logo
Logo
User
home / बॉलीवूड
vidya balan

विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘नीयत’चे शूटिंग युकेमध्ये झाले सुरु

विद्या बालन ही बॉलीवूडची एक अष्टपैलू अभिनेत्री आहे, जी तिच्या प्रत्येक भूमिकेत अक्षरश: जीव ओतून काम करते. तिने पडद्यावर जिवंत केलेली पात्रे म्हणूनच वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या आठवणींत राहतात.  काही काळापूर्वी विद्याचा ‘जलसा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या टॅलेंटेड अभिनेत्रीने तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अनु मेनन दिग्दर्शित ‘नीयत’ या चित्रपटात विद्या बालन दिसणार आहे. विद्या बालनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

युकेमध्ये सुरु झाले शूटिंग

‘नीयत’ हा एक सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट असेल, ज्याचे शूटिंग यूकेमध्ये सुरू झाले आहे. विद्या बालनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हातात क्लब बोर्ड धरलेला दिसतो आहे. या फोटोमध्ये विद्या बालनसोबत दिग्दर्शक अनु मेननही दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना विद्या बालनने लिहिले की, “माझ्या काही आवडत्या लोकांसोबत मी अलीकडच्या काळात वाचलेल्या सर्वात आकर्षक स्क्रिप्टपैकी एकाचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे.” मंगळवार, 10 मे  रोजी विद्याने नीयतच्या सेटवरील अनु मेनन आणि विक्रम मल्होत्रा यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला.

विद्या बालनचे चित्रपट बर्‍याच दिवसांपासून OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत आणि आता ”नीयत’ हा चित्रपट देखील OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. याची घोषणा खुद्द ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अबंडेशिया ही कंपनी करते आहे. ही कंपनी प्रसिद्ध निर्माते  विक्रम मल्होत्राची यांची आहे. या चित्रपटात विद्या बालन बरोबरच शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, नीरज काबी, राम कपूर, मीता वशिष्ठ, अमृता पुरी आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. ‘नीयत’  हा विद्या बालनचा दुसरा चित्रपट आहे, जो Amazon Prime वर स्ट्रीम होईल. यापूर्वी या प्लॅटफॉर्मवर विद्याचा ‘जलसा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.

29 एप्रिल रोजी झाली होती नीयतची घोषणा 

अनु मेनन यांनी 29 एप्रिल रोजी नीयतची घोषणा केली आणि यातील कलाकार सदस्यांची नावे देखील उघड केली होती. त्यांनी लिहिले की, “नीयत. मी ज्या चित्रपटासाठी काम करत आहे, त्याची एक झलक बघा. याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्याल अशी मला आशा आहे! माझ्या उत्कृष्ट सहयोगी @balanvidya आणि @ivikramix – आणि यांच्यासोबत पुन्हा एकत्र येताना खूप आनंद झाला. या चित्रपटाची कास्ट स्वप्नवत आहे.” या मर्डर मिस्ट्रीमध्ये विद्या बालन डिटेक्टिव्ह मीरा रावची भूमिका साकारताना दिसणार आहे. नीयतमध्ये राम कपूर, राहुल बोस, मीता वसिष्ठ, नीरज काबी, शहाना गोस्वामी, दीपन्निता शर्मा, अमृता पुरी, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी आणि दानिश रझवी या उत्कृष्ट अभिनेत्यांना बघायला मिळेल. 

विद्या बालन सध्या नीयतच्या शूटिंगसाठी यूकेमध्ये आहे. शकुंतला देवीनंतर अनु आणि विद्या यांची यूकेमध्ये शूटिंग करण्याची ही दुसरी वेळ असेल. विद्या दोन महिन्यांच्या शेड्यूलमध्ये या सस्पेन्स थ्रिलरचे शूटिंग करणार आहे. नीयत या थरारक चित्रपटामध्ये विद्याला पाहणे मनोरंजक असेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text