2021 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सामान्य जनतेनेही अक्षरशः लग्नसराईची मजा घेतली आणि कोरोना काळात मुहूर्त साधून लग्न करून घेतले. 2021 मध्ये 50 पेक्षा अधिक मुहूर्त होते. 2022 मध्येही असाच लग्नाच्या मुहूर्तांचा धमाका आहे. तुम्हीही लग्न करणार असाल तर तुम्हीही वेळीच तारीख ठरवा. लग्नाचे मुहूर्त भरपूर असूनही कोरोना काळामुळे अनेकांनी लग्न केले नाही तर काही जणांनी कोरोनामुळे लॉकडाऊन लागेल या भीतीने पटकन लग्नही करून घेतले. लग्नामध्ये वधू आणि वरांनी मराठी उखाणे घेणे, लग्नाची शॉपिंग ही सर्वच मजा असते. मात्र आता नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल की काय अशीही अनेकांना भीती आहे. मात्र 2022 मध्येही लग्न मुहूर्ताचा धमाका आहे. कोणत्या महिन्यात नक्की कोणते मुहूर्त आहेत ते घ्या जाणून. 2021 पेक्षाही अधिक लग्नमुहूर्त 2022 या वर्षात आहेत.
अधिक वाचा – पाहा मराठी उखाणे नवरदेवासाठी (Marathi Ukhane For Male)
कोणत्या महिन्यात असतील कोणते मुहूर्त
जानेवारी – जानेवारी महिन्यात सहसा अनेक जण लग्न करण्यास उत्सुक असतात. कारण भारतामध्ये अनेक ठिकाणी यावेळी थंडीचा हंगाम असतो. त्यामुळे जानेवारी महिन्यातील मुहूर्त अनेकांना हवेहवेसे वाटतात. नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात तुम्ही लग्नाची तयारी करू शकता. अर्थात आता लग्न ठरलं असेल तर केवळ एक महिन्याचाच कालावधी मिळेल. पण तुम्ही एक महिन्यातही लग्नाची झटकन तयारी करून लग्न करू शकता. सहसा जानेवारी महिन्यात मराठी पौष महिना येतो. मात्र हल्ली पौष महिन्यातही लग्न केली जातात.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 22, 23, 24 आणि 25
फेब्रुवारी – फेब्रुवारी महिन्यातदेखील बऱ्यापैकी थंडावा असतो. त्यामुळे साधारण जानेवारी आणि फेब्रुवारीचे मुहूर्त अधिक पाहिले जातात. फेब्रुवारी महिन्यात लग्न केल्यानंतर पुढचे सर्व सणही एकत्र साजरे करता येतात त्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये फेब्रुवारी महिन्यातील मुहूर्तांना महत्त्व दिले जाते.
लग्नाचा शुभ मुहूर्त –5, 6, 7, 9, 10, 11, 12, 18, 19, 20 आणि 22
मार्च – मार्च महिन्यात सहसा लग्न होत नाहीत. मात्र नव्या वर्षातील मार्च महिन्यामध्येही मुहूर्त आहेत. या महिन्यात दोन मुहूर्त आहेत. ज्यांना या महिन्यात लग्न करायचे असेल ते या मुहूर्तांचा लाभ नक्की घेऊ शकतात. मार्च महिन्यात साधारण उन्हाळ्याला सुरूवात होते. तसंच परीक्षांचा हंगाम असल्यामुळे कुटुंबामध्ये लग्न करण्यात येत नाही. मात्र तुम्हाला या महिन्यात लग्न करायचे असेल तर नवे वर्ष तुमच्यासाठी ठरेल खास.
लग्नाचा शुभ मुहूर्त –4 आणि 9
अधिक वाचा – मराठी उखाणे नवरीसाठी (Marathi Ukhane For Bride)
एप्रिल – एप्रिलमध्ये तितकंसं गरम होत नाही. गरम होत असेल तर हल्ली एसी हॉलशिवाय लग्नही होत नाहीत. एप्रिल महिन्यात लग्न करायचे असेल तर अजून किमान चार महिने तरी आहेत. त्यामुळे तुमच्या हातात बरेच दिवस आहेत. जेणेकरून तुम्ही लग्नाची इत्यंभूत तयारी करू शकता.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 14, 15, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 27
मे – दरवर्षीप्रमाणे सर्वात जास्त मुहूर्त असतात ते म्हणजे मे महिन्यात. आपल्याकडील सुट्टीचा महिना आणि लग्नाचादेखील महिना. या लग्नाच्या महिन्यात अनेक जणं लग्न करणाला प्राधान्य देतात. उन्हाळा असला तरीही लहान मुलांना सुट्टी असल्यामुळे सहसा कुटुंबामध्ये लग्न करण्याला प्राधान्य दिले जाते. नव्या वर्षातही मे महिन्यात बरेच मुहूर्त आहेत.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 2 अक्षय तृतीयेचा मुहूर्त, 3, 9, 10, 11, 12, 15, 17, 18, 19, 20, 21, 26, 27 आणि 31
जून – जून महिन्यातही आपल्याकडे अनेक जण लग्न करतात. पावसाळ्याची सुरूवात होण्याचा महिना असल्यामुळे काही वेळा गारवा असतो. मात्र जून महिन्यात नुकतीच शाळांची सुरूवात झाल्यामुळे घरामध्ये घाईगडबड नसते. त्यामुळेच या महिन्यातही अनेक लग्न करण्यात येतात.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 1, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 17, 23 आणि 24
जुलै – नव्या वर्षामध्ये अगदी जुलै महिन्यातदेखील मुहूर्त आहे. ज्यांना जूनपर्यंत लग्न करणे शक्य नाही अथवा अचानक लग्न ठरले आहे अथवा तात्काळ लग्न करायचे असेल तर जुलैमध्येही लग्नाचे मुहूर्त आहेत.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 4, 6, 7, 8 आणि 9
नोव्हेंबर – साधारण दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर नेहमी मुहूर्त असतात. नोव्हेंबर महिन्यात तुळशीच्या लग्नानंतर सहसा अनेक मुहूर्त असतात. 2022 मधील नोव्हेंबर महिन्यात कमी मुहूर्त आहेत. मात्र तरीही तुम्ही पाहून लग्नासाठी योग्य मुहूर्त काढू शकता.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 25, 26, 28 आणि 29
डिसेंबर – वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. 2022 च्या शेवटच्या महिन्यातदेखील काही मुहूर्त आहेत. सहसा सेलिब्रिटी या महिन्यात आजकाल लग्न करण्याला प्राधान्य देताना दिसून आले आहे.
लग्नाचा शुभ मुहूर्त – 1, 2, 4, 7, 8, 9 आणि 14
लग्नाची खरेदी करण्याआधी वाचा या शॉपिंग टिप्स
नव्या वर्षात 3 महिने करू शकत नाही लग्न
नव्या वर्षात तीन महिने असे आहेत ज्यावेळी मुहूर्त नाहीत. तुम्ही या महिन्यात लग्न करू शकत नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिनही महिन्यात चतुर्मासच्या कारणामुळे एकही विवाहमुहूर्त नाही. याशिवाय संपूर्ण वर्षभर लग्नाचे मुहूर्त असून तुम्ही या महिन्यांमधील मुहूर्त शोधून लग्न करू शकता.
अधिक वाचा – विवाह जुळवताना पत्रिकेपेक्षा ‘आरोग्य पत्रिका’ अधिक महत्त्वाची, घ्या जाणून
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक