प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य

प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाला दोन महिने पण झाले नाहीत. तोच तिच्या प्रेग्नंसीबाबतच्या अफवा उठत आहेत. मागील काही दिवसांपासून प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये प्रियांकाचं कथित बेबी बंप दिसत आहे. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी मात्र तिच्या प्रेग्नंसीच्या प्रश्नांवर उत्तर देत पूर्णविराम दिला आहे.   


प्रियांकाचं बेबी बंप दिसलं या फोटोत


priyanka baby bump dress


खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा न्यूयॉर्कच्या फॅशन वीकमध्ये डिझाईनर मिशेल कोर्सने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये पोचली. त्यावेळीच हे फोटो घेण्यात आले आणि जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर आले तेव्हा लोकांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. कारण या फोटोमध्ये प्रियांकाचं वाढलेलं पोट दिसत होतं.


प्रियांकाच्या आईने केला खुलासा

या गोष्टीबाबत जेव्हा प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांना याबाबत मौन न बाळगता खुलासा केला. एका मीडिया हाऊसला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की, प्रियांकाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या खोट्या आहेत. फोटोमध्ये दिसणार वाढलेलं पोट हे कॅमेराच्या चुकीच्या अँगलमुळे दिसत आहे आणि प्रियंकाने फारच टाईट फिटींगचा स्कर्ट घातला होता. ज्यामुळे तिच्या पोटाचा भाग वर आल्यासारखा वाटतो आहे.


priyanka-chopra


या बातम्यांमुळे प्रियांकावर परिणाम
मधू चोप्रा याबाबत प्रियांकाशी फोनवर बोलल्या. त्यावेळी प्रियांकाने त्यांना सांगितलं की, त्या फॅशन वीकमध्ये ती फारच थकलेली आणि सुस्त अवस्थेत पोचली होती. जेव्हा हे फोटो घेण्यात आले तेव्हा प्रियांका फोटोसाठी तयार नव्हती. कदाचित यामुळेच असा फोटो आला असेल. तसंच ती आईला हेही म्हणाली की, तिच्या प्रेग्नंसीबाबतच्या बातम्या ऐकून ऐकून आता तिला कंटाळा आलाय. पण तिला यामुळे फरक पडत नाही की, लोकं तिच्याबद्दल काय गॉसिप करत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Valentine’s Day to you and your loved ones.. always and forever


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
नुकतंच लग्नानंतर प्रियांकाची एक हॉलीवूड फिल्म व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रिलीज झाली. या फिल्मचं नाव होतं 'Isn't It Romantic'. तर दुसरीकडे तिची आगामी बॉलीवूड फिल्म ‘द स्काय ईज पिंक’ तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम दिसणार आहेत.


priyanka and nick


प्रियांकाचा नवरा निक जोनास हा एक प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि गीतकार आहे. ज्याचं वय फक्त 25 वर्ष आहे. तो प्रियांकापेक्षा 11 वर्षाने लहान आहे. या दोघांची भेट टीव्ही शो क्वांटीकोच्या दरम्यान एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. प्रियांका आणि निकने मुंबईमध्ये 2018 च्या ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला. त्यानंतर वर्षाच्या शेवटी या दोघांनी उदयपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये थाटामाटात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा -


दीपिका पदुकोण की प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण ठरली बाॅलीवूडची सर्वात सुंदर नववधू