ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
zoya akhtar the archies

अखेर सुरु झाले झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ चे शूटिंग

इंग्रजी पेपर वाचणाऱ्यांना आर्ची कॉमिक स्ट्रीप माहिती नाही असे होणार नाही. मराठीतील आपल्या चिंटूप्रमाणेच इंग्रजीमध्ये आर्ची प्रसिद्ध आहे. प्रत्येकानेच इंग्रजी पेपर हातात घेतल्यावर पिनट्स, आर्ची, डेनिस द मेनीस या कॉमिक स्ट्रीप वाचल्या असतील. आर्चीवर आधारित असलेली रिव्हरडेल नावाची वेब सिरीज देखील अनेकांना माहित असेल. आता आर्ची अँड्र्यूज, वेरोनिका, बेट्टी, जगहेड ही पात्रे आपल्याला हिंदीत देखील लवकरच दिसणार आहेत. चित्रपट निर्माती झोया अख्तरच्या सौजन्याने ही पात्रे पडद्यावर जिवंत होणार आहेत. झोया अख्तर लोकप्रिय आर्ची कॉमिक्सचे हिंदी रूपांतर दिग्दर्शित करत आहे. आणि महत्वाचे म्हणजे या चित्रपटातून अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि ख़ुशी कपूर हिंदी चित्रपटांत पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. 

सुहाना करणार व्हेरोनिकाची भूमिका 

चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झालेल्या फोटोंवरून असे दिसतेय की सुहाना खान ही व्हेरोनिका लॉजची भूमिका करतेय आणि खुशी कपूरच्या लूकचे बेटी कूपरशी कमालीचे साम्य आहे. कारण बेट्टी कूपर ही कायम व्हेस्ट स्वेटर ,स्कर्ट आणि बॅंग्स या लूकमध्ये दिसते. तर अगस्त्य नंदा आर्ची अँड्र्यूज म्हणून दिसेल असा कयास आहे. आर्ची कॉमिक्समधील पात्रे अनेक चित्रपट आणि कार्टून मालिकेद्वारे अमर झाली आहेत. आर्ची अँड्र्यूज हे पात्र पहिल्यांदा पेप कॉमिक्समध्ये दिसले आणि पॉप कल्चरमध्ये या पात्राने  विलक्षण लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या वर्षी, झोया अख्तरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये हा प्रोजेक्ट करणार असल्याची घोषणा केली होती. द आर्ची कॉमिक्सचे हिंदी रूपांतर झोया अख्तर, रीमा कागती आणि शरद देवराजन यांचे टायगर बेबी आणि ग्राफिक इंडिया प्रॉडक्शन हाऊस करणार आहेत. या प्रोजेक्टबद्दल शेअर करताना झोया अख्तरने लिहिले होते की,  “आर्ची आणि क्रू डाउन आणि देसी होणार आहेत! ‘द आर्चीज’ मी दिग्दर्शित केलेला एक म्युझिकल ड्रामा आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे.”

चित्रपटात स्टार किड्सची गर्दी 

सुहाना, अगस्त्य आणि खुशी हे स्टार किड्स आहेत. सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानला वडील SRK कडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. तर अगस्त्य हा लेखिका श्वेता बच्चन नंदा आणि बिझनेस टायकून निखिल नंदा यांचा मुलगा आहे. तो बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू आहे आणि खुशी कपूर ही दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे. झोया अख्तरने इंस्टाग्रामवर या प्रोजेक्टच्या तपशीलांसह क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला. झोया अख्तर आणि रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, झोया अख्तर दिग्दर्शिका आणि निकोस आंद्रिटसाकिस हे छायाचित्रण दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.फोटो शेअर करताना झोया अख्तरने लिहिले की, “बॅक टू द फ्यूचर” ,  हॅशटॅग “द आर्चीज”, “supercalifragilisticexpialidocious”. 

बॉलिवूड सिनियर्सने दिल्या शुभेच्छा 

या पोस्टला रिप्लाय  देताना अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली, “गो बेबी” तर अभिषेक बच्चनने हॅपी इमोजी टाकल्या. करण जोहर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा यांनी देखील यावर कमेंट करून या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. अगस्त्यची आई श्वेता बच्चन म्हणाली, “अभिनंदन,” तर झोयाची वहिनी शिबानी दांडेकर म्हणाली, “स्मॅश इट.” रीमा कागतीने देखील क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “Archie’s shoot starts Tiger Baby’s first solo production.  Partner in crime, Zoya Akhtar.”  

ADVERTISEMENT

अनेकांनी टीनएजमध्ये वाचलेले हे कार्टून कॅरेक्टर्स आता पडद्यावर हिंदी बोलताना दिसणार आहेत त्यामुळे अनेक मिलेनियल्समध्ये या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

18 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT