प्रत्येक डॉक्टर आणि अगदी घरातील वडिलधारी मंडळी नेहमी सल्ला देतात तो फळ खाण्याचा. खरंय कारण फलाहार तुमच्या शरीरावर करतो जादुई परिणाम. तुमचं लाईफस्टाईल कसंही असो फलाहार केल्याने तुम्ही जास्त सक्रिय राहता. कारण तुम्ही पोटभर फळ खाल्लीत तरी ती लवकर पचतात आणि तुम्हाला पुन्हा पोट रिकामं असल्यासारखं वाटतं. मग तुम्ही डाएट फॉलो करत असाल किंवा नसलात तरी फलाहार हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पूर्णतः फलाहार
जेवणाआधी किंवा जेवणानंतर फळ खाणं किंवा नाश्त्याच्या वेळी फळ खाणं वेगळं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जेवणाच्या वेळी पूर्णतः फलाहार करू शकता. असं असेल तर तुम्हाला जेवणासाठी जास्त वेळ द्यावा लागेल आणि सावकाश फळ खावी लागतील. कारण फळ खाल्ल्यावर तुम्हाला कधीच पोट जड झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला लगेच दोन तासानंतर पुन्हा काहीतरी खावंस वाटेल. त्यामुळे पूर्णतः फलाहारासाठी तुम्हाला जास्त उर्जा आणि रिकाम्या पोटी राहण्याची सवय करून घ्यावी लागेल. फलाहार केल्यावर तुमचा मेंदू जास्त वेगाने कार्यरत होतो. त्यामुळे या काळात तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम होईल.
फलाहाराचे फायदे
तुमचं काम जास्त शारीरिक कष्टाचं असेल तर फलाहारामुळे तुम्हाला सतत ताजंतवान वाटेल. तुम्हाला कधीच सुस्ती आल्यासारखं वाटणार नाही. कारण फळांमधील जीवनसत्त्व तुमच्या शरीरात जलदगतीने उपयोगात आणली जातात. पण लक्षात ठेवा हा फलाहार ज्यूसच्या रूपात नाहीतर फळ कापून किंवा सोलून खाणं अपेक्षित आहे. यामुळे तुम्हाला फळातील जीवनसत्त्व आणि फायबर हे दोन्ही घटक चांगल्यारितीने मिळतात.
Shutterstock
फलाहार निर्सगासाठीही चांगला
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे चांगल आहे. कारण प्रत्येकाने आपल्या आहारातील कमीत कमी 30% भाग हा फळांच्या रूपात घेतला पाहिजे. जर तुम्ही तुमचा 30% आहार हा झाडांच्या फळरूपात असेल तर शेतजमीन आणि इतर अन्नघटकांवरील ताण कमी होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने हे खूप चांगलं ठरेल.
फलाहार घेण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी
फलाहार आरोग्यासाठी चांगला असला तरी तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या फळांची स्थिती नक्कीच माहीत असेल. त्यामुळे हे थोड त्रासदायक आणि खर्चिकही आहे. कारण आता पूर्वीसारखी देशी फळ बाजारात मिळत नाहीत. आजकाल बाजारात मिळणारी फळ ही आकाराने मोठी आणि दिसायला छान असतात. पण त्यातून मिळणारी जीवनसत्त्व फारच कमी असतात. त्यामुळे फळ खरेदी करताना ती शक्यतो ऑर्गेनिक पद्धतीने पिकवलेली असतील याची काळजी घ्या.
* फळ खरेदी करताना घ्या ही काळजी
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजपासूनच फलाहार घ्यायला सुरूवात करा. जो लवकर पचतो आणि आपल्या शारीरिक व्यवस्थेवरही कमी तणाव टाकतो.
हेही वाचा –
पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं
उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’