ADVERTISEMENT
home / मनोरंजन
om sweetu

ओम जिंकला चँलेज,पण मालिकेमध्ये या कारणामुळे आला ट्विस्ट

 ओम कधी एकदा 25 हजार रुपये कमावतो आणि स्विटूशी लग्न करतो असे सगळ्यांनाच झाले आहे. नलू मावशीने ओमला केलेले चँलेज अखेर ओम जिंकला आहे. नुकतेच दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये ओम आपण जिंकल्याचा आनंद व्यक्त करत स्विटूच्या घरी बँड बाजा वाजवत वरात आणताना दिसत आहे. पण मालिका असेल तर इतकी सोपी कशी असेल नाही का? आता या मालिकेला ट्विस्ट देण्यासाठी मालिकेत असे काही घडले आहे की, त्यामुळे ओमच्या जिंकण्याचा आनंद दूर आणि नको त्या गोष्टीचे नाहक टेन्शन सगळ्यांना येणार आहे. जाणून घेऊया आता या मालिकेत नेमकं पुढे काय होईल?

 ओम जिंकला पण..

मालिकेच्या प्रोमोमध्ये ओम जिंकलेला दाखवण्यात आला आहे. भाजीचे त्याचे दुकान खूप चांगले चांगले सुरु आहे. त्याला त्यातून चांगलाच फायदा होतो. त्याची 20 हजाराची कमाई होते. आता त्याच्याकडे नलू मावशीचे चँलेज पूर्ण व्हायला फक्त 5 हजार रुपये असतात. स्विटूकडे आधीच 10 हजार ओम देतो. त्यामुळे त्याने ते चँलेज पूर्ण केले हे स्विटू त्याला सांगते आणि 10 हजार रुपये देते.  पण ओमही त्यातील 5 हजार रुपये काकांना देतो. त्यामुळे आता त्याला झालेल्या कमाईचा आनंद तो मस्त वरात काढून करतो. आता स्विटूशी लग्न करण्यासाठी तो पात्र आहे त्याच्या कमाईत तो दाखवून देतो. 

चिन्यामुळे मालिकेला ट्विस्ट

https://www.instagram.com/p/CRtMb18jRiV/?utm_source=ig_web_copy_link

एकीकडे प्रेमाची नौका अटकेपार नेण्यासाठी ओमचे प्रयत्न सुरु असताना स्विटूच्या कुटुंबाला त्रास देण्याची एकही संधी मोहित काही सोडताना दिसत नाही. त्यामुळेच की काय चिन्याच्या कामाचा पहिला दिवस असतानाच मोहित त्याला ट्रेनमधून खाली पाडण्यासाठी त्याच्या हातावर पीन मारतो. त्यामुळे तो ट्रेन खाली पडतो. नोकरीचा पहिलाच दिवस असताना अशाप्रकारे पडल्यामुळे आता मालिकेला वेगळेच वळण येणार आहे. दरम्यान आता चिन्यामुळे ओमसमोर नवी समस्या काय उभी राहणार आहे ते पाहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

मीम्सचा पाऊस

आता चिन्याला ट्रेनमधून पाडण्यासाठी मोहित जी काय ट्रिक वापरतो त्यामुळे सगळ्यांनाच नेटवर हसू आलेलं आहे. त्यामुळे या सीनवर नुसता हशा पिकला आहे.  त्याच्यावर इतके मीम्स व्हायरल झाले आहेत की, लोकांनी त्यावरही मीम्स बनवले आहेत. त्यामुळे हा सीन कोणाला माहीत नाही असे मुळीच होणार नाही. सोशल मीडियावर हे मीम्स सध्या चांगलेच तेजीत चालले आहेत.

ओमवरही होत आहेत मीम्स

ओमवरही मीम्सचा पाऊस पडत नाही असे नाही. ओमच्या ओव्हरअॅक्टिंगमुळे त्याच्यावरही मीम्सचा पाऊस पडतो. ओमचे काही डायलॉग लोकांना इतके खटकले होते की, त्यावर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या

आता ओम जिंकला याचा आनंद साजरा करत फॅन्सनी एक नव्या ट्विस्टला तयार राहायला हवं.

अधिक वाचा

ADVERTISEMENT

तारक मेहता मधील बबीता अफवांमुळे झालीय नाराज, शो सोडण्याबाबत केला खुलासा

27 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT