हो...आम्ही आता वेगळे झालोय

हो...आम्ही आता वेगळे झालोय

चित्रपट आणि टीव्ही सीरियलमधील अभिनेता राकेश बापट ( Raqesh Bapat) आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा (Ridhi Dogra) हे कपल विभक्त झालं आहे. 2011 साली या दोघांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Memoirs ♡


A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on
2013 साली या दोघांनी ‘नच बलिये’ या कपल रिएलिटी शो मध्येही भाग घेतला होता.
 

#happyholi 🌈😚


A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हे दोघंही विभक्त झाले असून दोघांनी एक जॉईंट स्टेटमेंटमध्ये ही बाब जाहीर केली आहे. गेल्या काही काळापासूनच या कपलमध्ये आलबेल नव्हतं. दोघंही वेगळे राहत होते. पण यावर त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही बोलायला तयार नव्हतं. पण आता या दोघांनीही जॉईंट स्टेटमेंट जाहीर केल्याने दुजोरा मिळाला आहे.
 

#bae ❤️


A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on
एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की, 'हो, आम्ही आता वेगळे राहत आहोत आणि आम्ही हा निर्णय आम्हा दोघांच्या आणि घरच्यांच्या सहमतीने घेतला आहे. आम्ही चांगले मित्र आहोत पण आता एक चांगले कपल नाही. आमची मैत्री कायम राहील, त्यामुळे यापुढे आमच्याबाबत कोणताही अंदाज न लावू नये आणि आम्हाला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'    

राकेश आणि रिद्धीची ओळख ही टीव्ही सीरियल ‘मर्यादा’च्या सेटवर झाली होती. या दोघांनी मर्यादा सीरियलमध्ये एक बेड सीनही केला होता आणि तेव्हापासूनच त्यांच्यातील केमिस्ट्रीची चर्चा सुरू झाली होती. नंतर त्या दोघांच प्रेम जुळलं आणि लग्नही झालं. खरंतर गेल्या वर्षीच या दोघांनी लग्नाच्या 7 व्या वाढदिवसाला शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टमध्येही त्यांनी एकमेकांतील मैत्रीवरच भर दिला होता.
मात्र या दोघांचा घटस्फोट होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
 

I wonder what I look like in your eyes... Pic- @pauldavidmartinphotography


A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on
राकेश बापट याने आपल्या बॉलीवूड करियरची सुरूवात 2001 साली आलेल्या 'तुम बिन' या चित्रपटाने केली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका छोटी असली तरी त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. तसंच हा चित्रपटही हीट झाला होता. यानंतर राकेशने आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला. राकेश हा ‘कूबूल है’, ‘मर्यादा’ आणि ‘बहू हमारी रजनीकांत’ यासारख्या हिंदी सीरियल्समध्ये झळकला होता.

राकेश गेल्या वर्षी आलेल्या 'सविता दामोदर परांजपे' या मराठी चित्रपटात दिसला होता.

तसंच तो आगामी व्हॉट्सअॅप लव या चित्रपटात अभिनेत्री अनुजा साठेबरोबर झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


हेही वाचा - 


सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा


2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट - जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले अप्रतिम


आलिया रणबीरसोबत नाही तर याच्यासोबत करणार व्हेलेंटाईन्स डे