‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमधून घरोघरी पोहचलेली कपिलची बुआ म्हणजेच अभिनेत्री उपासना सिंह सध्या चांगलीच संकटात सापडली आहे. तिच्यावर पंजाबमध्ये कोरोना कर्फ्यू तोडल्याचा आरोप लावण्यात आला आहे. कोविड गाईडलाईन्सचे उल्लंघन करत आणि विना परवानगी शूटिंग केल्याप्रकरणी तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या उपासना सिंह प्रमाणे अनेक कलाकार कोविड नियमांचे उल्लंघन करत शूटिंग पूर्ण करत असल्याचं आढळत आहे. ज्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन करण्याऐवजी ते आपला आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत अशी सध्या चर्चा आहे.
उपासना सिंह सापडली संकटात
पंजाबमध्ये सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना कफ्यू लावण्यात आलेला आहे. सहाजिकच या काळात चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंग करण्यास मनाई आहे. मात्र असं असूनही काही कलाकार कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत शूटिंग करताना आढळत आहेत. पंजाबमधील रूपनगरमध्ये मेरिंडाच्या एका साखर कारखान्यात असंच एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. पंजाब पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांना त्या ठिकाणी तपास केला. ज्यामध्ये अभिनेत्री उपासना सिंह आणि तिची टीम शूटिंग करत असल्याचं आढळलं. यादरम्यान जेव्हा उपासना सिंहकडे शूटिंगची परवानगी विचारण्यात आली तेव्हा तिच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. ज्यामुळे पोलिसांना या शूटिंग टीमवर कायदेशीर कारवाई करावी लागली. पोलिसांनी या शूटिंग सेटचा व्हिडिओ तयार केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंजाबमध्ये वाढत आहेत विनापरवानगी शूटिंगच्या केसेस
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलवरही पंजाबमध्ये असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावरही कोरोना नियमांचे उल्लंघन करत शूटिंग करत असल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. या शूटिंग सेटवर दिडशेपेक्षा जास्त लोकांची टीम आढळून आली. त्यातील अनेक लोकांनी शूटिंग दरम्यान मास्कदेखील लावले नव्हते. त्यानंतर लगेचच पंजाबमध्येच पटियालामध्ये लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री गिप्पी अग्रवाल हिला शूटिंग करताना पकडण्यात आले. या शूटिंग सेटवरही शंभरहून अधिक लोक होते. अशा प्रकारे सध्या पंजाबमध्ये कोरोना कफ्यू तोडत, नियमांचे उल्लंघन करत शूटिंग करत असलेली अनेक प्रकरणे आढळून येत आहेत. ज्यामुळे पंजाब सरकारची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजन जरी गरजेचं असलं तरी या कलाकारांनी शूटिंग करताना कोविडबाबत योग्य ती सुरक्षा पाळायलाच हवी.
कलाकार मनोरंजनासाठी घालत आहेत जीव धोक्यात
महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या मुंबईत शूटिंगवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच मुंबईत चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला बंदी आहे. काही मालिकांच्या टीमने यावर तोडगा काढत महाराष्ट्राबाहेर शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शो आणि मालिकांचे शूटिंग सध्या महाराष्ट्राबाहेर दमनमध्ये सुरू आहे. तर काही चित्रपटांचे शूटिंग गोव्यात सुरू आहे. मात्र यामुळे महाराष्ट्राबाहेरील इतर ठिकाणचा कोरोनाचा धोका वाढताना दिसू लागला आहे. अशा प्रकारे कलाकार जर नियमांचे उल्लंघन करत आणि विनापरवानगी शूटिंग करत राहिले तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याऐवजी ते कोरोनाचा प्रसारच जास्त करण्याची शक्यता आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
आमिर खान लडाखमध्ये करत आहे शूटिंग,असा रंगणार ‘लाल सिंह चड्ढा’चा वॉर सीन
‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत या अभिनेत्याची एंट्री, बदलणार का शुभ्रा