ADVERTISEMENT
home / आरोग्य
मोड आलेले गहू

मोड आलेले गहू खा आणि मिळवा फायदेच फायदे

 पौष्टिक खायला आवडत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी एकदम खास आहे. आज आपण मोड आलेल्या गहूविषयी माहिती घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण कडधान्य भिजवून खातो. अगदी त्याचप्रमाणे गहू देखील भिजवून आणि मोड आणून खाल्ले जातात. पण गहू भिजवून त्यांना मोड आणून खाण्याचे नेमके फायदे काय? शिवाय त्याच सेवन कसे करायला हवे हे आज जाणून घेणार आहोत. मोड आलेली कडधान्य तुम्ही खात असाल आणि तर तुम्हाला भिजत घातलेला गहू खाण्यास काहीच हरकत नाही.

भिजवलेले गहू

ज्याप्रमाणे आपण इतर कडधान्य भिजवतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला गहू देखील भिजवायचे असतात. गहू साधारण तीन ते चार तासांसाठी भिजत घातल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका. पाणी काढून टाकल्यानंतर एका कपड्यामध्ये गहू काढून घ्या आणि त्याला मोड काढून घ्या. हे मोड आणलेले गहू चवीला फारच छान लागतात. याची चव गोड असते. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा मिळण्यास मदत मिळते.  

मोड आलेले गहू खाण्याचे फायदे

मोड आलेले गहू खाण्याचे फायदे

मोड आलेले गहू नेमके कसे फायदेशीर असतात. ते जाणून घेण्यासाठी पाहूयात मोड आलेले गहू खाण्याचे फायदे 

  1. खूप जणांना गव्हाची चपाती अजिबात आवडत नाही किंवा त्यांना तो पचतदेखील नाही अशावेळी तुम्हाला भिजवलले गहू किंवा मोड आलेले गहू हे अगदी आरामात खाता येतात. त्यामुळे गव्हामध्ये असलेले पौष्टिक घटक मिळण्यास मदत मिळते. 
  2.  मोड आल्यामुळे गव्हामधील पौष्टिक घटक वाढतात. त्यामुळे गव्हामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स तुम्हाला मिळायला मदत मिळते. 
  3. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी गहू हे उत्तम आहेत. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी गव्हाला मोड आणून तुम्ही ते देखील खाऊ शकता.त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत मिळते. 
  4. कॅल्शियमसाठी गहू हे उत्तम आहेत. मोड आलेल्या गव्हातून कॅल्शिअम मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कॅल्शिअमसाठी गव्हाचे सेवन करायला हवे. 
  5. ज्यांना डाएबिटीझचा त्रास आहे अशांसाठी तर मोड आलेले गहू एकदम उत्तम आहे. तुम्ही आहारात त्याचा अगदी हमखास समावेश करायला हवा 

असे खा मोड आलेले गहू

मोड आलेल्या गव्हाचे फायदे जाणून घेतल्यानंतर ते कसे खायचे असा विचार करत असाल तर त्यासाठी खास पदार्थ 

ADVERTISEMENT
  1. मोड आलेले गहू छान वाफवून घ्या. त्यामध्ये मस्त कांदा-टोमॅटो आणि लिंबू पिळून चाट म्हणून खा. 
  2. मोड आलेल्या गव्हाची उसळ देखील करता येते. तुम्ही ज्या पद्धतीने उसळ करता अगदी तशी उसळ करुन तुम्ही खाऊ शकता. 
  3. मोड आलेल्या गव्हापासून तुम्हाला गोड बनवायचे असेल तर त्याला गुळामध्ये शिजवून घ्या. ते देखील तुम्हाला मस्त खाता येतात. 

आता आहारात मस्त समाविष्ट करा मोड आलेले कडधान्य आणि राहा फिट

वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या या सोप्या सूप रेसिपीज, नक्की करुन पाहा

10 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT