ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
प्रेक्षकांपर्यंत न पोहचू शकलेला ‘दाह : एक मर्मस्पर्शी कथा’

प्रेक्षकांपर्यंत न पोहचू शकलेला ‘दाह : एक मर्मस्पर्शी कथा’

मराठीत एकीकडे दर्जेदार चित्रपट येत असताना अजूनही काही येणारे चित्रपट मात्र साफ निराशा करणारेच ठरत आहेत. अनेकांना वाटत असेल की, चित्रपट समीक्षा करणं म्हणजे खूपच सोपं काम आहे. फुकटात सिनेमा पाहायचा आणि मग रिव्ह्यू लिहायचा. काही प्रमाणात हे खरं असलं तरी काही सिनेमा पाहिल्यावर मेंदूला येणाऱ्या झिणझिण्या त्रासदायक ठरतात. असंच काहीसं झालं ते दाह : एक मर्मस्पर्शी कथा बघताना. हा चित्रपट पाहिल्यावर जाणवतं ते मराठी कथा अजून चांगल्या होण्यासाठी बरंच काम करण्याची गरज आहे. 

चित्रपटाची कथा

दिशा (सायली संजीव) ही डॉ साने (गिरीश ओक) आणि मिसेस साने (राधिका विद्यासागर) यांची मुलगी असून ती मेडिकलच्या फायनल वर्षाला आहे. तिचा प्रियकर समीर भोसले (सुहृद वार्डेकर) हा एक युएस रिटर्न डॉक्टर आहे. चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटातच त्यांचं एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करून त्यांचं रोमँटिक गाणंही आपल्याला पाहायला मिळतं. समीर आईवडील मि भोसले (यतीन कार्येकर) आणि मिसेस भोसले (उमा सरदेशमुख) सुद्धा या दोघांच्या नात्याने खूष आहेत. लवकरच त्यांचं लग्न करायचं असंही ठरवलं जातं. पण हे लग्न ठरण्याआधीच अडथळा म्हणून समोर येतो तो दिशाचा भूतकाळ. काय आहे हे नेमकं ट्विस्ट ज्याची थोडी कल्पना चित्रपटाच्या पहिल्या शॉटमध्येच येते.

सगळं काही एकाच कथेत देण्याच्या प्रयत्नात मात्र प्रेक्षकांपर्यंत काहीच पोचत नाही. मध्यांतरापर्यंतचा चित्रपट हा खूपच रेंगाळलेला आणि रटाळ वाटतो. मध्यांतरानंतरही सिनेमाची कथा एकाच वेळी अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करायचा प्रयत्न करते. पण कोणत्याही सामाजिक विषयावर प्रामाणिकपणे भाष्य करण्यास अयशस्वी ठरते. या चित्रपटाची लांबी, कथानक आणि ट्रीटमेंट सगळंच आऊटडेटेड वाटतं. कारण सर्वात पहिली समस्या चित्रपटाच्या विषयातच आहे. पहिली फ्रेम पाहताच कळतं की, तुमची निराशा होणार आहे.

ADVERTISEMENT

चित्रपटात घडणाऱ्या अनेक गोष्टींची उत्तरच मिळत नाहीत. जसं दिशा जेव्हा गावात जाऊन मोफत दवाखाना सुरू करते तेव्हा त्यासाठी लागणारे पैसे कुठून उभे करते किंवा अचानक तिची आई तिच्याशी वाईट का वागू लागते. दाहच्या कथेत अनेक अशा त्रुटी आहेत. ज्यामुळे यामध्ये मांडण्यात आलेले सामाजिक मुद्देही गंभीरपणे घेणं अशक्य होतं. चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबतही तसंच आहे. दिग्दर्शक मल्हार गणेश यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असून तो अगदीच निराशाजनक आहे. चित्रपटाचं संकलन आणि कथेचा वेग अगदीच मंदावलेला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्या या सिनेमात अनेक त्रुटी आहेतच.

चित्रपटात सर्व मुरलेले कलाकार असूनही हा चित्रपट उठावदार किंवा प्रभावी वाटत नाही. कारण त्यांनी चांगला अभिनय केला असला तरी चित्रपटाची कथा मुळातच भरकटलेली आहे. सायली संजीव आणि सुहृद वार्डेकर यांचीही जोडीही खास वाटत नाही. कारण सुहृदच्या वाट्याला आलेली समीरची भूमिका फारच छोटी असून ती अजून खुलवता आली असती, असं वाटत राहतं.

सायलीच्या लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’, सिनेमाचं पोस्टर लाँच

या शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे ला हा चित्रपट रिलीज होत आहे. पण तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत जाऊन हा चित्रपट पाहण्यापेक्षा इतर काही प्लॅन केल्यास जास्त चांगलं ठरेल.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

13 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT