अभिनेत्री अॅमी जॅक्सनला करायचंय 'या' खास ठिकाणी लग्न

अभिनेत्री अॅमी जॅक्सनला करायचंय 'या' खास ठिकाणी लग्न

2018 हे साल बॉलीवूडमध्ये झालेल्या शाही लग्नसोहळ्यांमुळे गाजलं. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची लग्न सगळ्यात जास्त चर्चेत राहीली. 2019 सालाची सुरूवातही लग्नांनी झाली आहे. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्या मुलगा प्रतीक बब्बरच्या लग्नाने या वर्षाला सुरूवात झाली. त्यानंतर आता चर्चा रंगतेय ती प्रतीकची एक्स गर्लफ्रेंड अॅमी जॅक्सनच्या लग्नाची.
 

 

 


View this post on Instagram


 

 

LDNLYF


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on
अॅमी जॅक्सन आहे लग्नासाठी व्हेन्यूच्या शोधात
 

 

 


View this post on Instagram


 

 

Days like this 🙏🏼


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on
अॅमी जॅक्सन आणि तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायिटू सध्या लग्नाच्या व्हेन्यूच्या शोधात आहेत. सूत्रानुसार, अॅमीने तिच्या लग्नासाठी ग्रीसमधलं एक ठिकाणं निवडल्याचं कळतंय. अॅमीला समुद्रकिनारी लग्न करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिला लग्नासाठी ग्रीसमधील मायकोनोज बेट ही जागा आवडली आहे. गेल्या वर्षी ती जॉर्जसोबत या बेटांवर आली होती आणि तेव्हाच ती या जागेच्या निर्सग सौंदर्याच्या प्रेमात पडली.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Welcome to The Jungle...


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

2020 मध्ये लग्न करण्याची शक्यता


सूत्रानुसार, हे ग्रँड लग्न 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. अॅमी आणि जॉर्जचं लग्न ख्रिश्चन पद्धतीने होणार असून खूपच खाजगी सोहळा असेल. असंही कळतंय की, लग्नानंतर अॅमी युकेमध्येच सेटल होण्याचं प्लानिंग करतेय.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Kisses from behind the scenes of @2point0movie 💋| 🎥 NIRAV 💯


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on
गेल्यावर्षी अॅमी रजनीकांत आणि अक्षयकुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटांमध्ये दिसली होती.असं जुळलं अॅमी आणि जॉर्जचं प्रेम

जॉर्ज आणि अॅमीची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून 2015 मध्ये झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आणि चांगल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अॅमीने तिच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती. तिने आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक फोटो शेअर केले होते. अगदी त्यांच्या साखरपुड्याचा रोमँटीक फोटोही तिने इन्स्टावर शेअर केला होता.कोण आहे अॅमीचा बॉयफ्रेंड जॉर्ज?

जॉर्ज हा युकेस्थित मिलियनेयर बिजनसमैन आहे. तो रिअल ईस्टेटचा किंग अॅड्रस पानायिटू यांचा मुलगा आहे. ज्यांनी एबिलीटी ग्रुपची सुरूवात केली होती. जॉर्जची लंडनमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये हिल्टन, पार्क प्लाटा, डबल ट्री यांचा समावेश आहे. जॉर्ज हा पाच भावंडांपैकी एक आहे. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अॅमीच्या आधी जॉर्जने ग्लॅमरस मॉडेल डेनियल लॉईडला डेट केलं आहे.जॉर्ज आधी प्रतीक बब्बरवर होतं अॅमीचं प्रेम
 

 

 


View this post on Instagram


 

 

Adventure of a lifetime with my love!


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on
अॅमी आणि प्रतीक बब्बरसोबत अफेयर असल्याची चर्चा होती. पण 2012 मध्ये दोघांचीही ब्रेकअप झाला. अॅमीने बॉलीवूडमधील निवडक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची सर्वात जास्त चर्चा झाली ती 2.0 या चित्रपटांतील भूमिकेमुळे.