेजारी ज्या भागावर पसरते त्या भागावर कन्सिलर लावा. फक्त ते कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करायला विसरू नका.

मोनोटोन मेकअप करताना

ADVERTISEMENT

the-best-makeup-hacks-skin-hair %284%29

Also Read: How To Do Makeup At Home In Marathi

तुमच्या ब्लशरच्या रंगाची लिपस्टिक शेड तयार करण्यासाठी थोड्याश्या लिप बाममध्ये तुमच्या ब्लशरचा रंग मिसळा ज्यामुळे तुमच्यासाठी परफेक्ट लिपस्टिक शेड तयार होईल.

दातांवर लागलेली लिपस्टिक काढून टाकण्यासाठी

ADVERTISEMENT

लिपस्टिक लावून झाल्यावर कीस केल्याप्रमाणे चेहरा करा आणि तुमची तर्जनी तोंडात घाला.आता ओठ तसेच ठेऊन बोट बाहेर काढा. यामुळे तुमच्या दातांवरील लागलेली लिपस्टिक पुसली जाईल.

तुटलेली लिपस्टिक पुन्हा नीट करण्यासाठी

जर लिपस्टिक लावताना तुमची लिपस्टिक तुटली तर काळजी करु नका. कारण तुम्ही एका धातुच्या चमच्यामध्ये तुटलेली लिपस्टिक वितळवून ती तुमच्याकडील एखाद्या जुन्या लिपबामच्या डबीत भरून ठेऊ शकता आणि पुन्हा वापरू शकता. तसंच जर तुम्हाला लिपस्टिक पुन्हा तुमची लिपस्टिक बुलेटमध्ये भरायची असेल तर तिचा तुटलेला भाग पुन्हा लिपस्टिकमध्ये टाकून त्या भागाला लायटर अथवा मेणबत्तीने थोडं गरम करा. तुमची लिपस्टिक पुर्ववत होईल.

त्वचा आणि फाऊंडेशनसाठी मेकअप टीप्स…

ADVERTISEMENT

फाऊंडेशन लावताना ते चेहऱ्याच्या मध्यभागापासून लावण्यास सुरुवात करा. ज्यामुळे तुम्हाला अगदी नॅचरल लुक मिळेल. तसंच जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त फाऊंडेशन लावता तेव्हा ते व्यवस्थित ब्लेंड न झाल्याने एखाद्या मास्कसारखा चेहरा वाटू लागतो. असा विचित्र लुक नको असेल तर चेहऱ्याच्या मध्यभागापासून फाऊंडेशन लावण्यास सुरुवात करा आणि ते व्यवस्थित ब्लेंड करा.

तुमच्या चेहऱ्यासाठी परफेक्ट फाऊंडेशन शेड कशी निवडाल

जेव्हा तुम्ही फाऊंडेशन विकत घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही निवडलेली फाऊंडेशन शेड आधी तुमच्या मानेखाली लावून बघा. तुमच्या हनुवटीपासून खाली मानेपर्यत हे फाऊंडेशन व्यवस्थित पसरा. ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट शेड मिळू शकेल. जर तुम्ही ही युक्ती वापरली तर तुम्ही फाऊंडेशन निवडताना कधीच निराश होणार नाही.

फाऊंडेशन आणि कन्सिलर निवडताना ते लावल्यावर पाच मिनीटे थांबा

ADVERTISEMENT

मेकअपवर वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. त्यामुळे मेकअप लगेच आक्सिडाईज होतो. जेव्हा तुमचा मेकअप हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो लगेच सुकण्यास सुरुवात होते. तुम्ही निवडलेली शेड कदाचित नंतर गडद होऊ शकते. यासाठी कोणतेही मेकअप उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आधी ते लावून तर बघाच शिवाय ते लावल्यावर पाच ते दहा मिनीटे वाट बघा. जेव्हा मेकअपसाठी तुम्ही महागडी उत्पादने खरेदी करता तेव्हा या टीपचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

फाऊंडेशनमध्ये काही थेंब फेशियल ऑईल मिसळा

फाऊंंडेशनमध्ये फेशिअल ऑईल मिसळल्यामुळे ते सहज ब्लेंड होते शिवाय व्यवस्थित लावता येते. जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा तुमच्याकडे खूप जाडसर फाऊंडेशन असेल तर ते नक्कीच व्यवस्थित ब्लेंड होत नाही. यासाठी फाऊंडेशन लावताना त्यात काही थेंब फेशियल ऑईल टाका आणि चेहऱ्यावर लावण्याआधी हातावर ते व्यवस्थित मिस्क करा.

मेकअप करताना त्वचेवर ग्लो दिसण्यासाठी

ADVERTISEMENT

फाऊंडेशन वापरण्याआधी त्यामध्ये थोडंसं लिक्वीड हायलायटर वापरा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एकप्रकारचा ग्लो येतो. कधी कधी तुम्ही मॉश्चराईजरमध्ये देखील हायलायटर मिसळू शकता ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल.

कन्सिलर लावण्यापूर्वी फाऊंडेशन लावा

लक्षात ठेवा कन्सिलर लावण्यापूर्वी नेहमी फाऊंडेशन लावा. ज्यामुळे कन्सिलर खूप जास्त अथवा खूप कमी लागणार नाही.

गुलाबपाण्याचा मेकअप सेटींग स्प्रेसारखा  वापरा

ADVERTISEMENT

जर अचानक तुमचा फेवरेट मेकअप सेंटीग स्प्रे बिघडला तर काहीच काळजी करू नका. कारण तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी टाकून त्याचादेखील मेकअप सेटींग स्पेसारखा वापर करू शकता. खंरतर यामुळे तुमचा मेकअप तर सेट होईलच शिवाय तुमचा चेहरा मॉश्चराईजदेखील होईल.

तुमची मॅटॅलिक आयशॅडो उठून दिसण्यासाठी सेटींग स्प्रे वापरा

तुमची आयशॅडो आणि हायलायटर अधिक उठून दिसण्यासाठी तुम्ही तुमचा मेकअप सेटींग स्प्रे वापरू शकता. यासाठी आयशॅडो अथवा हायलायटर ब्रशवर घ्या आणि त्यावर थोडासा सेटींग स्प्रे स्प्रिंकल करा.अशा प्रकारे लावलेल्या आयशॅडो अथवा हायलायटर अधिक उठून दिसतील

तुमच्या कन्सिलरचा लिप प्रायमरसारखा वापर करू शकता

ADVERTISEMENT

लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही ओठांवर थोडंस कन्सिलर लावा. ज्यामुळे हे कन्सिलर एखाद्या लिप प्रायमरसारखं काम करेल. जर तुमचे ओठ काळसर दिसत असतील तर त्यावर एक शेड उजळ कन्सीलर लावून त्यावर लिपस्टिक लावल्याने तुम्हाला एक चांगला इफेक्ट मिळेल.

तुटलेल्या पॅनकेकला पुन्हा जोडण्यासाठी

पावडर प्रॉडक्टस जसे की, आयशॅडो, कॉम्पॅक्ट आणि हायलायटर  पडल्यामुळे तुटले तर काळजी करू नका. आमच्याकडे यासाठी अगदी सोपी युक्ती आहे ज्यामुळे तुम्ही ते पुन्हा वापरू शकता शिवाय ते नवीन विकत घेण्याचा खर्चही यामुळे वाचू शकतो. यासाठी एक चमचा घ्या आणि पॅनमध्ये ते साहित्य टाका त्यात थोडं रबींग अल्कोहोल मिसळा. मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. रात्रभर तसंच राहू द्या. रबींग अल्कोहोल मुळे त्या साहित्याच्या कन्स्टीटंन्सी, रंग अथवा परिणामांवर काहीच परिणाम होत नाही. ते या साहित्याला बायडींग करतं.

मेकअप करताना ब्युटी ब्लेंडर वापरा

ADVERTISEMENT

जर तुम्हाला अगदी सेलिब्रेटींप्रमाणे दिसावं असं वाटत असेल तर आमच्या या काही टीप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. मेकअप करताना ब्युटी स्पॉंज वापरा. हा स्पॉंज वापराना डबींंग आणि स्टिप्लींग मोशन ट्राय करा ज्यामुळे तुमची त्वचा आणखी सुंदर दिसू लागेल.

पिंपल कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करा

तुमची मासिक पाळी जवळ आली की पिंपलदेखील न सांगता आगमन करतात. या पिंपल्संना कमी करण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा बर्फ लावा. ज्यामुळे तुमची सूज आणि जळजळ कमी होईल. ही युक्ती मेकअप करताना पिंपल्स लपविण्यासाठी फार उपयोगी पडेल.

बीबी क्रीम तयार करा

ADVERTISEMENT

घरीच बीबी क्रीम तयार करण्यासाठी तुमच्या मॉश्चराईजर अथवा सनस्क्रीनमध्ये कॉम्पॅक्ट पावडर अथवा लिक्वीड फाऊंडेशन मिसळा. महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनूसार ती तयार करू शकता.

नेलपॉलिश पटकन सूकवा

जर नेलपॉलिश सूकण्याची वाट पाहण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर आम्ही तुम्हाला एक मस्त युक्ती सांगणार आहोत. नेलपॉलिश लावल्यावर बोटांवर कुकींग स्प्रे मारा. जर तुमच्याकडे कुकींग स्प्रे नसेल तर एका भांड्यात थंड बर्फाचं पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन मिनीटं हात बुडवा.

केसांची  काळजी घेताना…

ADVERTISEMENT

the-best-makeup-hacks-skin-hair %282%29 marathi

ड्राय शॅम्पू रात्री लावा

जर तुमचे केस फारच ऑयली असतील तर तुम्हाला ड्राय शॅम्पू वापरण्याची गरज आहे. पण लक्षात ठेवा ड्राय शॅम्पू रात्री झोपण्यापूर्वी वापरला तर अधिक फायदेशीर ठरतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडासा  शॅम्पू केसांवर लावा आणि केस विंचरुन झोपी जा. रात्रभर शॅम्पू केसांमध्ये चांगला मुरेल आणि सकाळी तुम्हाला चांगला इफेक्ट मिळेल.

केस पुसण्यासाठी टॉवेल ऐवजी एखादं टी-शर्ट वापरा

ADVERTISEMENT

केस धुतल्यावर ते पुसण्यासाठी टॉवेलऐवजी एखादं जुनं टी-शर्ट वापरा. ज्यामुळे केस लवकर कोरडे होतील शिवाय केस फ्रिजीदेखील होणार नाहीत. थंडीमध्ये अथवा जर तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर तुम्हाला या युक्तीचा नक्कीच चांगला फायदा होईल.

तेलकट केसांवर बेबी पावडर लावा.

जर तुमचे केस तेलकट आणि चिकट झाले असतील तर तुमच्या हेअर ब्रशवर थोडी पावडर लावा. ज्या्मुळे तुमच्या केसातील अतिरिक्त तेल पावडर शोषून घेईल आणि तुमच्या केसांना एक चांगला टेक्श्चर मिळेल. जर तुम्हाला एखादी हेअर स्टाईल करायची असेल तरी ही युक्ती फार उपयोगी पडेल.

आम्ही दिलेल्या या टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तेव्हा या मेकअप टीप्सचा अवश्य वापर करा आणि सुंदर दिसण्यासाठी तयार व्हा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा: तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स

अधिक वाचा: चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

 

09 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT