ADVERTISEMENT
home / बिग बॉस
#BBM2 मध्ये बिचुकलेनंतर नवा टार्गेट होतोय सेट

#BBM2 मध्ये बिचुकलेनंतर नवा टार्गेट होतोय सेट

बिग बॉस मराठी सिझन 2 म्हणजेच #BBM2 च्या हाय व्हॉल्टेज ड्रामाला सुरूवात झाली आहे. काही जण एकालाच टार्गेट करत आहेत तर काही जणांनी पुढच्या वर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. थोड्याच दिवसात #BBM2 च्या घरातील टीम पॉलिटीक्सही नजरेला पडेल. तुम्हाला काय वाटतं?

शिवानीनंतर आता रूपाली

bbm2-rupali-bichukle-3

पहिल्या दिवसापासून शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले यांच्यातला विस्तव जात नाहीयं. काही ना काही कारणाने या दोघांमध्ये सतत वाद रंगल्याचं आपण पाहतोच आहोत. आता या वादनाट्यात नवीन पात्र सामील झालं आहे ते म्हणजे रूपाली भोसले. ऐरणीच्या देवा या पहिल्या टास्क आणि नॉमिनेशन्समधल्या काही बाबींवरून बिचुकले आणि रूपाली यांच्यात जोरदार वादावादी झाली. इतकी की, रूपालीला अश्रू आवरताच आले नाही. गुरूवारच्या एपिसोडमध्ये तर घरातील जवजवळ सर्व सदस्यच बिचुकलेंच्या विरोधात गेल्याचं दिसून आलं.

बिचुकलेनंतर नंबर कोणाचा?

bbm2-rupali-parag-4

ADVERTISEMENT

बिचुकले तर पहिल्या दिवसापासून सगळ्यांचाच टार्गेट ठरत आहेत. पण असं वाटतंय की, आता हळूहळू हा फोकस शिफ्ट होतोय शेफ पराग कान्हेरेवर. सर्वात आधी परागशी वादाला सुरूवात केली ती नेहा शितोळेने. किचनमध्ये जेवण करताना गॅस वापराच्या मुद्द्यावरून नेहाने परागशी वाद घातला. त्यानंतर पुन्हा नेहाने परागला किचनमधल्याचं एका गोष्टीवरून सुनावल्यानंतर परागने किचनमध्ये पाय न ठेवण्याचं ठरवलं.

bbm2-parag-1

पण आता तर परागचं शिवानी, वीणा जगताप, वैशाली भैसने-माडे आणि रूपालीसोबतही खटके उडाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता बिचुकलेनंतर घरातल्या नारीशक्तीने परागला टार्गेट केलं तर आश्चर्य वाटणार नाही.

BigBoss:season 13 असणार खास, हे सेलिब्रिटी असणार स्पर्धक

ADVERTISEMENT

आस्तादने लिहीली भावनिक पोस्ट   

एकीकडे #BBM2 च्या घरात आता वादविवाद आणि राजकारण रंगत असल्याचं चित्र असताना बाहेर मात्र पहिल्या सिझनमधले कंटेस्टंट आपल्या भावना व्यक्त करत आहेत. नुकतंच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील सरस्वती मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे याने आपला मालिकेतला लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचकेबाबत इमोशनल पोस्ट शेअर केली.  

सरस्वती मालिकेत जसे राघव-कान्हाचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. तसेच आस्ताद काळेचे ही माधव देवचकेवर खूप प्रेम आहे. हेच प्रेम आस्तादने सोशल मीडियावरून नुकतंच दाखवलं. आस्तादने त्याचा आणि माधवचा एक फोटो टाकून त्याखाली लिहीले आहे, ”हा असाच आहे…आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमाल clarity आहे याला…जीवाला जीव लावतो…म्हणूनच जवळच्याचं काही चुकलं तर हक्कानी खूप ओरडतोसुद्धा….सगळ्यांचा लाडका कान्हा…आमचा लाडकामाध्या…मॅडी….भीड गड्या….”. आस्ताद काळेला याबाबत संपर्क साधल्यावर त्याने सांगितलं की, “मालिकेमुळे माझे माधवशी आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले. तो मला माझ्या सख्या भावासारखा आहे. माधव उत्तम क्रिकेटर असल्याने त्याच्यात स्पोर्ट्समॅन स्पिरीट आहे. त्यामुळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल, असा मला विश्वास आहे.” आस्ताद काळेप्रमाणेच मालिका आणि सिनेसृष्टीतले अनेक कलाकार सध्या माधवला सपोर्ट करत आहेत.

हेही वाचा –

मुलींना आवडतात वयस्क पुरुष, चित्रपट मालिकांमध्ये दिसतोय ट्रेंड

ADVERTISEMENT

या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?

30 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT