ADVERTISEMENT
home / आरोग्य
vitamin-b12-deficiency-in-adolescents-is-dangerous-in-the-future-doctors-warn-in-marathi

किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भविष्यात घातक : डॉक्टरांनी दिला इशारा

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेप्रमाणेच B 12 ची कमी पातळी (Deficiency of Vitamin B12) सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येते. ड जीवनसत्व असणारे पदार्थ जसे गरजेचे आहेत तसंच व्हिटामिन बी12 देखील शरीराला गरजेचे आहे. व्हिटॅमिन बी 12 कमतरतेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात जसे की अॅनिमिया, जळजळ, थकवा, आरोग्य समस्या, चालण्यात अडचणी, बधीरपणा किंवा हात, पायांना मुंग्या येणे. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या पातळीचे वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे ते सामान्य आणि शिफारस केलेल्या श्रेणीत आहे की नाही हे तपासा. तसेच, मशरूम, चिकन, अंडी, बदाम आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या शरीरात व्हिटॅमिन डी, जस्त, लोह किंवा कॅल्शियमची पातळी प्रमाणेच बी 12 ची देखील योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. आज, बहुसंख्य किशोरवयीन मुलांमध्ये B12 ची कमतरता आहे ज्यामुळे ते गंभीर संकटात सापडू शकतात असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

B12 ची कमतरता ही सर्वात दुर्लक्षित समस्यांपैकी एक

व्हिटॅमिन बी 12

लाल रक्तपेशी, ऊती, डीएनए आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची चिन्हे आणि लक्षणे म्हणजे हात, पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, चालण्यास असमर्थता, अशक्तपणा, जीभेवर सूज येणे, शरीरात जळजळ, आरोग्य समस्या, थकवा, चिडचिड, भूक कमी होणे,शारीरीक हलचाली दरम्यान स्नायूंचा आवाज होणे, उदासीनता, उलट्या, अतिसार, हायपरपिग्मेंटेशन, शारीरीक विकास मंदावणे आणि थकवा. जेव्हा शरीर पुरेसे व्हिटॅमिन शोषून घेत नाही किंवा साठवत नाही किंवा एखाद्याला त्याची पुरेशी मात्रा मिळत नाही तेव्हा व्हिटॅमिन बी 12 कमतरता निर्माण होऊ शकते. B12 ची कमतरता ही सर्वात दुर्लक्षित समस्यांपैकी एक आहे. चूकीचा आहार, फास्ट फूडचे सेवन यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता वाढत आहे अशी प्रतिक्रिया डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन, अपोलो स्पेक्ट्रा पुणे यांनी व्यक्त केली.

काय आहे लक्षणे 

व्हिटॅमिन बी 12

 डॉ. प्रेरणा अग्रवाल, मॅनेजर टेक्निकल ऑपरेशन अपोलो डायग्नोस्टिक पुणे यांनी सांगितले की, पायांना मुंग्या येणे आणि पाय सुन्न होणे, भूक न लागणे, चालण्यात अडचण आणि स्मरणशक्ती कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यावर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या व्हिटॅमिन बी12 ची पातळी तपासण्याचा सल्ला देतील. तुमच्याकडे हे जीवनसत्व पुरेसे आहे का हे तपासण्यासाठी बी12 चाचणी करुन घ्या. त्यानंतर, तुम्हाला सप्लिमेंट किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात B12 घेण्यास सुचवले जाईल. तुमचे उपचार करणारे डॉक्टर तुम्हाला ते किती आणि कसे घ्यायचे याचे निर्देश देतील. दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सॅल्मन, चिकन, अंडी, मॅकरेल, टोफू, मशरूम आणि ट्यूनामध्ये पुरेसे व्हिटॅमिन बी 12 असते आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात योग्य बदल केला जाऊ शकतो. B12 ची उच्च पातळी देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. B12 ची कमतरता वेळेवर ओळखणे आणि त्वरित उपचार केल्याने किशोरवयीन मुलांची वाढ आणि विकास सुधारून न्यूरोलॉजिक समस्या आणि रक्त रोग यासारख्या गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून तुमच्या मुलांना याचा त्रास होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT