ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
हिवाळ्यात तुम्ही तास-न्-तास उन्हामध्ये बसता? मग वेळीच व्हा सावध

हिवाळ्यात तुम्ही तास-न्-तास उन्हामध्ये बसता? मग वेळीच व्हा सावध

थंडीचे महिने अजूनही संपलेले नाहीत. त्यामुळे वातावरणातील थंडावा कायम आहे. थंडीच्या दिवसात आपण उन्हामध्ये बसून शरीराला उब देण्याचं काम करतो. 10 पैकी 9 जण कोणत्याही संरक्षणाविनाच उन्हामध्ये जाऊन बसतात. हिवाळ्यात उन्हे अंगावर घेताना त्वचेचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, असा बहुतांश जणांचा समज असतो. पण खरं तर हा गैरसमज आहे. हिवाळ्यामध्ये उन्हामुळे त्वचा काळवंडते. हिवाळ्यात काळवंडणाऱ्या त्वचेवर वेळेची उपाय करावा. अन्यथा काळवंडलेल्या त्वचेवर काहीच उपाय होऊ शकत नाहीत. त्वचेचा मूळ रंग पुन्हा मिळवणं कठीण नाहीच तर अशक्य आहे. त्यामुळे वेळीच यावर उपाय करावेत. स्कीन टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जाणून घेऊया काही खास टिप्स :

(वाचा : सावधान ! ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका)

उटण्याचा वापर : 

उटण्याचा वापर करून आपण स्कीन टॅनिंगपासून आपण सुटका मिळवू शकतो. आंघोळ करण्यापूर्वी हळद, चंदन आणि चण्याचं पीठ एकत्र करून उटणं तयार करावं. हे उटणं त्वचेवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवावे त्यानंतर आंघोळ करावी. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे उटणं अंगाला लावून आंघोळ करावी. यामुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

(वाचा : तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे)

गरम पाण्यानं आंघोळ करावी : 

जर तुम्ही थंडीमध्ये थंड पाण्यानं आंघोळ करत असाल तर स्कीन टॅनिंगची समस्या पूर्णतः कमी होऊ शकत नाही. पण गरम पाण्यानं आंघोळ केल्यास स्कीन टॅनिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते. गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं शरीरावरील सर्व दुर्गंधी स्वच्छ होते. गरम पाण्यामुळे शरीरावरील छिद्रांमधील विषारी घटक, दुर्गंध बाहेर फेकली जाते.  

(वाचा : आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम)

ADVERTISEMENT

त्वचेला मॉईश्चरायझर लावणं गरजेचं :

हिवाळ्यात काळवंडणाऱ्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेला मॉईश्चरायझर लावणं देखील गरजेचं आहे. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा कोरडी राहत नाही. आंघोळ केल्यानंतर केवळ चेहऱ्यालाच नाही तर संपूर्ण शरीराला मॉईश्चरायझर लावावे. पण ज्यांना आंघोळीनंतर मॉईश्चरायझर लावण्यास वेळ मिळत नसल्यास त्यांनी पाण्यामध्ये थोडेसं बॉडी ऑईल टाकावे आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी. 

(वाचा : उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पाच अन्नपदार्थांचं करा सेवन)

डॉक्टरांचा सल्ला : 

ADVERTISEMENT

स्कीन टॅनिंगच्या समस्येतून तुम्हाला अगदीच सुटका मिळत नसल्यानं डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करावे. क्रीम, मॉईश्चरायझर, त्वचेची काळजी घ्यावी. 

(वाचा : सावधान! तणावामुळे तुमच्या ‘या’ शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

10 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT