बॉलिवूडला रामराम करत धर्माची कास धरलेली सना खान तिच्या लग्नामुळे प्रकाशझोतात आली होती. अनस सईदसोबत लग्न करुन तिने आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली आहे. पण भूतकाळातील काही गोष्टी तिचा पाठ सोडायला तयार नाहीत. तिच्या झालेल्या चुका पुन्हा दाखवून देत तिला दुखावण्याचा प्रयत्न केल्यामुळे सना खान खूपच नाराज झालेली दिसत आहे. सना खानने लग्नाच्या दोनच महिन्यानंतर ही पोस्ट शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. वेळ थांबवून झालेल्या चुका दुरुस्त करता आल्या असत्या तर नक्की केल्या असता पण वेळ हातात नसते असे म्हणत तिने आपले दु:ख व्यक्त केले आहे.
कपिल शर्मा होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांसोबत स्वतः शेअर केली गुड न्यूज
काय म्हणाली सना खान
सना खानने बॉलिवूड जरी सोडले असले तरी देखील ती तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे कायम चर्चेत असते. तिच्या धर्माविषयी अनेक गोष्टी ती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते. तिने लग्न केल्यापासून वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ आणि पोस्ट ती करते. पण तिने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे तिचे काहीतरी बिनसले हे कळून येत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने तिच्या भूतकाळाशी निगडीत काही लोकांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ती म्हणते की, काही लोकं माझ्याबद्दल अत्यंत वाईट व्हिडिओ करत आहेत. माझ्याबद्दल असे काही बोलत आहेत हे कळूनसुद्धा मी शांत आहे. पण जे हे करत आहेत ते एक पाप आहे हे यांना कळत नाही का? खरंच मला याचं दु:ख आहे असे म्हणत तिने ही पोस्ट केली आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स
गुपचूप केले लग्न
सना खानच्या लग्नाचे फोटो आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने सनाचा निकाह पार पडला. सुरतच्या अनस सईद या बिझनेसमनसोबत तिने निकाह केल्याचा धक्का अनेकांना बसला होता. पण धर्माच्या मार्गावर निघालेली सना निकाह करेल अशी कोणाला अपेक्षाही नसताना तिचा विवाहसोहळा गपचूप पार पडला. तिच्या या लग्नामुळे अनेकांना आनंदही झाला आणि अनेकांना धक्काही बसला.
मेलविन लुईससोबत वाद
धर्माच्या मार्गावर जाण्याआधी सना खान आणि मेलविन लुईस यांचे प्रेम होते. त्यांनी अनेक व्हिडिओ एकत्र केले आहेत. मेलविन लुईस हा एक कोरिओग्राफर असून त्यांची लव्हस्टोरी ही सगळ्यांना माहीत होती. घरातल्यांच्या विरोधात जाऊन सनाने मेलविनसोबत नाते ठेवले होते. पण त्यांनी हे नाते जितके उघड ठेवले होते. तसाच उघड उघड त्यांचा ब्रेकअपही झाला होता. मेलविनने फसवणूक केली असा आरोप करत सनाने त्याच्यासोबत ब्रेकअप केला होता. इतकेच नाही तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप केले होते. सनाने कितीतरी वेळा व्हिडिओ करुन अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. पण तरीदेखील हा वाद काही मिटताना दिसत नाही. दिवसेंदिवस हा वाद अधिकच वाढताना दिसत आहे. आता हा वाद मिटवण्याच्या पद्धती सनाकडून अत्यंत शांत आणि संयमी दिसत आहे.
मेलविन- सना ब्रेकअप होऊन मार्ग वेगळा झाला असला तरी देखी अजून या दोघांचे नाते तितकेसे चांगले झालेले नक्कीच दिसत नाही.
Bigg Boss 14 – पवित्रा आणि एजाज लवकरच देणार Good News