बॉलीवूड कलाकारांप्रमाणे त्यांची मुलंही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. बॉलीवूड सेलिब्रेटीजमध्ये सैफ आणि करिना यांचा मुलगा ‘तैमूर’विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. मात्र आता त्यांची आत्येबहीण ‘इनाया नौमी’देखील सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया खेमूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. तैमूरप्रमाणेच इनाया खेमूदेखील एक क्यूट सेलिब्रेटी किड आहे. काही दिवसांपूर्वी तिचा गायत्री मंत्र म्हणत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता इनायाचा कुणाल खेमूसोबत एका जगावेगळ्या भाषेत बोलत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुणाल आणि इनायाचा अनोखा संवाद
कुणाल खेमू आणि इनाया खेमू यांचा हा गोड संवाद कोणालाही नक्कीच आवडेल. ज्यामध्ये कुणाल त्याच्या लाडक्या लेकीसोबत एका अनोख्या भाषेत गप्पा मारत आहे. लहान मुलांसोबत आपण नेहमीच बोबड्या भाषेत बोलत असतो. मात्र कुणाल त्याच्या लेकीसोबत ही कोणती भाषा बोलत आहे हे कुणालाही समजणार नाही. मात्र कुणाल आणि इनायामात्र या भाषेत अगदी आनंदात आणि मजेत गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोहा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत तिने लिहीलं आहे की, “हे बाप लेक त्याची स्वतःचीच भाषा बोलत आहेत याची एक छोटीशी झलक ” सोहाला म्हणजेच इनायाच्या आईलाही ही भाषा समजत नाही आहे. या व्हिडीओवर सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या चाहत्यांनी छान कंमेट्स दिल्या आहेत.
कुणाल आणि सोहाची लव्हस्टोरी
कुणाल खेमू आणि सोहा अली खान 2015 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाआधी काही वर्ष ते एकमेंकांना डेट करत होते. लग्नानंतर तीन वर्षांनी ‘इनाया नौमी’चा जन्म झाला. ज्यामुळे कुणाल आणि सोहाच्या जीवनात आनंदी आनंंद निर्माण झाला. कुणाल आणि सोहा अली खानने काही चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. ‘99’ आणि ‘ढुंढते रह जाओ गे’ या चित्रपटात त्यांना एकत्र पाहण्यास मिळालं होतं. कुणालने हम हे राही प्यार के, राजा हिंदुस्थानी, जख्म अशा काही चित्रपटांमधून काम केली आहेत. त्याने केलेला रोल आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर तो थेट मुख्य भूमिकेत दिसला तो मोहित सुरीच्या ‘कलियुग’ या चित्रपटातून. या चित्रपटाने त्याला चांगली ओळख मिळवून दिली. पण त्यानंतर तो फार चांगल्या चित्रपटातून दिसला नाही. गोलमाल, टोटल धमाल अशा काही चित्रपटातून तो दिसला. त्यानंतर त्याने कलंक चित्रपटात काम केलं होतं. कलंकला बॉक्स ऑफिसवर जरी चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी कुणालमधला खलनायक चाहत्यांना नक्कीच आवडला होता. कुणालने कलंकमधून त्याच्या अभिनयातील नकारात्मक छटा दाखवून दिल्या. कुणाल लवकरच त्याच्या आगामी चित्रपट लुटकेस, गो गोवा गॉन 2, भूत पोलीस आणि मलंगमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘मलंग’ हा चित्रपट थ्रीलर रोमँटीक प्रकारातील चित्रपट आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट असून यात दिशा पटनी, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोहा आता फारशी चित्रपटातून दिसत नाही. तिने आपला सगळा वेळ इनायाच्या संगोपनासाठी दिला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
‘थ्री इडियट्स’मधला मिलीमीटर ‘या’ मराठी सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत
जयललितांच्या रुपात भरतनाट्यम करणार कंगना, पोस्टर झाले व्हायरल
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार