बॉलीवूडमध्ये तर सध्या लग्न आणि बाळाचा जन्म हेच ऐकू येत आहे. नुकतीच कपिल शर्माने आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी दिली तर मागच्या वर्षीपासून अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज दिली आहे. यावर्षाच्या सुरूवातीलाच विरूष्कानेही मुलगी झाल्याची गोड बातमी देत चाहत्यांना आनंद दिला. तर आता अजून एका प्रसिद्ध गायिकेने आपण लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी फोटो पोस्ट करत शेअर केली आहे. गायिका हर्षदीप कौर मार्च 2021 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. हर्षदीपने सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी बंपसह फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हर्षदीप कौरने आपला प्रियकर मनकित सिंह याच्यासह काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. हर्षदीप पहिल्यांदाच आई होणार असून अत्यंत आनंदी आहे.
ज्युनिकौर कौरचं होणार आगमन
हर्षदीपने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट केले आहेत. तर एका फोटोमध्ये आपल्या पतीसह अत्यंत आनंदी हर्षदीप दिसत आहे. हर्षदीपने या फोटोला कॅप्शन लिहिली आहे की, ‘या छोट्या बाळाला भेटण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. हे बाळा अर्धा माझा अंश आहे आणि अर्धा अंश त्याचा आहे ज्याच्यावर माझे सर्वात जास्त प्रेम आहे. ज्युनिअर कौर/सिंह लवकरच मार्च 2021 मध्ये या जगात येणार आहे. तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.’ हर्षदीपने अगदी शेवटच्या महिन्यात ही गुड न्यूज शेअर केली आहे कारण आपलं आयुष्य अधिक खासगी असावं असं दोघांनाही वाटतं.
Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी
आमचं आयुष्य अतिशय खासगी
हर्षदीप नुकतीच एका रूग्णालयात जाताना दिसली होती. एका मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट केले आहे की, ‘हो मी तिसऱ्या ट्रिमस्टरमध्ये आहे आणि डिलिव्हरीपासून केवळ एक महिना दूर आहे. माझा नवरा मनकित आणि मी दोघेही अतिशय खासगी आयुष्य जगतो. मागच्या वर्षी कोविडच्या काळात बऱ्याच कमी लोकांना भेटण्याची आम्हाला संधी मिळाली. तसंच परिस्थिती इतकी खराब होती की, कोणालाही गरोदरपणाबद्दल सांगण्यात आलं नाही. पण मी अत्यंत आनंदी आहे की, आमच्याकडे आता एक लहान बाळ येणार आहे.’
अट मान्य असेल तरच लग्न करेन, प्रियांका चोप्राने केला निकसह लग्नाचा खुलासा
गरोदरपणात घेतली विश्रांती
हर्षदीप आणि मनकित सिंह याच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. जेव्हा कोविडची परिस्थिती उद्भवली तेव्हा आम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार केला. मनकित सिंहने हर्षदीपबद्दल सांगितले की, जगभरात अनेक आव्हाने आहेत हे खरं आहे. पण हर्षदीपने या काळात व्यवस्थित विश्रांती घेतली आणि ती घरी राहिली याचा मला जास्त आनंद आहे. हर्षदीपचे काम खूपच धावपळीचे आहे. त्यामुळे ही योग्य वेळ आहे. हीच योग्य वेळ होती म्हणून आम्ही ही आनंदाची बातमी आता शेअर केली. यामुळे हर्षदीपच्या चाहत्यांसाठी हे नक्कीच सरप्राईज आहे. दरम्यान आता हर्षदीपला नक्की कोण होणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. याच महिन्यात करिना कपूरदेखील आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तर अभिनेत्री आदिती मलिक, अनिता हंसनंदानी यांच्याकडूनही लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. त्यामुळे हे दोन्ही महिने नव्या बाळांचे आगमन आणि आनंदात जाणार आहेत असं म्हणायला हरकत नाही.
चाहत्यांसाठी खुशखबर! या दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक