ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती

स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती

कोणत्याही महिलेसाठी तिची ब्रेस्ट अर्थात स्तन हा शरीरातील भाग हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा तिच्या शरीराचा सर्वात मोठा आकर्षणाचा बिंदू असतो. बदलत्या वेळेनुसार आता मोठे आणि उभार स्तन ही महिलांची पसंती होत चालली आहे. पण स्तनांचा आकार आणि त्याची बनावट ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुमचे स्तन लहान आहेत की मोठे यावर त्यांचा आकार अवलंबन नसतो. खरं तर प्रत्येक स्त्री च्या स्तनांचे वेगवेगळे प्रकार असतात हे बऱ्याच महिलांना माहीतच नसतं. स्तन हा शरीराचा महत्त्वाचा भाग आणि त्याची योग्य काळजी घ्यायला हवी. स्तन सैलसर असतील तर ते कोणालाच आवडत नाही. आपण यावेळी स्तनांचे नक्की काय प्रकार असतात आणि त्याची काळजी कशी घ्यायला हवी ते पाहणार आहोत.

स्तनांचे प्रकार – Different Types of Breasts in Marathi

स्तनांच्या निप्पल्सचे प्रकार – Types of Breast Nipples in Marathi

स्तन वाढवण्यासाठी घरगुती उपाय – How to increase Breast Size in Marathi

ADVERTISEMENT

स्तन म्हणजे नेमकं काय?

पुरुष आणि महिला दोघांनाही स्तन असतात. महिलांच्या स्तनांमधील ग्रंथीमुळे त्यांना आपल्या बाळांना दूध पाजता येतं. युवा अवस्थेत असताना महिलांचे स्तन वाढतात आणि विकसित होत असतात. स्तनांचे प्रमुख तीन भाग असतात. स्तन, निप्पल आणि निप्पलच्या बाहेरील गोलाकार क्षेत्र. स्तनांमध्ये हाडं नसतात. त्यामुळे लिगामेंटमुळे ते बांधून ठेवले जातात, ज्याला कूपरलिगामेंट म्हटलं जातं. त्यामुळे अधिक वजन असल्याने आणि कोणताही आधार नसल्याने स्तन शरीराच्या खालच्या बाजूला लटकत राहतात. त्यामुळे वयात आल्यानंतर स्तनांसाठी ब्रा चा उपयोग करावा लागतो. स्तन हे अतिशय मऊ असतात. त्यामुळे सेक्स करतानाही आकर्षक स्तन पुरुषांना आवडतात.

स्तन कधी आणि कसं विकसित होतात (How to Develop Breast in Marathi)

तुम्हाला हे तर माहीत आहेच की, जगभरातील महिलांच्या स्तनांचे वेगवेगळे आकार आणि प्रकार असतात. पण हे स्तन आपल्या शरीरामध्ये कसे विकसित होतात हे जाणून घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. जाणून घेऊया स्तनांचा विकास कसा होतो –

  • किशोरवयात येण्यापूर्वी कोणत्याही मुलीचे स्तन हे लहान निप्पल्ससह सपाट असतात
  • जेव्हा किशोरवयात मुलगी येते तेव्हा स्तनांना छोटा उभार येते ज्याला बड्स (Buds) म्हटलं जातं. स्तनांच्या निप्पल्सखाली बड्स यायला सुरुवात होते. सुरुवातीला स्तनांमध्ये दुखतं पण नंतर काही कालावधीनंतर दुखणं थांबतं
  • जेव्हा निप्पल्स आणि एरिओलाचा रंग बदलायला लागतो तेव्हा निप्पल्स ताठर होतात आणि मग बाहेर येऊ लागतात
    वेळेनुसार जेव्हा बड्स मोठे आणि गोल होतात तेव्हा त्याला स्तनांचा आकार यायला लागतो
  • काही मुलींच्या स्तनांंना उभार असतो काही मुलींचे स्तन हळूहळू वाढतात त्यामुळे घाबरून जाऊ नका. किशोरवयीन अवस्था ही 8 ते 13 वयादरम्यान असते. आठव्या वयापासून ते साधारण 20 वयापर्यंत मुलींचे स्तन वाढतात
  • स्तनांचा विकास हा किशोरवयीन अवस्था येण्याचा पहिला संकेत असतो

स्तनांचे प्रकार – Types of Breast in Marathi

तुम्हाला जर वाटत असेल की, सर्व महिलांचा स्तनांचा आकार हा एकसारखा असतो तर तुमचा हा गैरसमज आहे. तसंच जाहिरातींमध्ये दाखवण्यात आलेला स्तनांचा आकार हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसंही नाही. असं तर स्तनांचा एखादा आकार ही त्याची परिभाषा आहे असं कधीच होत नाही. आपल्याला माहीत असलेल्यापेक्षा कितीतरी अनेक स्तनांचे प्रकार आहेत. लहान, मोठे, मध्यम आकाराचे, केसांसह, केस नसलेले हे अतिशय सामान्य प्रकार आहेत. बनावट आणि निप्पल्सचेदेखील अनेक प्रकार आहेत.

कशा प्रकारचे असतात स्तन – Types of Boobs Marathi

आपल्याला फक्त गोलाकार स्तन माहीत असतात. पण वास्तविक महिलांचे स्तन हे सात प्रकारचे असतात. पण वाढत्या वयानुसार आणि असंतुलित हार्मोनच्या कारणांमुळे यामध्ये साधारण नऊ प्रकारच्या स्तनांची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

असिमेट्रिक शेप ब्रेस्ट (Asymmetric Breast )

Shutterstock

असिमेट्रिक या शब्दाचा अर्थ आकारामधील असमानता. या तऱ्हेच्या स्तनांच्या आकारामध्ये दोन्ही स्तन समान नसतात. यामध्ये एकाचा आकार दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा असतो. महिलांच्या बाबतीत हे खूपच कॉमन आहे. अर्थात हे अंतर जास्त नसतं. त्यामुळे ब्रा व्यवस्थित फिट होतात. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. यामुळे तुमच्या स्तनांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत नाही.

टिप्स- जर तुमचे स्तन असिमेट्रिक आकाराचे असतील तर तुमच्यासाठी पॅडेड ब्रा जास्त चांगली आहे

ADVERTISEMENT

अॅथलीट शेप ब्रेस्ट (Athletic Breast)

Shutterstock

या तऱ्हेचे स्तन असणाऱ्या महिला या स्पोर्ट्स पर्सन आहेत असं अजिबातच नाही. वास्तविक या स्तनांमध्ये टिश्यूचं प्रमाण कमी असतं आणि मसल्स जास्त असतात. ज्याचा अर्थ असा आहे की, तुमचे स्तन हे अतिशय मजबूत आहेत. अन्य महिलांच्या तुलनेत तुमचे स्तन हे अतिशय मजबूत असल्याचं समजलं जातं.

टिप्स – तुमचे स्तन हे अॅथलीट आकारामध्ये असतील तर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा वापरू शकता

ADVERTISEMENT

बेल शेप ब्रेस्ट (Bell-Shaped Breast)

Shutterstock

याच्या नावाप्रमाणेच स्तनांचा आकार असतो. बेलच्या आकाराचे स्तन हे वरच्या बाजूला थोडे पातळ असतात आणि खालच्या बाजूने थोडेसे जाड असतात. बेलप्रमाणेच याचा आकार असतो.

टिप्स – तुमचे स्तन जर बेलच्या आकाराप्रमाणे असतील तर तुम्हाला अशी ब्रा घालायला हवी जी तुमच्या स्तनांना खालच्या बाजूने आधार देईल.

ADVERTISEMENT

साईड सेट शेप ब्रेस्ट (Side Set Breast)

Shutterstock

या स्वरूपाच्या स्तनांमध्ये कॉमन स्तनांपेक्षा अधिक अंतर असतं आणि निप्पल्स समोर असण्याऐवजी किनाऱ्यावर पॉईंटेड असतात. त्यामुळे दोन स्तनांमध्ये बरंच अंतर निर्माण होतं. तसंच अशा स्वरूपाचे स्तन हे सामान्यतः मोठ्या आकाराचे असतात.

टिप्स – तुमच्या स्तनांचा आकार साईड सेट असेल तर तुम्ही प्लंज ब्रा वापरू शकता

ADVERTISEMENT

स्लेंडर शेप ब्रेस्ट (Slender Breast)

Shutterstock

छोटे स्तन असण्याचा अर्थ असा नाही की, ते पातळ असतात. सामान्यतः या स्तनांमध्ये निप्पल्स हे खालच्या बाजूला असतात. या स्तनांच्या बाबतीत निप्पल्स हे खालच्या बाजूला झुकलेले असतात. तसंच हे खालच्या बाजूला असल्यामुळे पूर्णतः खालच्या बाजूला ओढले जात नाही. त्यामुळे या स्तनांचा आकार हा सिलेंड्रिकल असतो. असे स्तन हे जास्त लांब आणि थोडे ब्रॉड आकाराचे असतात.

टिप्स – तुमचे स्तन जर स्लेडर शेपमध्ये असतील तर तुम्ही प्लंज अथवा वायरलेस ब्रा वापरू शकता

ADVERTISEMENT

टिअर ड्रॉप शेप ब्रेस्ट (Tear Drop Breast)

Shutterstock

या स्तनांचा आकार गोल असून हे स्तन थोडे पातळही असतात. याचा आकार टिअर ड्रॉपसारखा असतो. यामध्ये निप्पल्स थोडेसे झुकलेले असतात. असा आकार असणं हे अतिशय कॉमन आहे.

टिप्स – तुमचे स्तन जर टिअर ड्रॉप आकाराचे असतील तर तुम्ही कोणत्याही तऱ्हेची ब्रा घालू शकता

ADVERTISEMENT

राऊंड शेप ब्रेस्ट (Round Breast)

Shutterstock

तुमच्या डोक्यामध्ये स्तनांच्या आकाराचं चित्र फिक्स झालेलं असतं आणि हे स्तन त्याच प्रकारचे असतात. वरपासून ते खालपर्यंत एकसमान असून निप्पल्स समोरच्या दिशेने असतात. असे स्तन एकदमच गोलाकार असतात.

टिप्स – तुमचे स्तन राऊंड शेप असतील तर तुम्हाला नॉर्मल ब्रा घालता येते

ADVERTISEMENT

रिलॅक्स्ड शेप ब्रेस्ट (Relaxed Breast)

Shutterstock

या स्वरूपाचे स्तन नावाप्रमाणेच अगदी रिलॅक्स्ड असतात. या स्तनांमधील टिश्यूज अतिशय सैलसर असल्यामुळे स्तन शरीराच्या खालच्या बाजूला झुकलेले असतात.

टिप्स – तुमचे स्तन रिलॅक्स्ड आकाराचे असतील तर तुम्हाला क्लासिक टी – शर्ट ब्रा घालायला हवी

ADVERTISEMENT

ईस्ट- वेस्ट शेप ब्रेस्ट (East West Breast)

Shutterstock

या स्वरुपाच्या स्तनांमधील दोन्ही निप्पल हे एक दुसऱ्याच्या बाजूला इशारा करताना. अर्थात एक निप्पल पूर्व बाजूला तर दुसरे निप्पल हे पश्चिम बाजूला असतं. त्यामुळेच या स्तनांचा असे नाव देण्यात आले आहे.

टिप्स – तुमचे स्तन ईस्ट- वेस्ट शेप मध्ये असल्यास, तुम्हाला टी- शर्ट ब्रा घालणं हा चांगला पर्याय आहे

ADVERTISEMENT

ब्रेस्ट निप्पल्सचे प्रकार – Types Of Breast Nipples in Marathi

Shutterstock

आपण वेगवेगळ्या आकाराच्या स्तनांबद्दल जाणून घेतलं पण तुम्हाला माहीत आहे का की, निप्पल्सचेही अनेक प्रकार असतात. यामध्ये सॉफ्ट अर्थात मऊ, टणक, संवेदनशील, केसाळ आणि केसांशिवाय असे प्रकार असतात. जाणून घेऊया निप्पल्सचे किती प्रकार आहेत –

उभार आलेले निप्पल्स (Protruding)

ADVERTISEMENT

सपाट (Flat)

पफी (सुजलेल्यासारखे)  (Puffy)

आतल्या बाजूला झुकलेले (Inverted)

एकतर्फी आतल्या बाजूला झुकलेले ( Unilateral Inverted)

ADVERTISEMENT

बंपी (Bumpy)

केसाळ (Hairy)

वाजवीपेक्षा जास्त उभार आलेले (Supernumerary)

स्तन वाढवण्यासाठी घरगुती उपाय – How To Increase Breast Size in Marathi

काही महिलांचे स्तन व्यवस्थित विकसित होत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या महिलांचे स्तन पाहून त्यांना वाईट वाटत असतात. काही महिलांना स्तनांचा आकार वाढवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात आणि काही महिला तर काही महिला महागातले उपचारही करतात. पण अशा उपचारांना बऱ्याचदा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे स्तन आकर्षिक हवे असतील तर तुम्ही या सगळ्या फाल्तू उपचारांच्या मागे लागू नका. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्तन वाढवण्यासाठी स्वतःचीच मदत करू शकता.

ADVERTISEMENT
  • स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दूध आणि पपई एकत्र करून खा
  • आळशीचे दाणे काही प्रमाणात खा
  • स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मेथी दाण्याचं सेवन करा अथवा याची पेस्ट बनवून तुम्ही तुमच्या स्तनांनाही लावू शकता
  • ऑलिव्ह ऑईलने रोज तुम्ही स्तनांना मालिश केल्यास, तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल
  • रोज 2 ते 3 केळी खाल्ल्यास, तुमचे स्तन वाढतात
  • कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याची पेस्ट करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने स्तनांचा मसाज करा

हेदेखील वाचा – 

सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

मोठे स्तन असणाऱ्या महिलांना त्यांच्या स्तनाबाबत नेमकं काय वाटत, जाणून घ्या

केवळ ५ मिनिटात हे व्यायामप्रकार तुम्हाला देतील आकर्षक स्तन

ADVERTISEMENT
14 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT