मिलिंद सोमणचे 90 च्या काळातली गाजलेले म्युझिक अल्बम्स

मिलिंद सोमणचे 90 च्या काळातली गाजलेले म्युझिक अल्बम्स

वर्ष दरवर्षी वय वाढतंय तसं हा मराठी मुलगा जास्त हॉट दिसत आहे. वय हा फक्त आकडा आहे हे त्याने सिद्ध केलंय. हो...आम्ही बोलत आहोत मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयडॉल मिलिंद सोमण (Milind Soman). 

त्याला पाहून विश्वास बसणार नाही की, त्याचा 54 वाढदिवस आहे. मिलिंद सोमण एकेकाळी तरूणींच्या गळ्यातील ताईत होता. त्याचे किलर लुक्स, त्याचं फिजीक आणि डोळे यावर मुली फिदा होत्या. आजही त्याच्या फिटनेसमुळे तरूण पिढी त्याला फॉलो करतेच. पण मिलिंदने आपल्या सौंदर्याने अनेकींना घायाळ केलं आहे आणि आजही करत आहे. त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे तो सतत चर्चेत राहिला आहे. मग ती त्याची मधू सप्रेसोबतची जाहिरात असो वा 25 वर्ष लहान अंकिता कोन्वरशी लग्न करणं असो. तर या एकेकाळच्या हॉट मॉडेल असलेल्या आणि आता फिटनेस मॉडेल असणाऱ्या मराठमोळ्या मिलिंद सोमणचा आज वाढदिवस आहे.

सोशल मीडियावर हिट मिलिंद आणि अंकिता

मिलिंद हा सोशल मीडियावर खूपच एक्टीव्ह आहे. तो सतत त्याच्या फिटनेसचे, बायको अंकितासोबतच्या हॉलीडेचे फोटो फॉलोअर्ससोबत शेअर करत असतो. मग ते हॅलोविन सेलिब्रेशन असो किंवा लेहमध्ये पोचल्यावर बायकोसोबत केलेला डान्स असो. मिलिंद आजही मेंटेन असून तितकाच हँडसम आहे. 

मिलिंद सोमण आणि म्युझिक अल्बम्स

मिलिंद सोमणचा विषय निघाला आणि त्याच्या म्युझिक अल्बमची चर्चा झाली नाही असं शक्यच नाही. मिलिंदने आपल्या म्युझिक व्हिडिओजमधील अपिअरन्सने एक काळ गाजवला आहे. 90 चा तो काळ म्युझिक अल्बम्ससाठी ओळखला जातो. च्या वाढदिवसाच्या निमित्ताने नजर टाकूया त्याने हिट केलेल्या काही म्युझिक अल्बम्सवर. मेड इन इंडिया ते रात शबनमी मिलिंद सोमणच्या या गाण्यांनी तुम्हीही व्हाल नॉस्टॅल्जिक. 

मेड इन इंडिया

मिलिंदच्या म्युझिक अल्बम्सचा विषय येताच आठवतो तो अल्बम म्हणजे मेड इन इंडिया. एकीकडे अलिशा चिनॉयचा सुंदर आवाज तर दुसरीकडे मिलिंदचे हॉट लुक्स. लाकडाच्या पेटीतून बाहेर पडणारा मिलिंद पाहताच डोळ्यांचे पारणे फिटतात. खरंच हा मेड इन इंडिया मॉडेल कमाल आहे.

रात शबनमी

अलिशाच्या अल्बममध्ये आपल्या लुक्सने तरूणींना घायाळ केल्यावर समोर येतो तो रोमँटिक मिलिंद. आशा भोसलेंच्या या गाण्यातील तरूणीही मिलिंदच्या प्रेमात पडते. सुरूवातीला त्यालाही तिच्या प्रेमाची कल्पना नसते. मात्र नंतर तोही तिच्या प्रेमात पडतोच. आशा भोसलेंचा सदाबहार आवाज आणि ती गोड जोडी प्रेक्षकांना तेव्हा खूपच आवडली होती.

इस कदर प्यार है

या सुपरमॉडेलने सोनू निगमच्या इस कदर प्यार है या गाण्यातही काम केलं होतं. बसमधून प्रवास करणारा मिलिंद आपल्यासोबतच्या सहप्रवासी मुलीला कंपनी देण्याचं ठरवतो. जी असते त्याची बालमैत्रीण. आपल्यालाही हा व्हिडिओ पाहताच सोलो ट्रीपला जाऊन असं कोणाच्या तरी प्रेमात पडावंस नक्कीच वाटेल.

आ जाने जान

या म्युझिक अल्बममध्ये मिलिंदचा एक्शन अवतार दिसला आहे. ज्यामध्ये तो आपल्या प्रेमाला गुंडाच्या तावडीतून सोडवण्यासाठी अवतरतो. हा म्युझिक व्हिडिओ आ जाने जान गाण्याचं रिमिक्स व्हर्जन होता. 

 

मग आठवला ना पुन्हा एकदा तो 90 च्या दशकातला मिलिंद मॅनिया काळ. 

#HappyBirthday टू सुपरमॉडेल मिलिंद सोमण.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.