ADVERTISEMENT
home / आरोग्य
कमोडवर बसून मोबाईल वापरणाऱ्यांनी वेळीच व्हा सावधान

कमोडवर बसून मोबाईल वापरणाऱ्यांनी वेळीच व्हा सावधान

 

बदलत्या काळात टेक्नोलॉजीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरही होत आहे. आज अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल असतो. खरंतच आज मोबाईल आपली चौथी मोठी गरज बनला आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्य परिस्थितीत आपण मोबाईलपासून अगदी काही मिनिटंही दूर राहू शकत नाही. एवढंच काय तर टॉयलेटला जातानाही बरेच जण मोबाईलसोबत घेऊन जातात आणि तिकडे बसल्या बसल्या त्याचा वापर करतात. कारण टॉयलेटमध्ये आरामात बसून सोशल मीडियावर टाईमपास करता येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, ही सवय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. कसं ते जाणून घ्या. 

Shutterstock

 

तब्बल 60 टक्के लोकंही टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करतात, असं एक रिसर्चमध्ये समोर आलं आहे. एक्सपर्ट्सनुसार जे लोकं कमोडवर बसून मोबाईलचा वापर करतात, त्यांना मोबाईलचे दुष्परिणाम जाणून घेणेही गरजेचे आहे, अशा व्यक्तींना पाईल्स होण्याची भीती असते. कारण परदेशात करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार कमोडवर बसून मोबाईल वापर करतात. त्यांना अनेक आजार होत असल्याचं समोर आलं आहे आणि त्यात पाईल्ससारख्या भयंकर आजाराचाही समावेश आहे.  

Giphy

ADVERTISEMENT

 

कारण रिसर्चमध्ये हे आढळलं की, जास्तवेळ कमोडवर बसल्याने तुमच्या नसांवर दबाव पडतो. तुम्ही कितीवेळ मोबाईल घेऊन कमोडवर बसता त्यावर तुम्हाला हेमरॉईड्स किंवा पाईल्स किंवा बद्धकोष्ठ होण्याचा धोका वाढतो. तुम्ही जितका वेळ टॉयलेटमध्ये बसून फोन वापराल तेवढा वेळ तुमच्या एनस आणि लोअर रेक्टमच्या मांसपेशींवर आणि नसांवर प्रेशर वाढू लागतं आणि पाईल्स होण्याचा धोका वाढतो.

 

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

पाईल्स होण्याची टांगती तलवार

 

शौचाच्या जागी जास्त जोर लावल्याने पाईल्सचा त्रास होतो. पण काही वर्षात हे आढळलं आहे की, कमोडवर बसून मोबाईलचा वापर केल्यास पाईल्सची तक्रार वाढत आहे. 

 

ADVERTISEMENT

Shutterstock

 

एकीकडे पाईल्स होण्याचा धोका तर दुसरीकडे ही सवय स्वच्छतेच्या दृष्टीनेही हानीकारक आहे. कारण शौचालयात जास्त वेळ बसणं हे हायजिनसाठी चांगलं नाही. त्यामुळेही श्वसनमार्गे अनेक जंतू तुमच्या शरीरात जाऊन इतरही रोग होण्याची शक्यता वाढते. 

मग तुम्हालाही आहे का टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय मग आजच बदल करा. नाहीतर काही वेळाचा टाईमपास पुढे जाऊन महागात पडू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी शौचाला जाताना मोबाईल आत नेऊ नका.

 

मुळव्याधीचा त्रास होतोय, या घरगुती उपायांनी मिळेल लवकर आराम

ADVERTISEMENT

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

 

हेही वाचा –  जागतिक प्रसाधन दिनानिमित्त भारतात महिलांसाठी पहिली पावडर रूम

20 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT