‘चांगला नवरा होण्यासाठी काय करू’ विचारलं रणवीरने, बेबोचं मजेशीर उत्तर

‘चांगला नवरा होण्यासाठी काय करू’ विचारलं रणवीरने, बेबोचं मजेशीर उत्तर

बॉलीवूडमधील हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचं लग्न मागच्या वर्षी 2018 मध्ये सर्वात मोठा चर्चेचा विषय होता. दीपिकाबरोबर लग्न झाल्यानंतर चांगला नवरा होण्यासाठी रणवीरने कोणतीही कसर ठेवलेली नाही. मग अगदी लोकांसमोर प्रेम दर्शवायचं असलं तरीही रणवीर कधी मागे हटत नाही. दीपिकासाठी नेहमीच रणवीरचं प्रेम दिसून येतं. एका मुलाखतीमध्ये आपण सर्वात चांगला नवरा होऊन दाखवू असंही रणवीरनं म्हटलं होतं. हाच प्रयत्न त्याचा अजूनही सुरु आहे. या प्रयत्नामध्ये आता रणवीरने बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरला ‘चांगला नवरा होण्यासाठी काय करू’ असा प्रश्नही विचारला आहे. यावर बेबोने अतिशय मजेशीर उत्तर दिलं आहे.


Ranveer- Deepika relation


करीनाच्या रेडिओ शो वर विचारला प्रश्न
करीना सध्या इश्क एफएमवर वर एक रेडिओ शो करत आहे. ज्या शो चं नाव आहे 'व्हॉट वुमन वॉन्ट'. या शो ची करीना होस्ट असून ती वेगवेगळ्या प्रश्नांना अर्थातच तिच्या स्टाईलमध्ये उत्तर देत असते. वेगवेगळ्या मुद्द्यावर सेलिब्रिटीदेखील करीनाशी रेडिओ शो वर बोलतात आणि करीना या प्रश्नांना नेहमीच वेगळी आणि मजेशीर उत्तरं देत असते. याच शो वर रणवीरनेदेखील करीनाला फोन करून ‘चांगला नवरा होण्यासाठी काय करू’ यावर टीप्स मागितली. रणवीर म्हणाला ‘हाय करीना, मलासुद्धा तुला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं नुकतंच लग्न झालं आहे. त्यामुळे टॉप हजबंड (चांगला नवरा) होण्यासाठी मला काही टीप्स देशील का?’ रणवीर आणि करीनादरम्यान झालेल्या या मजेशीर गप्पांना ट्विटरवरदेखील चाहत्यांनी शेअर केलं आहे.


Ranveer- Deepika relation1


करीनाने दिलं मजेशीर उत्तर
दीपिकासाठी रणवीर सिंहचं प्रेम तर जगजाहीर आहे, त्यामुळे करीनालासुद्धा याची कल्पना आहे. त्यामुळे बेबो अर्थात करीनाने रणवीरला त्याच्या या प्रश्नावर उत्तर दिलं, ‘रणवीर तू दीपिकावर किती प्रेम करतोस हे संपूर्ण जगाला माहीत आहे. तुला कोणत्याही टीप्सची गरज नाही. तू दीपिकावर तुझं जे प्रेम दर्शवतोस, ते सर्वांनाच फार आवडतं. पण तरीही तुला टीप्स हव्याच असतील तर एक मॅजिकल सिक्रेट नक्की सांगते की, लग्न निभावण्यासाठी एकमेकांना स्पेस देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गोष्टी सहज आणि सोप्या होतात आणि तुम्हाला काही करण्याची गरज नाही.’ खरं तर करीनाला मानावं लागेल. करीनाने रणवीरला एकदम कमालीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता करीनाने दिलेला सल्ला रणवीर किती पाळणार हे पाहावं लागेल. पण तसं पाहायला गेलं तर रणवीर आणि दीपिका एकमेकांना व्यवस्थित स्पेस देत असावेत असं त्यांच्याकडे पाहून नेहमीच वाटतं. शिवाय दीपवीरची जोडी ही सर्वच प्रेक्षकांना भावते.चित्रीकरणादरम्यान करीनाचे बेबी बंप दिसले


kareena with baby bump1
सध्या करीना कपूर खान आपल्या आगामी ‘गुड न्यूज’ या अक्षयकुमारबरोबरच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अक्षयकुमारने आपल्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. काही दिवसापूर्वीच करीना कपूरचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसले होते. त्यामुळे ती या चित्रपटामध्येही एक आईची भूमिका करणार असल्याचं कळून येत आहे.


kareena with baby bump


फोटो सौजन्य -  Instagram


हेदेखील वाचा 


पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण


चित्रपटांशिवाय अनुष्का शर्माने आता सुरू केलंय 'हे' काम


प्रनूतनच्या ‘नोटबुक’ चित्रपटातील पहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित