भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

भाऊ मोठा असो वा छोटा असो. बहीण भावाचं किंवा भावाभावांचं नातं हे खूपच गोड असतं. त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी असतात पण दोघांनाही माहीत असतं की, त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण असं कधी होतं की, ते एकमेकांवरचं प्रेम दाखवत नाहीत. अशावेळी मिळणारी उत्तम संधी म्हणजे वाढदिवस. यासाठी POPxoMarathi तुमच्या मदतीसाठी आलं आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही छोटा असो वा मोठा भाऊ त्यांच्या वाढदिवशी देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. जे तुमचं नातं अजून दृढ करतील. चला आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.

Table of Contents

  भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश - Birthday Wishes For Brother In Marathi

  Canva

  आपल्या व्यक्तींचा वाढदिवस म्हटल्यावर आपण शुभेच्छा आवर्जून देतोच. आईसाठी वाढदिवस शुभेच्छा असो वा त्यातही जर लाडक्या भावाचा वाढदिवस असेल तर रात्री 12 वाजता सर्वात आधी विश करायचं असतं. नाही का, मग तुमच्या भावासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
  • भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 
  • तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 
  • जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 
  • तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
  • काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. 
  • आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
  • भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 
  • जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Birthday Messages For Brother In Marathi

  काहीजणांना साध्या सरळ शुभेच्छा द्यायला आवडतात तर काहींना कविता करायला आवडते. मग तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश द्या. 

  • साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 
  • आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या. 
  • फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
  • कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
  • वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
  • तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
  • तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

  वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

  मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Elder Brother In Marathi

  मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो. जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

  • थँक्यू दादा... तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
  • जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
  • दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. 
  • दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 
  • मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
  • माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
  • हॅपी बर्थडे दादा...येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत. 
  • हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

  वाचा - वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून

  लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Younger Brother in Marathi

  जसा मोठा दादा हक्काचा तसाच छोट्या भावावरही हक्क आपण गाजवतोच नाही का, हे कर रे.. ते कर रे म्हणत त्याच्याकडून सगळी काम करून घेतो. आपल्या छोट्या भावाला तुम्हीही नक्कीच तुमच्या कामाला लावून हैराण करत असाल. पण त्याच्या वाढदिवशी मात्र प्रेमळ मेसेज करून तो अविस्मरणीय करा. 

  • छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
   हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
   कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
   हॅपी बर्थडे छोट्या भावा
  • नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
   कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
   असा आहे माझा भाऊराया
   ज्याचा आज वाढदिवस आला,
   वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
  • हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
  • थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
   पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
   कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  • आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
   सर्वांचा लाडका आहेस तू
   माझी सर्व काम करणारा
   पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
   चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.
  • तुला हात पकडून चालायला शिकवलं
   प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
   आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
   हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
  • कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
  • तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस
  • मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
   आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.

  लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

  भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस - Birthday Status For Brother In Marathi

  Canva

  आता भावाचा वाढदिवस म्हटल्यावर स्टेटस रखना तो बनता है. मग तुमच्या भावाच्या वाढदिवसासाठी खास सोशल मीडियावर शेअर करण्याठी मराठमोळे बर्थडे मेसेजेस. 

  • जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
   जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
   माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं   
   पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता 
  • बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
   तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
   तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
  • लाखो दिलांची  धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
   आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
  • भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच,  इ.स .... साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं. लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या .... गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र .... यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
  • वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.  
  • जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 
  • आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
  • आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
   अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
   असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

  कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे फॅमिली कोटस

  भावासाठी बर्थडे कोट्स - Birthday Quotes For Brother In Marathi

  Canva

  तुमच्या लाडक्या भाईच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा तर द्याच आणि त्यासोबत कोट्ससुद्धा शेअर करा.

  • भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे.  
  • माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. 
  • माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 
  • कधी कधी भाऊ असणं हे सुपरहिरो असण्याप्रमाणे असतं. 
  • भावासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. 
  • जे बेस्ट फ्रेंड्स करू शकत नाहीत ते भाऊच करू शकतात.
  • माझ्या भावामुळे माझं लहानपण हे अविस्मरणीय झालं.  
  •  सुपरहिरोची गरजच काय जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे. 
  • भाऊ हा हृदयासाठी भेट आणि आत्म्यासाठी मित्र आहे. 
  • मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस आणि मुख्य म्हणजे तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस. लव्ह यू ब्रदर. 
  • माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही. 
  • माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.

  भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा - Funny Birthday Wishes For Brother

  Canva

  भावाच्या वाढदिवसाला काय सरळ साध्या मुळमुळीत किंवा गंभीर शुभेच्छा द्यायच्या असा तुमचा विचार असेल तर तुमच्या बंधूराजाच्या वाढदिवसाला द्या या मजेदार मराठमोळ्या शुभेच्छा. भाऊंचा बर्धडे होऊ दे जोरदार. 

  • डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे,  रसमलाई आणि केक सर्व आणा रे.. आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे.  हॅपी बर्थडे भाई. 
  • आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे...आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • चला आग लावू सगळ्या दुःखांना
   आज वाढदिवस आहे भाऊंचा... हॅपी बर्थडे भाऊ 
  • फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे....पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
   आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.
  • सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा. 
  • शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ...त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी... हॅपी बर्थडे भाऊराया.
  • #Dj वाजणार #शांताबाई‍ शालू-शीला नाचणार
   जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.
  • जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण...तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा

  बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Brother Birthday Messages From Sister

  Canva

  दूर असलो म्हणून काय झालं आजचा दिवस कसा विसरेन, तू नसलास जवळ तरी तुझी आठवण सोबत आहे दादा. आज तुझा वाढदिवस आहे जणू काही आमच्यासाठी सण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. 

  • हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी...तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा
  • लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
   हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
   मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार. 
  • मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला
   जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला
   भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
  • सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
   प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
   प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
   हॅपी बर्थडे भाऊ
  • आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात, तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा 
  • फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे ब्रो.
  • सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे भावा. 
  • हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
   माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
   माझ्या सर्वात प्रिय भावा
   तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  भावाकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes for Brother from Brother

  भावाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर भावाने तर शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. कितीही पटत नसलं तरी या दिवशी सगळं विसरून नक्की तुमच्या भावाला बर्थडे विश करा. 

  • हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
   आपल्या कर्तुत्वाची ख्याती
   स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
   व्हावी मनामनाची नाती.
   या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. 
  • सूत्रधार तर सगळेच असतात
   पण सूत्र हलवणारा एकच असतो
   आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
   शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
  • माणसे कमविण्यात जो आनंद आहे
   तो पैसे कमविण्यात नाही.
   हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
   या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.
  • संकल्प असावेत नवे तुमचे
   मिळाव्या त्यांना नव्या दिशा
   त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
   याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • जन्मदिवस एका दानशूराचा
   जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
   जन्मदिवस लाडक्या दादाचा.
  • मित्र नाही भाऊ आहे आपला
   रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
   वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा 
  • वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
   त्याची चर्चा ही होतच असते
   लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
   या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. 
  • तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
   प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
   अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • राजकारण तर आपण पण करणार
   पण निवडणुका नाय लढणार
   पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग
   अन आपण किंगमेकर असणार

  आपल्या भावांवर असलेलं प्रेम लपवू नका. तुमच्या मेसेजेसमधून ते व्यक्त करा. तुम्ही गप्प राहिलात तर तेही व्यक्त होणार नाहीत. कारण नात्यात कितीही चढउतार आले तरी एक भाऊच असतो. जो आपल्याला साथ देतो. प्रत्येक सुखदुःखात आणि संकटात आपल्यासोबत उभा राहतो. मग तुमच्या भावाच्या वाढदिवसाला हे मेसेजेस नक्की शेअर करा आणि त्यांना कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा.

  हेही वाचा :

  जन्मदिन की बधाई सन्देश

  महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं

  छोटी बहन के जन्मदिन पर शायरी