घरात एकदा बाळाचा जन्म झाला की, त्याच्याशी खेळण्यात वेळ कसा जातो हे घरातील लोकांना कळंत देखील नाही. बघता बघता बाळाच्या नामकरण विधीचा क्षण जवळ येतो. मुलगा असो वा मुलगी बाळाचा नामकरण विधी आजकाल मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. साधारणपणे बाळाच्या जन्माच्या बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्याने बाळाला साजेसं नाव दिलं जातं. यासाठी कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी बारशाला जमा होतात. तुमच्या छकुलीला छान असं मराठी नाव देण्यासाठी तुम्ही बारशाचा घाट घातला असेल तर तुमच्या तान्हुलीसाठी निवडा ही खास य अक्षरावरून मुलींची नावे, या वरून मुलींची नावे अथवा यु वरून मुलींची नावे ( Y Varun Mulinchi Nave Marathi) कारण बाळाला नाव हे नेहमी त्याच्या नावराशीत आलेल्या आद्याक्षरावरून दिलं जातं. तेव्हा तुमच्या बाळासाठी कोणतं आद्याक्षर आलं आहे ते बघा आणि निवडा ही खास य वरून मुलींची नावे… यासोबतच वाचा य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi देखील
Table of Contents
- य वरून मुलींची नावे – Y Varun Mulinchi Nave Marathi
- य अक्षरावरून मुलींची युनिक नावे – Unique Baby Girl Names That Start With Y
- या वरून मुलींची क्युट नावे 2022 – 2022 Cute Baby Girl Names From Ya
- यु वरून मुलींसाठी मॉडर्न नावे – Modern Baby Girl Names Start From Y In Marathi
- य वरून मुलींची दोन अक्षरी नावे – Two letter names of girls from Y
- य वरून मुलींची लेटेस्ट नावे – Y Varun Mulinchi Nave
- बाळाचे नाव ठेवण्याबाबत प्रश्न – FAQs
य वरून मुलींची नावे – Y Varun Mulinchi Nave Marathi
बारशाच्या दिवशी घरात एकच लगबग सुरू असते. कारण या विधीपासून तुमच्या बाळाला नावाच्या रूपात स्वत:ची नवी ओळख मिळणार असते. ज्यामुळे बाळाचे आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू, मावशी-मामा एक छान नाव शोधू लागतात. हिंदू धर्मात नावराशीने नाव देण्याची पद्धत असल्यामुळे गुरूजींकडून बाळासाठी खास नावराशीची आज्ञाक्षरे काढली जातात. त्यानुसार बाळाला नाव दिलं जातं. यासाठी खास य वरून मुलींची नावे.
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
यशस्वी | यश मिळवणारी |
यशवंती | यश मिळवणारी |
यशिका | यश मिळवणारी |
यशस्विनी | यश मिळवणारी |
यजता | पवित्र |
यजुशी | चांगली |
यज्ञशा | मौल्यवान |
यमुना | एक नदी |
यशदा | यश देणारी |
यशोदा | कृष्णाची माता |
यशोधरा | गौतम बुद्धाची माता |
यश्वी | भाग्यशाली |
यक्षत्रा | तेजस्वी |
यशानी | यश मिळवणारी |
यशिता | प्रसिद्ध |
यशमिता | यश मिळवणारी |
यग्निता | पूजा |
योगिता | सुंदर |
योगेश्वरी | देवी पार्वती |
योगन्या | सत्य |
य अक्षरावरून मुलींची युनिक नावे – Unique Baby Girl Names That Start With Y
आपल्या बाळाला एखादं युनिक नाव द्यावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. मात्र असं नाव देताना त्याला छान पारंपरिक आणि महत्त्वाचा अर्थ असावा अशीही त्यांची इच्छा असते. अशा वेळी जर हे नाव एखाद्या खास आज्ञाक्षरावरून असावे असा घरातील मोठ्या मंडळींचा सल्ला असेल तर तुमच्या छकुलीसाठी निवडा तुमच्या छोट्याशा परीसाठी जर नाव शोधत असाल तर निवडा यातील य वरून मुलींची नावे 2022
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
यश्रीता | सुंदर |
यफिता | मुक्त |
यफिन | सुंदर |
यहवा | पृथ्वी आणि स्वर्ग मिलन |
यहवी | पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन |
यजना | धार्मिक |
यजाता | पवित्र |
यक्षिता | आश्चर्यकारक स्त्री |
यलिनी | सरस्वती |
यमाना | पवित्र |
यमिका | रात्र |
यमृता | चांगली |
यमुरा | चंद्र |
यन्ती | पार्वती |
यरह | उष्ण |
यशाश्वी | प्रसिद्ध |
यमहा | कबूतर |
यथार्था | सत्य माहीत असलेली |
यस्तिका | मोत्याची माळ |
योगदा | दुर्गा माता |
तुमच्या मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi) ही देखील जरूर वाचा.
या वरून मुलींची क्युट नावे 2022 – 2022 Cute Baby Girl Names From Ya
लहान मुली या दिसायला सर्वात जास्त गोड असतात. आकर्षक हास्य आणि गोंडसपणामुळे त्या सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतात. अशा वेळी तुमच्या छोट्या परीला नावही तितकंच गोड आणि क्युट द्यायला हवं. यासाठी आम्ही तुमच्यासाठी सूचवत आहोत काही खास नावं. जर तुमच्या बाळासाठी या नावराशी नाव आलं असेल तर त्यासाठी खास या वरून मुलींची नावे
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
यासना | इच्छा |
याम्या | पवित्र |
याधना | हास्य |
याद्वा | मन |
यावही | तेजस्वी |
यामिनी | रात्र |
यालीनी | सरस्वती |
यामिका | रात्र |
यासना | प्रार्थना |
याशिका | यश मिळवणारी |
याशिला | श्रीमंत |
यासमिता | प्रसिद्ध |
यासिरा | श्रीमंत स्त्री |
यामृता | पवित्र |
यामिना | चांगली |
याज्ञिता | पूजा |
यागवि | उज्ज्वल |
याहस्मिता | शक्तिशाली |
योशिता | स्त्री |
याचना | प्रार्थना |
वाचा यासोबतच ‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण | Baby Girl Names Start With Th
यु वरून मुलींसाठी मॉडर्न नावे – Modern Baby Girl Names Start From Y In Marathi
बाळासाठी नावराशी नाव काहीही आलं तरी तुम्ही त्या नावावरून बाळाला क्युट, गोंडस आणि मॉर्डन नाव देऊ शकता. यासाठी आम्ही काही यु वरून मुलींची नावे तुमच्यासाठी निवडली आहेत. ज्यामुळे जरी नाव यु असलं तरी तुम्हाला तुमच्या बाळाला थोडंसं वेगळं आणि अर्थपूर्ण नाव देता येईल. विशेष म्हणजे या नावाचे अर्थ हे हिंदू परंपरेला जोडणारे आणि चांगले असल्यामुळे घरातील मोठी मंडळीही ही नावे ऐकून खूश होतील.
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
युक्ता | हुशार |
युवांशी | तरूण |
युगंधरा | पृथ्वी |
युवाना | तरूण |
युतीका | फुल |
युवांश्री | तरूण |
युवप्रिया | तरूण |
यूभाषणा | लक्ष्मी |
युगांतिका | शेवटपर्यंत असलेली |
युवाक्षी | सुंदर डोळे असलेली |
युवराणी | राजकन्या |
युधजित | युद्धात जिंकणारी |
युवानी | तरूण |
युवांतिका | सुंदर |
युथिका | फुल |
युक्ताश्री | प्रतिभाशाली |
युवसरी | तरूण |
युवती | तरूण मुलगी |
युस्मा | सुंदर |
युक्त्वा | शोषून घेणारी |
योजन गंधा | सुगंध पसरवणारी |
यौवना | तरूण |
य वरून मुलींची दोन अक्षरी नावे – Two letter names of girls from Y
काही पालकांना त्यांच्या मुलांची नावे अगदी लहान, सोपी आणि अर्थपूर्ण असावीत असं वाटत असतं. कारण अवघड नावं मुलांना लिहिताना अथवा पाठ करण्यास कठीण जातात. शिवाय इतर मंडळी त्यांना नाव नीट उच्चारता आलं नाही तर चुकीच्या पद्धतीने मुलांना हाक मारतात. यासाठी य अक्षरावरून सुरु होणारी अगदी दोन अक्षरी नावे आम्ही तुमच्यासाठी सूचवत आहोत.
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
यक्षा | देवदूत |
यज्ञा | यज्ञ एक धार्मिक विधी |
यंती | पार्वती |
येशा | ईश्वरी अंश असलेली |
युती | मिलन |
याज्ञा | सत्य |
यावी | सुंदर |
यशा | प्रसिद्ध |
यश्री | पार्वती |
यजा | धार्मिक |
यशी | प्रसिद्ध |
यती | तपस्वी |
यभा | हत्ती प्रमाणे सुंदर |
यारा | प्रकाश |
यासी | प्रसिद्ध |
य वरून मुलींची लेटेस्ट नावे – Y Varun Mulinchi Nave
जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव लेटेस्ट ट्रेंडनुसार ठेवायचे असेल तर त्यासाठी काही नावे आम्ही तुम्हाला सूचवत आहोत. वास्तविक मुलांना जुनी, पारंपरिक नावे देण्याचाच ट्रेंड कधीच जात नाही. कारण अशा नावांना सुंदर अर्थ असतात. त्यानुसार तुमच्या लेकीसाठी ही काही य वरून मुलींची लेटेस्ट नावे
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
यज्वरी | यज्ञ करणारी |
योनिनी | योग विद्या जाणणारी |
यमजा | जुळ्या मुली |
यशोधरा | यश मिळवणारी |
योगमाला | दुर्गा |
योशिता | यशस्वी |
यश्विनी | यशस्वी |
येसिका | गंभीर |
योचना | विचार |
यास्मिन | फुल |
येनाली | सुंदर |
बाळाचे नाव ठेवण्याबाबत प्रश्न – FAQs
प्रश्न – बाळासाठी योग्य नाव कसे निवडावे ?
उत्तर – बाळासाठी नाव निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवावी की, हे नाव आयुष्यभर बाळाची ओळख निर्माण करणारे आहे. त्यामुळे ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, अर्थपूर्ण आणि युनिक असावे.
प्रश्न – नावराशीवरून बाळाला नाव कसे दिले जाते ?
उत्तर – हिंदू संस्कृतीमध्ये बाळाच्या जन्मतारिख आणि वेळेनुसार त्याची रास आणि जन्म नक्षत्र पाहिले जाते. त्यानुसार गुरूजी काही आज्ञाक्षरे सूचवतात. या आज्ञाक्षरावरून बाळाला साजेसं नाव निवडलं जातं.
प्रश्न – बाळाची जन्मरास कशी ओळखतात ?
उत्तर – बाळाचा जन्म झाल्यावर त्या दिवशी असलेली तिथी आणि जन्माची वेळ पाहिली जाते. त्या क्षणी ज्या राशीमध्ये चंद्र असेल तिच बाळाची जन्मरास म्हणून ओळखली जाते.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली य वरून मुलींची नावे ( Y Varun Mulinchi Nave), य वरून मुलींची नावे 2022 ( Y Varun Mulinchi Nave Marathi), या वरून मुलींची नावे, यु वरून मुलींची नावे, य वरून मुलींची दोन अक्षरी नावे, य वरून मुलींची लेटेस्ट नावे तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणतं नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडलं हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा