ADVERTISEMENT
home / आरोग्य
what-to-take-care-of-after-gallbladder-removal

पित्ताशय काढून टाकल्यानंतर काय काळजी घ्याल

पित्ताशय काढून टाकल्यानंतर तुम्ही आरामदायी आणि सर्वसामान्य जीवन जगू शकता. पित्ताशय काढून टाकणे ही एक सामान्यतः केली जाणारी शस्त्रक्रिया आहे आणि त्यासाठी वैद्यकीय संज्ञा पित्ताशयाची शस्त्रक्रिया आहे. पित्ताशयातील सर्वाधिक आढळून येणारी समस्या म्हणजे पित्ताशयातील खडे. इतर कारणांमध्ये संसर्ग, जळजळ, पित्ताशयातील पॉलीप किंवा व्हिपलच्या शस्त्रक्रियेसारख्या दुसर्‍या शस्त्रक्रियेचा भाग म्हणून समावेश होतो. याबाबत डॉ. अपर्णा गोविल भास्कर, लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन, सैफी हॉस्पिटल, अपोलो स्पेक्ट्रा, नमाहा आणि कुर्रे हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक माहिती घेतली. 

पित्ताशय ही एक लांबलचक थैली आहे जी तुमच्या यकृताच्या खाली असते. चरबीयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. पित्त यकृतामध्ये तयार होते. परंतु पित्त मूत्राशय पित्त संचयित करते आणि एकाग्र करते आणि आवश्यकतेनुसार ते सोडते. पित्त अन्नाचे विघटन करते आणि चरबीचे पचन करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा पित्ताशयाला पित्त सोडण्याचे संकेत मिळतात आणि पचन प्रक्रियेस मदत होते.

अधिक वाचा – पित्ताशयातील खडे घरगुती उपाय (Home Remedies For Pittashay Stone In Marathi)

पित्ताशय काढून टाकल्यावर काय होते?

पित्ताशयाशिवाय, सर्व पित्त यकृत आणि पित्त नलिकातून थेट लहान आतड्यात खाली येतात. कमी चरबीयुक्त अन्नपदार्थांच्या पचनासाठी हे चांगले आहे परंतु जर तुम्ही नुकतेच फॅटी, स्निग्ध किंवा जास्त फायबर असलेले अन्न घेतले असेल तर ते पचणे कठीण होऊ शकते, विशेषत: तुमच्या शस्त्रक्रियेनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पित्त मूत्राशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्या काही आठवड्यांपर्यंत चरबीयुक्त पदार्थांवर मर्यादा घालणे महत्त्वाचे आहे. पित्ताशयावरील शस्त्रक्रिया असलेले बहुतेक लोक त्यांच्या सामान्य दिनचर्यामध्ये कोणताही फरक न ठेवता पुढे जाऊ शकतात आणि काहींना ठराविक हालचाली, गॅसिसनेस, सूज येणे इत्यादी समस्या येऊ शकतात. तथापि, ही सर्व लक्षणे तात्पुरती आहेत आणि काही महिन्यांत निघून जातात.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Stomach Pain In Marathi)

या प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही सोप्या टिप्स आहेत

  • तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी थोडा वेळ द्या. जर तुम्ही लेप्रोस्कोपि अंतर्गत गेला असाल तर तुम्ही 24 ते 48 तासांत घरी जाऊ शकाल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही थेट तुमच्या दैनंदिन दिनचर्या पूर्ववत सुरु करु शकता. तुमच्या शरीराला थोडी विश्रांती द्या. अवयांमधील लय विकसित होऊ द्या. शस्त्रक्रियेनंतर किमान एक आठवडा काळजी घेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या पाळणे चांगले.
  • शस्त्रक्रियेनंतर पहिल्या 2 ते 3 दिवसांपर्यंत कमी चरबीयुक्त मऊ पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. नंतर तुम्ही सामान्य आहार घेऊ शकता परंतु कमीतकमी 4 ते 6 आठवडे कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करत असल्याची खात्री करा. 
  • एकाच वेळी भरपेट न जेवता थोड्या थोड्या अंतराने खात रहा आणि तळलेले अन्नपदार्थ टाळा
  • तळलेल्या अन्नामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादीत करणे गरजेचे आहे
  • जास्त चरबीयुक्त पदार्थ जसे मांस, चीज, दुग्धजन्य पदार्थ, पिझ्झा, बर्गर, पॅटीज, चॉकलेट, चिप्स, ग्रेव्हीज इत्यादी टाळा.
  • फायबरचे सेवन नियंत्रित करा: फायबर महत्वाचे आहे परंतु पित्ताशय काढून टाकल्यानंतर उच्च फायबर सामग्रीमुळे पोट फुगणे आणि गॅसयुक्त होऊ शकते. म्हणून, ब्रोकोली, फ्लॉवर, बीन्स, नट, तृणधान्य किंवा गव्हाचा ब्रेड, शेंगा, मोड आलेले कडधान्य इत्यादी कमी करा. हे सर्व मध्यम प्रमाणात घ्या.
  • कॅफिनचे सेवन मर्यादित करा: चहा, कॉफी, कोला पेये इ. पोटातील ऍसिडचे उत्पादन वाढवतात आणि गॅस निर्मिती वाढवतात. आता पोटातून पित्ताचे प्रमाण कमी होत असल्याने पोटदुखी आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • तुम्ही काय खाता याकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या पचनसंस्थेला साजेशा पदार्थांचे सेवन करा.चांगल्या आहाराच्या सवयींचे पालन करा. पित्ताशय काढून टाकल्यानंतर आरोग्यदायी आहाराच्या सवयी आरोग्यदायी जीवनशैली स्विकारणे अतिशय फायदेशीर ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली आहे ते निरोगी जीवन जगतात आणि संभाव्य गंभीर गुंतागुंत टाळतात जसे की संसर्ग, पित्ताशयातील खड्यांमुळे नलिकामध्ये निर्माण झालेलाअडथळा, स्वादुपिंडाचा दाह.

अधिक वाचा – पित्तावर घरगुती उपाय करून घरच्या घरीच मिळवा आराम (Pitta Var Upay In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT