वजन अती प्रमाणात वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण बैठ्या स्वरूपातील काम आणि जंक फूडचे अती सेवन आहे. अनेक संशोधनात असं आढळलं आहे की जंक फूड खाण्यामुळे वजन अती प्रमाणात वाढू लागते. शिवाय जंक फूड पचायला जड असते ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. असं वजन वाढणं आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाही. यासाठी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जंक फूड खाणं कमी करायला हवं. शिवाय वजन वाढणं हा एक अनुवंशिक विकार असल्यामुळे तुम्ही तुमचा हा गुणधर्म पुढच्या पिढीला वारसा हक्काने देत असता. ज्यामुळे आजकाल वाढणारं वजन ही एक गंभीर समस्या होत आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या काकडीचे पाणी (Cucumber Water)
काकडीमुळे कसं होतं वजन कमी
एका मध्यम आकाराच्या काकडीमध्ये दहा ग्रॅम कॅलरिज असतात. शिवाय भरपूर प्रमाणात फायबर्स आणि नव्वद टक्के पाणी असते. वजन कमी करण्यासाठी काकडीचे सॅलेड अथवा काकडीची कोशिंबीर खाणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञ्ज जलयुक्त आणि फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. एका संशोधनात तर असं आढळून आलं आहे की काकडीचे डाएट ( Cucumber Diet) फॉलो केल्यामुळे एक ते दोन आठवड्यामध्ये पाच ते सात किलो वजन कमी होते. अशा प्रकारच्या डाएटमध्ये दिवस भरात फक्त फळं, पालेभाज्या, प्रोटिनयुक्त पदार्थ जसं की अंडी, मासे, चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.
काकडीचे पाणी (Cucumber Water) पिण्यामुळे काय फायदा होतो
काकडीमध्ये पचनासाठी उपयुक्त घटक पदार्थ असतात जे या पाण्यात उतरतात. काकडीमधील एरेप्सिन हा घटक पदार्थत अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे तुमचे पोट निर्जंतूक राहते. शिवाय यातील फायबर्समुळे तुमच्या पोट स्वच्छ राहते. काकडी खाण्यामुळे तुम्हाला बराच वेळ भुक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही शरीरासाठी हानिकारक अथवा अपथ्यकारक पदार्थ जसे की जंकफूड, प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाता. काकडीचे पाणी पिण्याने तुम्ही सतत हायड्रेट राहता. शिवाय शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यामुळे तुमचे शरीर योग्य पद्धतीने डिटॉक्स होते. शरीरातील टॉक्सिन्सचा निचरा झाल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास चांगली मदत होते. शरीरातील जास्तीची चरबी कमी होते आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढते.
कसे बनवावे काकडीचे पाणी (Cucumber Water)
काकडीचे पाणी (Cucumber Water) याला तुम्ही डिटॉक्स वॉटरही म्हणू शकता. काकडीचे पाणी बनवण्यासाठी काकडी सोलून त्याचे लहान आकाराचे तुकडे तयार करा. पाण्याच्या मगमध्ये पाणी भरा त्यात हे काकडीचे तुकडे टाका. चवीसाठी तुम्ही यात थोडं लिंबू पिळू शकता. शिवाय उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी काही आईस क्यूब्स टाका. रात्री करून ठेवलेलं हे पाणी सकाळी उपाशीपोटी पिण्याने तुमचे शरीर योग्य पद्धतीने डिटॉक्स होईल आणि तुमचे वजन नियंत्रित राहिल.
आम्ही तुमच्यासोबत केलेल्या वेट लॉस टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टागाम
अधिक वाचा –
लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी