‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) लवकरच आई होणार आहे. आपल्या सुंदरता आणि गर्ल नेक्स्ट डोअर या इमेजने प्रेक्षकांना आपलंसं करून घेणाऱ्या अमृताने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. यावर्षी अनेक बॉलीवूड तारकांनी गुड न्यूज दिली आहे. अमृताचाही आता या यादीमध्ये नाव आले आहे. अमृता आणि अनमोलचा एक फोटो व्हायरल झाला असून अमृता गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमृता राव आणि आरजे अनमोल यांचा खार स्थित एका क्लिनिकच्या बाहेर क्लिक करण्यात आलेला फोटो व्हायरल झाला असून या फोटोमुळेच ही गुड न्यूज (Good News) कळली आहे. अजूनही अमृता अथवा अनमोलने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही लवकरच अमृता आई होणार आहे हे या फोटोवरून निश्चित झाले आहे.
फोटो झाला व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव
अमृता आणि अनमोल यांच्या नकळत घेण्यात आलेल्या या फोटोमध्ये दोघेही अत्यंत आनंदी दिसत असून मुंबईतील खारमध्ये त्यांचा हा फोटो घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये अमृता राव गरोदर असल्याचे स्पष्ट दिसत असून बेबी बंपसह हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमृताच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आरजे अनमोल आणि अमृता राव यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केल्यानंतर एकमेकांशी 2016 मध्ये अगदी गुपचुपीत लग्न केलं. आता अमृता आई होणार आहे हेदेखील त्यांनी कोणालाही कळू दिलं नव्हतं. मध्यंतरी या दोघांच्या नात्यात मनमुटाव आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र असं काहीही नसून दोघांचंही नातं व्यवस्थित असल्याचं त्यानी एका टीव्ही शो मध्ये येऊन दाखवून दिलं होतं.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नसोहळ्यातील आनंंदाचे क्षण, फोटो व्हायरल
अनमोल आणि अमृताची सुंदर जोडी
आरजे अनमोल हा अत्यंत प्रसिद्ध असून अमृताही प्रसिद्ध आहे. या दोघांची जोडी अत्यंत सुंदर असून ते एकमेकांना शोभून दिसतात. इतकंच नाही तर हे दोघे अत्यंत खासगी असून आपलं खासगी आयुष्य कधीही मीडिया अथवा अगदी सोशल मीडियाच्या समोरही आणत नाहीत. काही फोटो पोस्ट करणे वगळता या दोघांच्याही सोशल मीडियावर जास्त फापटपसारा दिसून येत नाही. या दोघांनीही गुड न्यूजबद्दल काहीही सांगितलं नसलं तरीही आता या फोटोमुळे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अमृता आणि अनमोल कधी याविषयी घोषणा करून बाळाबद्दल सांगत आहेत याची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण अमृताला नक्की कितवा महिना चालू आहे आणि तिच्या तब्बेतीविषयी कोणतीही माहिती अजून कळलेली नाही.
प्रसिद्ध गायक-निवेदकही लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
सध्या अनमोल टीव्हीवर करत आहे निवेदन
अमृता राव गेल्यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये दिसली होती. तिच्या भूमिकेची खूपच प्रशंसा झाली होती. पण त्यानंतर अमृता पुन्हा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तर अनमोल हा प्रसिद्ध आरजे असून सध्या एका टीव्ही चॅनेलवरील ‘जॅमइन’ शो चा निवेदक म्हणूनही अनमोल काम करत आहे. मात्र आता या दोघांच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या बातमीने दोघांचेही चाहते आनंदी झाले असून दोघानाही शुभेच्छा देत आहेत आणि लवकरात लवकर या दोघांनाही अगदी अधिकृतपणे या आनंदाच्या बातमीची घोषणा करावी अशीही चाहत्यांची इच्छा आहे.
साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सिझन, अहमचा असणार डबल रोल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक