Throwback: अभिनेत्री किरण खेर यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न करण्यासाठी उचलंल होतं हे पाऊल

Throwback: अभिनेत्री किरण खेर यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न करण्यासाठी उचलंल होतं हे पाऊल

काहींना आयुष्यभराचं प्रेम पहिल्याच भेटीत मिळतं तर काहींना आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात ते मिळतं. बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार असलेल्या किरण खेर यांचा आज वाढदिवस आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येकवेळी आपल्या मनमोहक हास्याने आणि सुंदर साडीतल्या लुकने मोहून टाकणाऱ्या किरण खेर यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची जोडी आज बॉलीवूडमधली सदाबहार जोडी म्हणून ओळखली जाते. पण खूप कमी लोकांना हे माहीत असेल की, हे किरण खेर आणि अनुपम खेर यांचं दुसरं लग्न होतं. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना.  

अशी झाली सुरूवात

किरण खेर यांचा जन्म आणि शालेय शिक्षण चंदीगढमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशनसुद्धा तिथूनच केलं. याच दरम्यान चंदीगढमधल्या एका थिएटर ग्रुपच्या माध्यमातून त्यांची ओळख अनुपम खेर यांच्याशी झाली. तिकडेच त्यांची मैत्री झाली आणि नाटकांच्या निमित्ताने त्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. त्यांनतर किरण या मुंबईला शिफ्ट झाल्या आणि 1979 साली त्यांनी मुंबईतील एका श्रीमंत बिजनेसमॅन गौतम बेरी यांच्याशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगा झाला. ज्याचं नाव सिकंदर ठेवण्यात आलं. पण या लग्नात सगळं आलबेल नव्हतं.

प्रेमाची कबुली

एकीकडे किरण आपल्या लग्नात खूष नव्हत्या तर दुसरीकडे अनुपम यांचंही वैवाहिक जीवन सुरळीत नव्हतं. किरण आणि अनुपम यांची त्यावेळी चांगली मैत्री होती. किरण यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मी आणि नादिरा बब्बर एका नाटकासाठी कोलकताला जात होतो. त्यावेळी अनुपमही आमच्यासोबत होते. त्यावेळी आमची नजरानजर झाली आणि तेव्हाच आम्हाला एकमेकांबद्दल क्लिक झालं. अनुपम यांनी किरण यांच्या खोलीचा दरवाज्यावर नॉक केलं आणि सांगितलं की, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अनुपम म्हणाले की, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा सगळंच बदलल्यासारखं वाटलं. आमची केमिस्ट्री अजून चांगली झाली. यानंतर मी गौतमला घटस्फोट देऊन अनुपमशी लग्न केलं.  

लग्नाची बेडी

दोघांनीही आपल्या पार्टनरला घटस्फोट देऊन 1985 साली लग्न केलं. दोघांनी गुडगावमध्ये खूपच खाजगी पद्धतीने लग्न केलं. आज हे दोघंही आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. अनुपम खेर आणि मुलगा सिकंदरकडे बघून कधीही असं जाणवत नाही की, तो त्यांचा मुलगा नाहीये. इतके हे दोघं बापलेक सहजतेने वावरतात. 

म्हणतात ना, एखाद्याला पहिल्याच वेळी आयुष्यभराचं प्रेम मिळेलंच असं नाही. कधी कधी त्यासाठी आयुष्याला दुसरी संधीही द्यावी लागते. 

हेही वाचा - 

अबब! आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन

हा विनोदी अभिनेता सनी लिओनसोबत करणार हॉरर चित्रपटात काम

फिट राहण्यासाठी करिना करते 'ही' कठीण योगासने