हंगामा या कॉमेडी ड्रामाने 2003 मध्ये अनेकांना पोट धरून हसवलं होतं. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. हंगामा 2 चं दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता फक्त पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. त्यामुळे हा चित्रपट मे मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून शिल्पा शेट्टी एका मोठ्या ब्रेक काम करणार आहे. त्यामुळे हंगामा 2 मधून शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मीजान जाफरी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे. या चित्रपटाच आता अभिनेता अक्षय खन्नाचा कॅमिओ असणार आहे. अक्षयने 2003 साली हंगामामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या सिक्वलमध्ये अक्षयचा नेमका काय रोल असणार हे पाहणं चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारं असेल.
अक्षय खन्नाचा ‘हंगामा 2’ मध्ये छोटा पण महत्वाचा रोल
अक्षय खन्ना हंगामा 2 या चित्रपटात कॅमिओच्या माध्यमातून कमबॅक करणार अशी चर्चा आहे. मिळालेल्या खात्रीदायक माहितीनुसार अक्षय खन्नाचं त्यांच्या भूमिकेशी निगडीत शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. मात्र ही गोष्ट मुद्दाम लपवून ठेवण्यात आली होती की या चित्रपटात अक्षय खन्नाही असणार आहे. कारण मागच्या हंगामामध्ये अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होता. सहाजिकच या गोष्टीचा फायदा निर्मात्यांना मिळवायचा असेल. हंगामामधील अक्षयच्या भूमिकेचे त्यावेळी खूप कौतुक झाले होते आणि या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी त्यांच्या विनोदशैलीने चित्रपटात जीव ओतला होता. आता या हंगामामध्येही अक्षय खन्नाचा एक महत्त्वाचा रोल असण्याची शक्यता आहे.
काय आहे या चित्रपटात विशेष
हंगामा 2 एक सिक्वल नसुन फ्रॅचायसी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा मागील हंगामापेक्षा नक्कीच वेगळी असेल. मात्र तरिही या हंगामामध्ये अक्षयची भूमिका असणं हे फायद्याचंच ठरणार आहे. कथानक आणि चित्रपटाची मांडणी वेगळी असली तरी या चित्रपटाचं नाव हंगामा 2 असंच ठेवण्यात आलं आहे. खरंतर परेश रावल यांनीही जुन्या हंगामामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट पूर्ण नवा असल्यामुळे परेश रावल आणि अक्षयचा यात एक वेगळी आणि नवी भूमिका असेल. शिवाय मागच्या हंगामामध्ये अक्षय खन्ना परेश रावल यांचा मुलगा आहे असं दाखवण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटात त्यांच्यात असं कोणतंही नातं नसेल. त्यामुळे या हंगामाचं कथानक नेमकं काय असेल आणि त्यातून प्रेक्षकांचं किती मनोरंजन होईल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे.चित्रपटाची इतर स्टारकास्ट पूर्ण बदलण्यात आली आहे. शिल्पा शेट्टीला या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी चित्रपटात आणि एका कॉमेडी भूमिकेत प्रेक्षकांना पाहता येईल. तर मुख्य भूमिकेत असलेला मीझान जाफरी पहिल्यांदाच त्यांच्या करिअरमध्ये एखादी विनोदी भूमिका साकारेल. त्यामुळे त्याचे वडील जावेद जाफरीप्रमाणमे मीझानची जादू आता कॉमेडी चित्रपटात चालेल का हे या निमित्ताने दिसून येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ
डॉक्टरनंतर राखी सावंतला व्हायचे आहे गायक
माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री मिळणे नाही, कंगनाला प्रशांत भूषणने दिले असे उत्तर