Bigg Boss 13: घरात होणार 3 हँडसमची एंट्री

Bigg Boss 13: घरात होणार 3 हँडसमची एंट्री

सलमान खानने बिग बॉस 13 च्या प्रीमियर एपिसोडलाच सांगितलं होतं की, हा सिजन असणार आहे ‘टेढा’. Salman Khan ने सांगितलेली ती गोष्ट खरी ठरत आहे. बिग बॉस सुरू चार दिवसही झाले नाहीत तोच शोमध्ये होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री. सलमानने खुलासा केला होती की, शोचा फिनाले चार आठवड्यात होणार आहे आणि सूत्रानुसार, या शोमध्ये काही कलाकार वाईल्ड कार्ड एंट्री करतील.

Bigg Boss 13 च्या घरात आणि फॉर्मेटमध्ये यंदा अनेक बदल आहेत. पहिल्याच दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. बिग बॉसच्या या सिजनबाबतच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार घरामध्ये छोट्या पडद्यावरील तीन हँडसम एंट्री करणार आहेत. या नावांमध्ये चर्चा आहे ती ‘तू आशिकी’ फेम राहिल अजीम, विराज फिरोज पटेल आणि अनुज सक्सेना यांची. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून हे तीनही चेहरे शोमध्ये येतील.

पहिल्या महिन्यातच 6 जणांचा पत्ता होणार कट

मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदा 1 महिन्याच्या आत 6 लोकांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. या स्ट्रेटजीनुसार मेकर्स अशा कलाकारांना घराबाहेरचा रस्ता दाखवतील जे एंटरटेन करण्यात अयशस्वी ठरतील. या लोकांना काढताच बिग बॉसमध्ये होईल वाईल्ड कार्ड एंट्री.

या आठवड्यातील नॉमिनेशन

मागच्या एपिसोडमध्ये घराची मालकीण अमिषा पटेलने नॉमिनेशन प्रक्रियेचं संचलन केलं होतं. या नॉमिनेशनमध्ये कोएना मित्रा, शेफाली बग्गा, दलजीत कौर, रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्य यांना नॉमिनेशन प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की, घराबाहेर पहिल्याच आठवड्यात कोण जाणार?

एलिमिनेशन होणार का

तसं पाहायला गेलं तर सलमानने या आधीही पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन अनेक वेळा थांबवलं आहे. पण या सिझनचा फॉर्मेट पाहता यंदा असं होईल की नाही शंका वाटते.

मग तुम्हाला काय वाटतंय यंदाच्या बिग बॉस सिझनबद्दल. तुम्हाला आवडत आहेत का हे बदल? तुम्ही बिग बॉसमध्ये होणाऱ्या Rahil Azim, Viraf Phiroze Patel आणि Anuj Saxena च्या वाईल्ड कार्ड एंट्रीबाबत उत्सुक आहात का?

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.