दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येला आता एक वर्ष पूर्ण होईल. पण अजूनही त्याच्या नावाचा उल्लेख होत नाही असा एकही दिवस नाही. गेल्यावर्षी त्याच्या आत्महत्येने अनेकांना धक्का दिला होता. त्याची आत्महत्या ही हत्या आहे हे सिद्ध करण्यासाठी CBI तपास करण्यात आला पण त्यातही काही सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे ही केस थंडावली. एक टीव्ही स्टार ते बॉलिवूड अभिनेता असा सुशांतचा प्रवास त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायोपिकमधून दाखवण्यासाठी अनेक चित्रपट तयार होत होते. पण सुशांतच्या वडिलांनी या चित्रपटांविरोधात याचिका दाखल केल्यामुळे या सगळ्या चित्रपटांवर काही काळासाठी स्थगिती आणली होती. पण आता दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतच्या बायोपिकला हिरवा कंदील दिल्यामुळे आता हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
समीरा रेड्डीने पुन्हा शेअर केल्या बॉडी पॉझिटिव्हिटीबाबत खास टिप्स
बायोपिकमधून जाईल चुकीची बाजू
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्महत्येसाठी अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. सुशांतचा मृत्यू हा कसा झाला असेल याच्या वेगवेगळ्या स्टोरीज रोज प्रसारमाध्यमातून अनेकांनी ऐकल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण कोणालाही माहीत नाही. अशावेळी ज्या कहाण्या लोक रचतात त्यामुळे सुशांतच्या कुटुंबाची प्रतिमा मलीन होते. शिवाय जी व्यक्ती आता या जगात नाही तिच्याबद्दलही नको ती बदनामी होते. त्यामुळे सुशांतवर कोणतेही पुस्तक अथवा चित्रपट कोणत्याही परवानगी शिवाय बनवले जाऊ नये या संदर्भातील याचिक सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी केली होती. त्यामुळे ‘न्याय: द जस्टिस’ नावाच्या एका चित्रपटाच्या रिलीजवर कोर्टाने स्थगिती आणली होती. या चित्रपटात सुशांतच्या नावाशी साधर्म्य असलेले नाव आणि करिअर यामध्ये समानता असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे हे चित्रपट प्रदर्शनापासून वंचित होेते.
देवमाणूस’ मालिकेला येणार नवं वळण, नव्या चेहऱ्याची एंट्री
कोर्टाने फेटाळली याचिका
‘न्याय: द जस्टिस’ हा चित्रपट 11 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता दिल्ली कोर्टाने सुशांत सिंहच्या वडिलांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता येत्या 14 जून रोजी म्हणजेच सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकारांना दिलासा मिळाला आहे.
अविका गौरचा कौतुकास्पद निर्णय, नाकारली या कारणासाठी जाहिरात
गळफास लावून संपवले जीवन
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या हे कायमच एक गूढ राहिले आहे. सुशांतने 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत पोलिसांना सापडला होता. सुशांत आत्महत्या करु शकणार नाही अशी प्रतिक्रिया संपूर्ण बॉलिवूडमधून आणि छोट्या पडद्यावरुनही उमटत होती. त्यामुळे त्याच्या खुनाचा तपास करण्यात आला. हा तपास करताना सुशांतसंदर्भातील अनेक गोष्टी समोर आल्या. एक मोठं ड्रग्जचं रॅकेट त्यामुळे समोर आलं. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे देखील समोर आली. पण शेवटी या सगळ्यातून नि:ष्पन्न असे काही समोर आले नाही. त्यामुळेच आता सुशांत गेला त्यामागे तो कोणतीही कारणं न ठेवता गेला असेच म्हणावेल लागेल.
दरम्यान, ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे आता सुशांतच्या आयुष्यावर त्यांनी नेमका काय प्रकाश टाकला आहे हे पाहणे औत्स्युकाचे ठरणार आहे.