ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
#Corona च्या निमित्ताने गुगलचं खास डूडल

#Corona च्या निमित्ताने गुगलचं खास डूडल

गुगल हे सर्च इंजिन वेगवेगळ्या सणवार किंवा घटनांच्या निमित्ताने नेहमीच आपल्या होमपेजवर डूडल बनवत असतं. आता कोरोनाचा कहर जगभरात सुरू असताना गुगलने खास फादर ऑफ इंफेक्शन कंट्रोल यांच्या नावे डूडल बनवलं आहे. आज गुगलच्या होमपेजवर दिसत आहेत डॉक्टर इग्नाज सेमेल्विस. ज्यांनी सर्वात आधी हातांची स्वच्छता महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच गुगलने कोरोनाविरूद्ध लढा ठरणारी हात धुण्याची खास पद्धतही व्हिडिओमधून शेअर केली आहे.

सध्या कोरोनोमुळे जगभरात स्वच्छता आणि मुख्य म्हणजे हातांच्या स्वच्छतेबाबतचं महत्त्व सांगण्यात येत आहे. पण हंगेरीच्या फिजीशियन इग्नाज सेमेल्विस यांनी सर्वात आधी हात धुण्याचे मेडिकल फायदे सांगितले होते. 20 मार्च 1847 साली सेमेल्विस यांनी व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलच्या मॅटर्निटी क्लीनिकमध्ये हात स्वच्छ असण्याबाबत आग्रह धरला होता. त्या काळात त्यांनी फिजीशियन्स हात क्लोरिनेटेड लाईम सॉल्यूशनने डिइंफेक्ट करण्यास सांगितलं होतं. या काळात गर्भारपणात आणि गर्भारपणानंतर इंफेक्शनमुळे दगावणाऱ्या मातांची संख्या जास्त होती. यामागील कारण जाणून घेण्याच्या प्रयत्नात त्यांना कळलं की, अनेक डॉक्टरांच्या हातांची अस्वच्छता हे यामागील कारण होतं. डॉक्टरांच्या हातांवरील इंफेक्शनमुळे रूग्णांवर त्याचा प्रभाव होत होता. याचमुळे गर्भवती महिलांना मोठ्या प्रमाणावर इंफेक्शन होत असे.

#StayHomeStaySafe : कोरोनामुळे घरी राहून कंटाळला असलात तर करा या गोष्टी

डूडलमध्ये हँडवॉशची योग्य पद्धत

रूग्णांच्या दगावण्याचं कारण कळल्यावर सेमेल्विस यांनी सोबतच्या डॉक्टरांना स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत सांगितलं. पण त्याकाळात हे लोकांना पटलं नाही. परिणामी सेमेल्विस यांचा अंतही दुखःद झाला. पण सेमेल्विस यांच्या मृत्यूनंतर हे समोर आलं की, त्यांनी हातांच्या स्वच्छतेबाबत केलेले दावे हे योग्य होते. तेव्हापासून डॉक्टरांमध्ये हात धुण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आणि वारंवार होणाऱ्या मृत्यूना आळा बसला. सेमेल्विस यांचं हेच कार्य लक्षात घेत गुगलने हे डूडल शेअर केलं आहे. ज्यामध्ये हात धुण्याची योग्य पद्धत दाखवण्यात आली आहे. 20 ते 40 सेकंड्स हात धुतल्याने तुम्ही बॅक्टेरिया आणि व्हायरसला शरीराच्या आत जाण्यापासून रोखू शकता.

ADVERTISEMENT

तसंच गुगल इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या काळात काळजी घेण्याबाबतच्या सूचनाही शेअर करण्यात आल्या आहेत. 

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन

कोरोनापासून बचाव आवश्यक

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेही जगभरातील लोकांना वारंवार योग्य पद्धतीने हात धुण्याचं आवाहन केलं आहे. यामागील कारण अर्थातच वेगाने फैलावणारा जीवघेणा कोरोना व्हायरस आहे. स्वच्छता हा या रोगांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुम्हीही स्वच्छता बाळगा आणि आपल्या कुटुंब व मित्रपरिवारालाही स्वच्छतेबाबत जागरूक करा.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

19 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT