ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा बनली आई, फोटो व्हायरल

अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा बनली आई, फोटो व्हायरल

मंदिरा बेदी सध्या कोणत्याही चित्रपटात अथवा मालिकांमधून दिसून येत नसली तरीही तिच्या सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ मंदिरा नेहमीच शेअर करत असते. तुम्ही जर तिला फॉलो करत असाल तर नक्कीच या कॅप्शनने गडबडले असाल. मंदिरा पु्न्हा आई कशी झाली असा प्रश्नही तुम्हाला सतावत असेल. तर थांबा…मंदिरा आई झाली हे खरं असलं तरीही इतक्या वर्षांनी मंदिराने एका मुलीला दत्तक घेतले असल्याचे शेअर केले आहे. यावर्षी जुलै महिन्यात या मुलीला दत्तक घेण्यात आले असून आमच्या कुुटुंबाचा ती एक भाग असल्याची आनंदी पोस्ट मंदिराने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करत केली आहे.

रिंकू राजगुरू करणार सुव्रतवर ‘छूमंतर’

तारा बेदी कौशल आहे मंदिराच्या मुलीचे नाव

मंंदिरा बेदी हे नाव घराघरात पोहचले आहे. ‘शांती’ मालिकेतून मंदिराच्या करिअरला सुरूवात झाली असली तरीही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली ती क्रिकेटमध्ये एक ग्लॅम आणून.  तितक्याच आत्मविश्वासाने आणि मेहनतीने मंदिराने आपली ओळख निर्माण केली.  मंदिरा नेहमीच आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, फोटो  आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एक फोटो मंदिराने शेअर करत आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. मंदिरा आणि राज कौशल यांना वीर नावाचा मोठा मुलगा आहे आणि मंदिराने आता मुलीला दत्तक घेतले असून तिने त्याविषयी आपल्या भावना सोशल मीडियावर फोटो शेअर करत व्यक्त केल्या, ‘आमच्या आयुष्यात एका आशिर्वादाप्रमाणे ती आली आहे, आमची छोटीशी मुलगी तारा. चार वर्ष अथवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असणारी, पण डोळ्यांमध्ये तिच्या ताऱ्यांची चमक असणारी अशी वीरची बहीण. अगदी मनापासून आणि प्रेमपूर्वक घरामध्ये तिचं स्वागत. आम्ही सर्वच देवाचे आभारी आहोत. तारा बेदी कौशल. 28 जुलै, 2020 पासून आमच्या कुटुंबाचा एक भाग.’ या पोस्टनंतर मंदिरा आणि राज कौशलवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी या निर्णयाचे मनापासून स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले आहे. 

‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

ADVERTISEMENT

ताराच्या येण्याने कुटुंब पूर्ण

मंदिरा,  राज आणि वीर असं त्रिकोणी कुटुंब आता ताराच्या येण्याने पूर्ण झाल्याचे हा फोटो दर्शवत आहे. मंदिराने राज, वीर आणि तारासह फोटो शेअर केला असून यामध्ये  चौघेही अतिशय आनंदी दिसत आहेत.  इतकंच नाही तर ताराही घरामध्ये आणि मंदिरा, राज आणि वीरसह रुळल्याचे दिसून येत आहे.  मंदिरा बेदी ही अनेक तरूणींची आदर्श आहे. तिने  नेहमीच वेगळ्या वाटा निवडल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा ताराला दत्तक घेऊन आपण समाजाचे काही  देणे लागतो हे मंदिराने दाखवून दिले आहे. मंदिराच्या याच गोष्टी तिला इतरांपेक्षा नक्कीच वेगळं ठरवतात. मंदिराच्या व्हिडिओमधून आपला मुलगा वीर यालाही ती वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण देताना दिसून येते. त्यामुळे आता वीर आणि ताराला योग्य वळण देत मंदिरा नक्कीच एक वेगळा आदर्श घालून देईल अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना आहे. ताराच्या येण्याने मंदिराच्या आयुष्यात नक्कीच आनंद आला आहे यामध्ये काहीच शंका नाही.  तिच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी तिच्या चाहत्यांनाही तिला शुभेच्छा  दिल्या आहेत. 

सोनाली खरेचे 8 वर्षांनी दसऱ्याच्या दिवशी होणार दणक्यात कमबॅक, दिसणार शेफच्या भूमिकेत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT