ADVERTISEMENT
home / मनोरंजन
'गाथा नवनाथांची' मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला!

‘गाथा नवनाथांची’ मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला!

कलियुगात जेव्हा असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. नवनाथांचा महिमा आपण आतापर्यंत ऐकला आहे पण आता सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका 21 जूनपासून रोज संध्या. 6.30 वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. 

मोनालिसाचं घराचं स्वप्नं पूर्ण, आनंदाने झाली व्यक्त

नवनाथांच्या कथा दृश्य स्वरूपात

मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना  नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे. नवनाथ कथासार वाचल्याने प्रत्येक माणसाला आयुष्यात काय करू नये आणि मनुष्य जन्म कसा घालवावा याचे सार कळते. दत्तगुरू संप्रदायातील नवनाथ हे प्रसिद्ध आहेत आणि आजही त्यांनी दिलेली शिकवण पाळणारे, त्यांचा वारसा जपणारे लोक आहेत. अशाच नवनाथांच्या कथा आता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. तसंच मुलांनाही यातून चांगली शिकवण मिळणार आहे. 

गरबा नाही तर दयाबेनचा या गाण्यावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

ADVERTISEMENT

नवनाथांच्या जन्माच्याही कथा अद्भूत

नवनाथ कथासार वाचताना जाणवते की, कोणत्याही नवनाथाचा जन्म हा नैसर्गिकरित्या झालेला नाही तर प्रत्येक नवनाथाच्या जन्माची कथा ही अद्भूत आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ हे नवनाथ नवनारायणाचे अवतार समजले जातात. मच्छिंद्रनाथांचे गुरू हे दत्तगुरू असून संपूर्ण संप्रदायाला दत्तगुरूंची शिकवण मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेतून आता नवनाथांचे कथासार पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम ठेवा तर असेल पण अप्रतिम पर्वणी असेल यात शंका नाही. सध्या अनेक ड्रामा असणाऱ्या मालिकांमध्ये अशी वेगळी मालिका आणण्याचे धाडस निर्माते करत आहेत. पण प्रेक्षकांनाही ऐतिहासिक मालिका नेहमीच आवडतात. पण हा वेगळा विषय घेतल्याने निर्मात्यांचे कौतुकच करायला हवे. पुढच्या आठवड्यापासून प्रेक्षक ही मालिका पाहू शकणार आहेत. पण आता यातील कथासार आणि नवनाथांनी केलेले अद्भूत कारनामे कसे दर्शविण्यात येतील याबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. ही पौराणिक मालिका लहान मुलांनाही दाखवून आपल्या संस्कृतीतचा नक्की काय भाग आहे हे त्यांच्या पालकांना त्यांना दाखवता येईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही मालिका पाहता येणार आहे. दत्तगुरूंचा वारसा जपणारे नवनाथ लवकरच तुमच्या भेटीला येत आहेत. 

लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT