ADVERTISEMENT
home / आरोग्य
नवजात बाळाची काळजी

तान्ह्या बाळासाठी अस्वच्छता ठरु शकते धोकादायक, तुम्ही करत नाही ना या चुका

घरात तान्ह बाळ आलं की, घरात अनेक गोष्टी बदलू लागतात. घरातील सगळ्या गोष्टी अगदी नीटनेटक्या कराव्या लागतात. लहान बाळाला कशाचीही बाधा होऊ नये कोणतेही इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेतली जाते. पण काही नवमातांना सगळ्याच गोष्टी करणे जमत नाही.त्यातही आईपण हे वयाच्या तिशीनंतर आलेले असेल तर अशांना बरेचदा स्वत:ची आणि बाळाची काळजी घेताना त्रेधातिरपीट उडते. अशावेळी बाळाचे करता करता बाळाच्या आजुबाजूला स्वच्छता राखली जाते की नाही याची काळजी देखील घेतली जात नाही. तुम्हीही ही चूक करत असाल तर बाळाचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येऊ शकते. जाणून घेऊया नवमातांनी या चुका टाळण्यासाठी काय काय करावे

बाळाचे कपडे

आता लहान बाळ म्हटले की, त्याला दिवसभरात लागणाऱ्या लंगोटची संख्या ही विचारायलाच नको. बाळ जितक्या वेळा सू -शी करेल त्या त्यावेळी या कपडे बदलणे अनिवार्य असते. बाळाचे कपडे भरवताना किंवा शी-सू केल्यानंतर खराब झाले असतील तर बदला आणि वापरलेले कपडे इतरत्र फेकण्याऐवजी ते कपडे एकत्र करुन तुम्ही एका टबमध्ये टाका. कोणत्याही जंतुनाशकाच्या पाण्यात टाकून मगच हे कपडे धुवा. सगळ्यांच्या कपड्यांमध्ये बाळाचे कपडे कधीही धुवायला घालू नका. त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्यामुळे बाळांच्या कपड्याबाबत आईने अधिक सतर्क राहायला हवे.

डायपरचा वापर

सौजन्य: Instagram

खूप नवमातांना बाळाची सू-शी काढण्याचा कमालीचा कंटाळा असतो. त्यामुळे दिवसभर बाळांना डायपर घालणे ते अधिक पसंत करतात. लहान बाळांना डायपर जास्त वेळासाठी घालून चालत नाही. घरी असताना तर बाळांना डायपर मुळीच घालू नका. डायपरमध्ये बाळ सू-शी कधी करतं याच्या वेळांच्या अंदाज येत नाही. शिवाय तसेच राहिल्यामुळे बाळांना रॅशेश येण्याची संभावना असते. या अस्व्छतेमुळे बाळ फार चीडचीड करायला लागतात. डायपर घातल्यानंतर ते एकडे तिकडे फेकणंही चुकीचे आहे. डायपर हे इकडे तिकडे अजिबात फेकू नका. काही जणांना डायपर काढून भिरकावण्याची सवय असते. पण असे करत असाल तर तु्म्ही तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य धोक्यात घालत आहात.  डायपर काढून टाकल्यानंतर तुम्ही लगेचच कचऱ्याच्या डब्यात टाका. 

बाळंतपणासाठी होणाऱ्या आईने नेमकी काय करावी तयारी

ADVERTISEMENT

बाळाचे जेवण

बाळाच्या जेवणाबाबतही तुम्ही काळजी घेणे गरजेचे असते. बाळाच्या जेवणाचे ताट हे नेहमी स्वच्छ असायला हवे. बाळाची पाण्याची बाटली, दुधाची बाटली ही स्वच्छ असायला हवी. बाळासाठी पाणी गरम करणारे भांडे  हे देखील स्वच्छ असायला हवे. डॉक्टरांना विचारुन तुम्ही क्लिन्झर विचारुन घ्या. बाळाच्या ताटात अन्य कोणत्याही गोष्टी असायला नको. त्याला साबणाचा वासही येता कामा नये. याची काळजी घ्या. 

गरोदरपणात वाचायची ही पुस्तके आणि अधिक माहिती मिळवायची (Books To Read During Pregnancy)

लहान मुलांची खेळी आणि स्ट्रोलर

लहान मुल एखाद्या वस्तूंना हात लावायला सुरु झाल्यानंतर ती खेळणी तोंडात घालण्यास सुरुवात करतात. अशावेळी मुलांची खेळणी स्वच्छ ठेवणे ती जागच्या जागी उचलून ठेवणे गरजेचे असते.  खेळण्यांसोबत मुलांना तुम्ही स्ट्रोलर किंवा वॉकरमध्ये बसवत किंवा फिरवत असाल ते स्टोलर तुम्ही एकदा चेक करा. कारण खूप वेळा हे स्टोलर खूप घाणेरडे आणि अस्वच्छ झालेले असतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीही चेक करा. जर यामध्ये अन्नकण किंवा सू-शी असेल तर त्याचा त्रास बाळांना अधिक होतो.

लहान बाळांना डायपर्स घालताय मग एकदा वाचाच

ADVERTISEMENT

आता बाळांच्या आईने ही काळजी घ्यायला मुळीच विसरु नका.

03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT