अनुराग उर्फ पार्थ समथानच्या आयुष्यातील गर्लफ्रेंड्सची लिस्ट

अनुराग उर्फ पार्थ समथानच्या आयुष्यातील गर्लफ्रेंड्सची लिस्ट

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी के 2 मधील अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. अनुरागच्या भूमिकेत तो कितीही हँडसम आणि अगदी सभ्य असला तरी रिअल लाईफमध्ये मात्र तो त्याच्या लव्हलाईफमुळे बातम्यांमध्ये झळकतो. कारण त्याचं लव्हलाईफ बरंच वादग्रस्त आहे. सध्या त्याचं नाव जोडलं जात आहे ते कसौटी मालिकेतील अभिनेत्री एरिका फर्नांडीस (Erica Fernandes) सोबत. पण ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पार्थचं नाव कोणाशी जोडण्यात आलं आहे. तर पार्थच्या गर्लफ्रेंड्सची आहे लांबलचक लिस्ट. चला पाहूया त्याच्या लांबलचक गर्लफ्रेंड्सची लिस्ट.

दिशा पटानी

View this post on Instagram

❄️❄️⛄️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

हो...तुम्ही बरोबर वाचत आहात सध्याची बॉलीवूड दिवा असलेली दिशा पटानी एकेकाळी पार्थ समथानची गर्लफ्रेंड होती. हे दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. पण आज दिशा बॉलीवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे तर पार्थ टीव्हीवरचा हार्टथ्रोब.

अरिहा अग्रवाल

कसौटी जिंदगी के 2 मध्ये कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अरिहा अग्रवालसोबतही पार्थ समथानचं नाव जोडण्यात आलं होतं.

स्कार्लेट रोज

खरंतर स्कार्लेट रोज ही पार्थची खूप चांगली मैत्रीण आहे. पण सूत्रानुसार पार्थ आणि स्कार्लेट एकमेकांना डेटही करत होते.

एरिका फर्नांडीस

Instagram

रीलमधील अनुराग-प्रेरणाची जोडी जशी मालिकेत अनेक चढउतारातून जात आहे. तसंच रिअलमधील एरिका फर्नांडीस आणि पार्थ समथानची जोडीही खूप चढउतार असलेली आहे. चर्चेनुसार हे दोघं काही महिने एकमेकांना डेट करत होते मग वेगळे झाले. आता पुन्हा अशी बातमी आहे की, दोघांचं पॅचअप झालं असून ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ईशान्या माहेश्वरी

एरिकाशी तथाकथित ब्रेकअपनंतर पार्थ ईशान्या माहेश्वरीच्या घरी पार्टी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही ना काही तरी शिजत असल्याची चर्चा होती.

विकास गुप्ता

पार्थच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या. पण सर्वात चर्चा तेव्हा झाली जेव्हा विकास गुप्ता या टीव्हीवरील चर्चित व्यक्तींसोबत त्याची जवळीक असल्याचं समोर आलं. हे गॉसिप ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता.

View this post on Instagram

Bas ,yuhi ! #finding yourself #overlookingthecity

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

एवढ्या सगळ्या चर्चा रंगूनही नुकत्याच एका मुलाखतीत पार्थ समथानने आपण सिंगल असल्याचं सांगितलं होतं. असो...पार्थ सिंगल असेल तर त्याच्या फॅनफॉलोइंगमध्ये अजून काही जणींची वाढ नक्कीच होईल. कारण अफेअर्सच्या चर्चा कितीही रंगल्या तरी पार्थवरचं फॅन्सचं प्रेम काही कमी होणार नाही. नुकतंच पार्थने त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.