स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना रविवारी (8 डिसेंबर) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 28 दिवस लतादीदींवर औषधोपचार सुरू होते. दीर्घ आजारातून प्रकृती सुधारल्यानंतर लतादीदींचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये व्हिलचेअर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या शेजारी नर्स उभ्या असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. रविवारी घरी पोहोचल्यानंतर लतादीदींनी डिस्चार्ज मिळाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी निमोनिया आजारामुळे त्रस्त होत्या. लतादीदींनी डॉक्टरांचं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 11 नोव्हेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लतादीदींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
(वाचा : कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ)
लतादीदींनी सर्वांचे मानले आभार
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लतादीदींनी म्हटलं की, ‘नमस्कार, गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होते. मला निमोनिया झाला होता. आजारातून मी पूर्णतः ठीक झाल्यानंतरच घरी जावं, असं डॉक्टरांचं म्हणणं होते. आज मी घरी परतले आहे. ईश्वर, माई-बाबा यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्हा सर्वांच्या प्रेम-प्रार्थनेमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते’. तर ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘माझ्यावर औषधोपचार करणारे ब्रीच कँडीचे डॉक्टर खरंच एखाद्या देवदूताप्रमाणे आहेत. येथील कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. हे प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम असू देत’.
लतादीदींचं ट्विट :
‘नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ’.
(वाचा : ‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)
नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
दीदींच्या प्रकृतीत सुधारणा
लतादीदींच्या प्रकृतीत गेल्या आठवड्याभरापासून सुधारणा होत आहे. पण तब्येत पूर्णतः ठीक होत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर औषधोपचार सुरू ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. यासाठी गेल्या 28 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून डिस्चार्ज देण्यात आला.
(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)
लतादीदी@90
28 सप्टेंबर रोजी लतादीदींनी त्यांचा 90वा वाढदिवस साजरा केला होता. लतादीदींनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास एक हजारहून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना सन्माननीय दादासाहेब फाळके पुरस्कार, तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि कित्येक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. शिवाय, तब्बल 36 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.
हे देखील वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.