‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असेल. कारण ओम आणि स्वीटू यांचं फायनली लग्न होतयं. अनेक चॅलेंजेस पार करत ओम-स्वीटू एकत्र येणार आहेत. पण हे काही सहजासहजी होईल असे मुळीच वाटत नाही. कारण आता या लग्नात व्यत्यय आणण्याचे काम नेहमीप्रमाणे मालविका आणि मोहीत करत आहेत. या लग्नात स्वीटूच्या कुटुंबाचा अपमान होण्याची एकही संधी सोडत नाहीए. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये लग्नघटीका समीप येताच स्वीटूच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर आश्चर्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता काय होईल याची चिंता सगळ्यांना आहे.
वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी …
मालविका आणणार व्यत्यय
अनेक संकटांना तोंड देऊन स्वीटूच्या घरी ओम-स्वीटूचा साखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा करतानाही मालविकांने नलू मावशीला गरिबी दाखवण्याची एकही संधी सोडलेली नाही. साखरपुड्यातही तिने नलूला चांगलेच बोलून दाखवले आहे. पण यामध्ये ओमने स्वीटूच्या कुटुंबाला सावरुन घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. हे लग्न होईपर्यंत मालविकाला या लग्नात अनेक व्यत्यय आणायचे हे नक्की! इतकेच नाही तर आता भटजींच्या तोंडून स्वीटूला नवऱ्याचे सुख मिळणार नाही असे सांगून देखील तिच्या कुटुंबाला त्रास देण्याचा तिचा डाव आहे.
लग्न पडेल का पार?
आता नवा प्रोमो पाहिल्यानंतर स्वीटूचे लग्न नीट पार पडेल ना ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. नाहीतर या मालिकेमध्ये कोणतातरी ट्विस्ट येणार आहे हे मात्र नक्की! आता मालिकेतला हा ट्विस्ट नेमका काय असेल ते आपल्याला मालिका पाहिल्यानंतरच कळेल. त्यासाठी आपल्याला आजच्या दिवसाची वाट पाहावी लागेल.
स्वीटूचे संगीत
मालिकांमधील लग्न यासाठीच खास असतात कारण त्यामध्ये लग्न कसे केले जाते. कोणते कपडे घातले जाते. याचे खास आकर्षण सगळ्यांना असते. स्वीटूने साखरपुड्यात लाल रंगाची मुनिया काठाची पैठणी नेसली होती. तर तिने संगीतसाठी रामा ब्लू रंगाची ब्रोकेडसाडी नेसली आहे. तिने लाल रंगाचा ब्लाऊज आणि त्याला थोडा साऊथ इंडियन लुक देण्यासाठी त्यामध्ये एक कंबरेचा पट्टा घातला आहे. त्यामुळे तिचा लुक हा चांगलाच उठून आला आहे. स्वीटू अर्थात अवनीचे केसही लांब असल्यामुळे तिच्या चांगल्या हेअरस्टाईल पाहायला मिळत नाही.
आता राखीचा नवा ड्रामा, बनली स्पायडर वुमन
मराठी मालिकांचा तडका
झी मराठीवर मालिकांचा नवा धडाका पाहायला मिळणार आहे. अनेक नव्या मालिका भेटीला येणार आहत. त्यामुळे या जुन्या मालिकांसोबत काही नव्या मालिका पाहायला मिळणार आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव’ या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार ही जोडी पाहायला मिळणार आहे. ‘मन उडु उडु झालंय’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत ह्रता दुर्गुळे आणि अंजिक्य राऊत यांची जोडी पाहायला मिळणार आहे.
आता या लग्नात नेमकं काय विघ्न येणार आणि स्वीटू त्याला कशी मात देणार ते जाणून घेऊया.