कोरोना व्हायरसमुळे सगळीच कामं ठप्प झाली आहेत. त्यामध्ये मनोरंजन क्षेत्रही मागे नाही. 19 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत सर्व चित्रीकरण रद्द करण्यात आल्याची बातमी दोन दिवसापूर्वीच आम्ही तुम्हाला दिली होती. यामध्ये मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि जाहिरातींचे सर्व चित्रीकरण बंद आहे. पण त्यामुळे चित्रीकरणाच्या सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होणार हे निश्चित होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काय ठोस पावलं उचलण्यात येणार याकडेही बऱ्याच जणांचे लक्ष लागून होते. पण आता ‘प्रोड्युसर्स ग्लिड ऑफ इंडिया’ने मंगळवारी या दिवसांमधील वेतन कर्मचाऱ्यांना काम पूर्ण बंद असलं तरीही देण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे. ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
आता corona virusवर बनणार चित्रपट,नावही झाले रजिस्टर
कोरोनाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही
कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यामध्ये मनोरंजन क्षेत्राचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून थिएटरही बंद करण्यात आली आहेत. शिवाय कोणत्याही मालिकांचे चित्रीकरणही चालू नाही. चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे रोजच्या जगण्याचा प्रश्न उभा राहिला होता. जे कर्मचारी मजुरीवर काम करतात त्यांच्यापुढे यक्षप्रश्न उभा होता. पण आता त्यांच्या संदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला असून या कर्मचाऱ्यांचा विचार करत ‘प्रोड्युसर्स ग्लिड ऑफ इंडिया’ने एका मदतीनिधीच्या माध्यामातून या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. गिल्डचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर यांनी अधिकृतरित्या हे ट्विट केले आहे. यासाठी एक परिपत्रकही काढण्यात आले आहे.
#Coronavirus चा फटका आता मालिकांच्या चित्रीकरणालाही
सिद्धार्थ रॉय कपूरने केले ट्विट
Producers Guild of India sets up Relief Fund for workers affected by production shutdown owing to the COVID-19 epidemic-Official Statement#SiddharthRoyKapur @kulmeetmakkar #coronavirus pic.twitter.com/OGARZbDWxl
— producersguildindia (@producers_guild) March 17, 2020
‘कोरोना व्हायरसमुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येत आहे. सगळीकडे कामे ठप्प झाली आहेत. सगळ्याच जास्त फटका बसला आहे तो म्हणजे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना. सगळीकडील काम बंद झाल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या या वर्गाला त्रास होत आहे आणि म्हणूनच ‘प्रोड्युसर्स ग्लिड ऑफ इंडिया’ने या व्यक्तींना मदत करण्याचे ठरवले असून मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही मदतनिधीमधून शक्य तितकी आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना मदत करू.’ असे ट्विट सिद्धार्थ रॉय कपूरने केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आता थोडा तरी दिलासा मिळाला आहे. याआधीही अनेक दिग्दर्शकांनी या कर्मचाऱ्यांविषयी चिंंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळाला असून किमान 31 मार्चपर्यंतचे वेतन तरी त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनामुळे पापाराझ्झीही ब्रेकवर
कर्मचाऱ्यांची ससेहोलपट
मनोरंजन क्षेत्रातही असे काही विभाग आहेत जिथे रोजंदारीवर कर्मचारी काम करतात. कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका हा या कर्मचाऱ्यांना बसला आहे. रोजच्या रोज पैसे मिळवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना काम ठप्प असल्याने काहीही मिळत नव्हते आणि त्यांना रोज जगणेही कठीण झाले होते. यावर उपाय म्हणूनच आता हे पाऊल उचलण्यात आले असून या कर्मचाऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारण दहा ते बारा दिवस मनोरंजन क्षेत्रही कोरोना व्हायरसमुळे ठप्प राहणार आहे. त्यामुळे आता पुढे अजून काय परिणाम होतो हेदेखील पाहावं लागणार आहे. तोपर्यंत सर्वांनाचा काम बंद करून घरात बसावं लागणार आहे.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.