ADVERTISEMENT
home / Fitness
हातापायांच्या नसा दिसणे वाईट नाही, जाणून घ्या कसे

हातापायांच्या नसा दिसणे वाईट नाही, जाणून घ्या कसे

खूप जणांच्या हातापायांच्या नसा अगदी स्पष्ट दिसतात. हातापायांच्या नसा स्पष्ट दिसू लागल्या की,उगाचच आपण शरीरात कशाची तरी कमतरता झाली अशी भीती वाटू लागते. पण हातांच्या नसा दिसण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हातांच्या नसा दिसणे हे नेहमीच वाईट नाही तर काही खास कारणामुळेही तुमच्या नसा दिसू शकतात. तुम्ही कधी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? हातापायांच्या नसा का दिसतात याची कारणे जाणून घेत ते चांगले की वाईट हे जाणून घेऊया.

अर्धांगवायू लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Paralysis Symptoms In Marathi)

हातांच्या नसा का दिसतात

हातांच्या नसा का दिसतात

Instagram

ADVERTISEMENT

हातांच्या नसा वेगवेगळ्या कारणांमुळे दिसू लागतात याची काही कारणे जाणून घेऊया म्हणजे तुमच्या हातांच्या नसा नक्की कशामुळे दिसतात याचा तुम्हाला अंदाज येईल.

  •  वय हे नस दिसण्यासाठी पहिले कारण आहे. जस जसे वय वाढत जाते तसतशी त्वचा ही सैल पडू लागते. त्वचा सैल पडू लागली की, तरी देखील अशा नसा दिसू लागतात. त्यामुळे वयोमानानुसार नसा दिसण्यामागे हे कारण असू शकते. 
  • शरीरातील फॅट कमी झाल्यानंतरही नसा दिसू शकतात. खूप जणांचे वजन कमी झाल्यानंतरही अशा समस्या होऊ शकतात.  वजन कमी झाल्यानंतर म्हणजे शरीरातील फॅट कमी झाल्यानंतरही तुमच्या अशा नसा दिसू लागतात.
  • वातावरणात बदल झाल्यानंतरही अशाप्रकारे नसा दिसू शकतात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळे नसा या अधिक रुंदावतात. अशावेळी देखील नसा दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या या दिवसात तुम्हाला असा त्रास होण्याची शक्यता असते. 
  • अनुवंशिकता  हे देखील नस दिसण्यामागे एक कारण असू शकते.जर तुमच्या हातांच्या नसा अगदी स्पष्टपण दिसत असतील तर त्यासाठी तुमच्या घरातील इतर कोणाच्या नसा अशा पद्धतीने दिसते का पाहा. अशा नसा दिसणे हे देखील यामगचे एक कारण असू शकते. 
  • व्यायाम करणाऱ्या लोकांच्याही नसा अशाप्रकारे दिसू शकतात. जर तुमच्या नसा अगदी स्पष्ट दिसत असतील तर तुमचा वर्कआऊट यासाठी कारणीभूत असू शकतो. तुमचे शरीर हे अॅथलेटिक आहे हे दाखवणारे असे एक लक्षण आहे. व्यायाम करणाऱ्यांच्या हाताच्या पायांच्या नसा अगदी सष्ट दिसतात. या नसा दिसणे अजिबात वाईट नाही.याची काळजी कऱण्याचे देखील काही कारण नाही

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Headache Home Remedies In Marathi)

अशा नसा दिसत असतील तर करा तपासणी

अशा नसा दिसत असतील तर करा तपासणी

Instagram

ADVERTISEMENT

हातापायांच्या नसा दिसणे वाईट नाही पण काही नसा दिसणे हे आरोग्यासाठी फारच घातक असते. Varicose veins या साधारण काळ्या रंगाच्या असतात अशा नसा दिसणे हे चांगले नसते. जर तुमच्या हातापायांवर या वेन्स दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. असे समजावे. अशा नसा या गुठळ्या किंवा एखाद्या गाठी असल्याप्रमाणे दिसू लागतात. पायांवर तुम्हाला अशा नसा दिसत असतील तर तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


आता हातापायांच्या नसा अशाप्रकारे दिसत असतील तर तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. 

गुळवेल चे फायदे जाणून घ्या (Gulvel Benefits In Marathi)

15 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT