ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सोनाली कुलकर्णी या डान्स शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

सोनाली कुलकर्णी या डान्स शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

मराठी टेलिव्हिनजवर नेहमीच चाहत्यांसाठी सतत काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी सुरू असते. कधी दर्जेदार मालिका तर कधी ओढ लावणारा रिअॅलिटी शो ज्यामुळे प्रेक्षक सतत टिव्ही समोर खिळलेले असतात. झी युवा या वाहिनीवर लवकरच एक नवा आणि अफलातून मनोरंजनाचा खजिना पुरवणारा शो सुरू होत आहे. या वाहिनीवर 11 डिसेंबर पासून ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी चेहरे स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. लोकसंगीत आणि मॉडर्न डान्सफॉर्म अशा दोन्ही प्रकारातील नृत्य स्पर्धक या स्पर्धेतून सादर करणार आहेत.दिग्गज सेलिब्रेटीजमुळे या स्पर्धेत युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठीची स्पर्धा नक्कीच अटीतटीची असणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहे. सोनाली या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असल्यामुळे आता तिच्या चाहत्यांना ती दररोज या शोच्या माध्यमातून भेटणार आहे.  

अधिक वाचा – ( टीव्हीवरील स्टार्स… पण प्रत्यक्ष आयुष्यात राहिली प्रेमकहाणी अपूर्ण )

डान्स शोमध्ये या गोष्टी असणार खास

नृत्यकौशल्यात पारंगत सोनालीसोबत मंचावर या खास नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील. या शिवाय एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असलेला अष्टपैलू कलाकार, अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. यासोबतच सोनालीसोबत असलेल्या आणखी एका परीक्षकाची ओळख अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. सेलेब्रिटी नर्तिका आणि सेलिब्रेटी चेहरे ही मेजवानी प्रेक्षकांसाठी बहारदार ठरणार हे मात्र निश्चित. याशिवाय या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामुळे हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उतरणार आहेत. 

अधिक वाचा (राखी सावंत आहे करोडपती, मेहनत करून मिळवली आहे इतकी धनसंपत्ती)

ADVERTISEMENT

सोनालीचा हिरकणीतील अभिनय ठरला हिट

सोनालीचा हिरकणी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यात सोनाली कुलकर्णीने साकारलेली ही हिरकणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली होती. ज्यामुळे अप्सरानंतर पुन्हा एकदा सोनालीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. या चित्रपटासाठी रायगडावर केलेलं शूट, तिथले अनुभव सोनालीने POPxo ला दिलेल्या एका खास मुलाखतीत प्रेक्षकांसोबत शेअर केले होते. विशेष म्हणजे हिरकणी साकारण्यासाठी तिने अगदी वर्षभर पार्लरमध्ये जाणंही टाळलं होतं. आता या डान्स शोमधून सोनालीला परिक्षकाच्या भूमिकेत पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. ज्यात तिच्या  सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

मृत्यूवर मात करत रिकव्हर होतेय ‘ही’ अभिनेत्री, व्हेंटिलेटरवर होती चार दिवस

जागतिक प्रसाधन दिनानिमित्त भारतात महिलांसाठी पहिली पावडर रूम

ADVERTISEMENT
25 Nov 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT