गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाला केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील गाणी आणि संवादांनीही प्रेक्षकांना थक्क केले.अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ची भूमिका साकारली तेव्हापासून बालवाडीपासून ते कॉलेज आणि राजकारणाच्या कॉरिडॉरपर्यंत चित्रपटाचा प्रत्येक संवाद ऐकू येत आहे. लहान लहान मुलांपासून तर मोठी माणसेही ‘झुकेगा नहीं साला…’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अशी खबर कानांवर आली आहे की यावेळी ‘पुष्पा’ला टक्कर देण्यासाठी साऊथचा एक ढासू स्टार खलनायक म्हणून दाखल झाला आहे.
कधी येणार पुष्पाचा दुसरा भाग
प्रेक्षक आता ‘पुष्पा २: द रुल’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनचा हा चित्रपट येत्या ऑगस्टपर्यंत फ्लोरवर जाईल. या चित्रपटाच्या 6 महिन्यांपेक्षा जास्त असलेल्या वेळापत्रकात अनेक ऍक्शन सीक्वेन्स चित्रित केले जातील. इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा होतेय की हे ऍक्शन सीन्स भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या दृश्यांपैकी एक असतील. त्यानंतर त्या दृश्यांवर पोस्ट प्रॉडक्शनचेही काम केले जाईल. म्हणजेच थोडक्यात हे सीन्स प्रेक्षकांचं डोळ्यांचे पारणे फेडतील. हा चित्रपट आता 2023 च्या मध्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुष्पा 2 मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री होण्याची शक्यता
अल्लू अर्जुनने आपल्या जवळच्या सल्लागारांना तामिळनाडू सीमेजवळील ग्रामीण भागात आणि चित्तूर येथे तेथील स्थानिक भाषा शिकून घेण्यासाठी पाठवले आहे असे वृत्त आहे. पुष्पाच्या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुनने साकारलेला ‘पुष्पा’ हा फहाद फासिलने साकारलेल्या ‘भंवर सिंग शेखावत’ या पात्राला टक्कर देणार आहे.सध्या सगळीकडे अशी चर्चा होतेय की सुकुमार पुष्पाच्या दुसऱ्या भागात सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विजय सेतुपतीला कास्ट करू शकतात.
या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार का
पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन आणि श्रीवल्लीच्या भूमिकेतील रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले होते. आता दुसऱ्या भागातही या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. पण दुसऱ्या भागात श्रीवल्लीच्या पात्राला कमी सीन्स देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर पुष्पा भाग २ मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटात खलनायक श्रीवल्लीची हत्या करणार आणि त्यानंतर पुष्पा आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घेईल असा प्रेक्षकांचा अंदाज आहे.
स्क्रिप्टमध्ये होत आहेत बदल
अलीकडेच, ‘KGF Chapter 2’ च्या जबरदस्त यशानंतर एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की ‘KGF’ च्या यशानंतर ‘पुष्पा’चे निर्माते चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करत आहेत. निर्मात्यांची इच्छा आहे की चित्रपटातील प्रत्येक दृश्याने चाहत्यांच्या मनावर खोलवर छाप पाडायला हवी. म्हणूनच स्क्रिप्ट शक्य तितकी परफेक्ट केली जात आहे. स्क्रिप्टमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. याशिवाय प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी या चित्रपटासाठी तीन गाणी संगीतबद्ध केली आहेत. ‘पुष्पा’चा दुसरा भाग धमाकेदार असेल. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचे बजेटही वाढवले आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाचे बजेट सुमारे 200 कोटी होते आणि चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यासाठी निर्माते सुमारे 400 कोटी खर्च करणार आहेत.
आता पुष्पा 2 मध्ये काय घडणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक