महिला या आरोग्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. डॉक्टरांकडे जाण्याचा कंटाळा, पैसे वाचवण्यासाठीची धडपड यामुळे महिला या डॉक्टरांकडे जाणे टाळतात. पण काही लहान लहान संकेत मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात. आरोग्यासंदर्भात तुम्हाला काही तक्रारी जाणवत असतील तर तुम्ही या संकेतांकडे मुळीच दुर्लक्ष करायला नको. जर तुम्हालाही काही त्रास होत असतील तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करु नका.
वजन वाढणे किंवा कमी होणे
फिटनेस हा हल्ली सगळ्याच महिलांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे वजन कमी करणे खूप महिलांसाठी फार महत्वाचे असते. हल्ली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला व्यायाम करताना दिसतात. पण कधी कधी काहीही न करता महिलांचे वजन हे अचानक वाढू किंवा कमी होऊ लागते. तुमचेही वजन असे अचानक कमी आणि जास्त होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण वजन वाढ आणि कमी होणे हे काही खास आजारांचे लक्षण आहे. मधुमेह, हार्मोन्समध्ये बदल, थायरॉईड या त्रासामुळे देखील असे वजन वाढू आणि कमी होऊ शकते.
तोंड सतत सुकणे
महिलांनाच नाही तर कोणालाही असा त्रास होऊ शकतो. खूप जणांना तोंड सुकण्याचा त्रास होतो. सतत तोंड सुकणे हे शरीरातील काही कमतरता दाखवत असतात. तोंड सतत सुकत असेल आणि तोंडात नैसर्गिक लाळ तयार होत नसेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असण्याची शक्यता आहे. यावर काही चाचण्या करुन योग्य सल्ला घेण्याची गरज असते. त्यामुळे तुम्ही तोंड सुकत असेल तर तातडीने डॉक्टरकडे जा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या. तुम्हाला काही गोळ्या दिल्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकतो.
केस गळणे
केस गळणे हे महिलांसाठी अगदी सर्वसामान्य आहे. पण केसांची गळती जास्त होत असेल तर आरोग्यविषयक काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता ही नक्कीच जास्त असते. केस गळणे हे शरीरातील काही गोष्टींची कमतरता दाखवते. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूप वाढले असेल तर याचे कारण व्हिटॅमिन्सची कमतरता, चुकीचा आहार किंवा कमी आहार यामुळे देखील केस गळू शकतात. त्यामुळे केसांना चाई पडण्याची शक्यता असते. केस गळतीचे प्रमाण जास्त होत असेल तर तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
सतत चिडचिड होणे
पिरेड्समध्ये महिलांची चिडचिड होणे हे अगदी स्वाभाविक असते. पण काही महिलांची चिडचिड ही अगदी क्षुल्लक आणि सतत होत राहते. महिलांची अशी चिडचिड होणे हे देखील आरोग्याच्या काही तक्रारी नक्कीच असतात. हार्मोन्स कमी-जास्त होणे, झोप पूर्ण न होणे निद्रानाशाचा त्रास होणे, सेक्स कमी होणे यामुळे देखील असे काही त्रास होऊ शकतात. शारीरिक हानीसोबत हा मानसिक आरोग्याशी निगडीत असा त्रास असू शकतो.
अंगदुखी
अचानक अंग दुखणे, हाडाहाडांमधून सणक जाणे असे काही त्रास तुम्हाला होत असेल तरी देखील ही काही गंभीर समस्या असू शकते. कारण महिलांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण 25 नंतर कमी व्हायला लागते. जर शरीरातील कॅल्शिअम कमी होऊ लागले असेल तर तुम्हला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
जर तुम्हाला काही तक्रारी जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच याकडे दुर्लक्ष करु नका.