ADVERTISEMENT
home / आरोग्य
Which sleep position gives you nightmares

का आणि कोणत्या स्लीपिंग पोझिशनमध्ये पडतात भितीदायक स्वप्न

तुम्ही तुमच्या बेडवर गाढ झोपलेला असता आणि अचानक तुम्हाला दचकून जाग येते… एका भितीदायक स्वप्नामुळे तुम्हाला घाम फुटतो आणि तुम्ही खडबडून जागे होता. असा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी तरी घेतलेला असतो. बऱ्याचदा तुमचं सगळं नीट सुरू असतं, मनात कोणतीही भीती अथवा ताण नसतो, कशाची चिंता नसते तरीही असं स्वप्न तुम्हाला पडू शकतो. मग तुम्ही दिवसभर असं का घडलं याची काळजी करत बसता. वास्तविक असं स्वप्न पडण्यामागे तुमची झोपण्याची स्थिती कारणीभूत असू शकते. यासाठी जाणून घ्या कोणत्या स्लिपिंग पोझिशनमध्ये पडतात भितीदायक स्वप्न

भितीदायक स्वप्न आणि  झोपण्याची  स्थिती

Which sleep position gives you nightmares

तुमची झोपण्याची स्थिती अथवा पोझिशन आणि भयानक स्वप्न यांचा एक अदभूत संबध आहे. सर्वात जास्त भयानक स्वप्न तुम्हाला उपडी झोपण्यामुळे अथवा छातीवर हात ठेवून झोपण्याच्या स्थितीत पडतात. अनेक संशोधनात असं आढळलं आहे की, भितीदायक स्वप्नांच्या मागे तुमचा ताणतणाव अथवा तुमची झोपण्याची पद्धत कारणीभूत ठरू शकते. असं  म्हणतात की छातीवर हात ठेवल्यास तुमच्या  शरीरावर त्याचा ताण  येतो. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर शिथील होते. या दरम्यान तुमचे ह्रदय, फुफ्फुसे आणि महत्त्वाचा म्हणजे तुमचा मेंदू मंदगतीने काम  करत असतो. अशा काळात शरीरावर पडलेला ताण त्यांच्या कामात अडचण निर्माण करतो. मेंदूला योग्य सूचना न मिळाल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये काही रासायनिक क्रिया घडतात आणि तुम्हाला भितीदायक स्वप्न पडतात. 

गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर होतात हे गंभीर परिणाम

झोपण्याची पोझिशन बदलण्यामुळे होतो का फायदा

जर तुम्हाला सतत अशी भितीदायक स्वप्न पडत असतील तर याचा तुमच्या भविष्याशी संबध लावण्यापेक्षा तुमच्या झोपण्याच्या स्थितीत बदल करा. कारण अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की तुमची झोपण्याची स्थिती या गोष्टीला कारणीभूत ठरू शकते. पोटावर, डोकं आणि हात उशीत खुपसून, अथवा पोटाजवळ पाय घेऊन झोपण्यामुळेही तुम्हाला भयानक स्वप्न पडू शकतात. कारण यामुळे तुमच्या मेंदूचे कार्य आणि विचारशक्तीवर ताण येतो. यासाठी अशा पोझिशनमध्ये झोपावं ज्यामध्ये तुमच्या शरीराला चांगला आराम मिळेल. 

ADVERTISEMENT

माणसं झोपेत नक्की का बोलतात, जाणून घ्या कारण

चांगल्या झोपेसाठी कोणती स्लीपिंग पोझिशन आहे योग्य

झोपण्याची अशी कोणतीच  आदर्श स्थिती नाही जी तुम्हाला शांत झोप आणि चांगली स्वप्न दाखवू शकते. कारण स्वप्न पाडणं  हे आपल्या हातात नाही. मात्र तुम्ही डाव्या कुशीवर झोपल्यास तुमच्या शरीराला चांगला आराम मिळतो. शिवाय झोपण्याआधी अर्धा तास तुमचा टीव्ही, मोबाईल बंद करा. कारण या गोष्टींमुळेही मेंदूवर ताण येतो. झोपण्याआधी दोन तास हलका आहार घ्या. मस्त मंद संगीत ऐका अथवा नामस्मरण करा आणि शांत झोपी जा. कारण तुम्ही झोपताना जसे विचार करता त्याचा  परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यावर होत असतो. 

तरुणांमध्ये या कारणामुळे वाढतोय निद्रानाशाचा त्रास

12 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT