ADVERTISEMENT
home / भविष्य
काय आहे आज तुमचं राशीभविष्य

काय आहे आज तुमचं राशीभविष्य

मेष – विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.आज बिझनेस संबधी कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये समस्या येतील. वरिष्ठांसोबत मतभेद होतील.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबत मधुरसंबंध निर्माण होतील.

कुंभ – आयात-निर्यात व्यवसायामध्ये समस्या येतील.नोकरदारांसाठी देखील आज त्रासदायक दिवस असेल.अधिक मेहनत घ्यावी लागेल.उत्पन्न कमी होईल.आर्थिक समस्या येतील.कर्ज घेऊ नका.

मीन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.विरोधकांना चांगलाच धडा शिकवाल. भाग्योदयाचे संकेत आहेत. पद आणि पत दोन्हीमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.

वृषभ- प्रेमसंबधांना मान्यता मिळेल. कुंटुंबातील मतभेद दूर करण्यात यश मिळेल. व्यवसायात जोखीमेपासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभाग घ्या.

ADVERTISEMENT

मिथुन- आजारपण आणि विरोधक सक्रिय होतील. एखाद्या अज्ञात भितीने त्रस्त व्हाल. वादविवादांपासून दूर रहा. संघर्षापासून मुक्त व्हाल. बिझनेसमध्ये प्रगती होईल. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाल.

कर्क – विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. कला आणि सिनेक्षेत्रातील लोकांना लाभ मिळण्याचे संकेत. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.

सिंह- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून त्रास होईल.सावध रहा.नवीन योजना राबविण्यासाठी खर्च करावा लागेल.नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.वैवाहिक जीवन आनंदाचे असेल. कुंटुबासोबत वेळ मजेत जाईल.

कन्या- दीर्घ आजारपणातून सुटका होईल. कार्य पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या. मुलांकडून शुभसमाचार मिळतील. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.

ADVERTISEMENT

तुळ- कुंटुबकलह वाढतील.नातेसंबंध दूरावतील. सामंजस्याने समस्या सोडवा. जोडीदारासोबत प्रवास करु नका. कुंटुंबाकडे लक्ष द्या. जवळच्या व्यक्ती धोका देतील सावध रहा.

वृश्चिक- आजचा दिवस आव्हानात्मक असेल. महत्वाचे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे.नोकरदार महिलांना अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात रस घ्या.

धनु – मित्रांच्या आजारपणामुळे त्रस्त व्हाल.निराश आणि असमाधानी असूनही आत्मविश्वास वाढेल.व्यवसायामध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. जोडीदाराला समजून घ्या.आहाराबाबत सावध रहा.

मकर- प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. नवीन भेटीगाठींचे रुपांतर मैत्रीमध्ये होईल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील.नवीन प्रेमप्रकरण होण्याची शक्यता आहे.कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या.

ADVERTISEMENT
25 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT