भारतामध्ये MeToo चळवळ उभारणारी माजी मिस इंडिया आणि बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहेत. या चळवळीमध्ये बॉलीवूडची अशी बरीच मोठी नावं पुढे आली ज्यांच्याकडून अशा तऱ्हेच्या वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. तनुश्रीने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यासारख्या दिग्गजांवर ‘हॉर्न ओके’ च्या सेटवर आपल्यावर विनयभंग झाल्याचा आरोप लावला. ही सगळी चळवळ सुरु करून तनुश्री न्यूजर्सीला परत निघून गेली. पण तरीही तिचं हे आंदोलन अजून थांबलेलं नाही. हा विषय तनुश्रीने खूपच गंभीररितीने घेतला आहे त्यामुळे हा विषय तनुश्री आता एका शॉर्टफिल्मद्वारे दाखवून बॉलीवूडमधील सत्य बाहेर आणणार आहे. तनुश्रीने अतिशय गंभीर आरोप लावले आणि ती एकदाही यातून मागे आली नाही. तिने या सर्वाविरोधात कायम आपली बाजू धरून ठेवली. आता पुन्हा ती या शॉर्टफिल्मद्वारे वाचा फोडणार आहे.
महिला दिनाच्या दिवशी होणार प्रदर्शित
तनुश्रीने MeToo स्टोरीजवर एक शॉर्टफिल्म बनवली असून या फिल्मचं नाव इन्स्पिरेशन असं आहे. या चित्रपटामध्ये तनुश्री स्वतः काम करणार आहे. या चित्रपटातून खरं तर 9 वर्षांनंतर तनुश्री पुन्हा एकदा अभिनय करून परत येत आहे. तनुश्री या चित्रपटात केवळ अभिनयच करत नाहीये तर तिने या चित्रपटाची कथा आणि संवाददेखील लिहिले आहेत. तिच्या मते या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधील ही काळी बाजूदेखील प्रेक्षकांच्या समोर यायला हवी. ही बाजू दाखवून देणंही गरजेचं आहे. महिला दिन हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी योग्य दिवस असेल. संपूर्ण महिलांसाठी हा चित्रपट असेल. बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवायचं असेल तर ही काळी बाजूदेखील माहीत असायला हवी या दृष्टीकोनातूनच तनुश्री हा चित्रपट काढत असल्याचं सध्या म्हटलं जात आहे.
या चित्रपटात बॉलीवूडची काळी बाजू दाखवणार
तनुश्रीने या चित्रपटामध्ये बॉलीवूडमध्ये येणाऱ्या नव्या मुलींना कशा प्रकारे एक्स्पाईट केलं जातं हे दर्शवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. तर या चित्रपटामध्ये बॉलीवूडची काळीदेखील तनुश्री दाखवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तनुश्रीने महिला दिन अर्थात ८ मार्च 2019 निश्चित केली आहे. तनुश्रीने स्वतः बरंच काही सहन केल्याचं आतापर्यंत सांगितलं आहे. आता हेच ती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून बॉलीवूडमध्ये नव्याने येणाऱ्या मुलींना या दुनियेची काळी बाजू नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवं.
तनुश्रीने लावले आरोप
काही महिन्यांपूर्वीच तनुश्रीने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्यावर आरोप लावले. त्यानंतर बरेच दिवस या विषयावर चर्चा चालू होती. मग या कॅम्पेनमुळे अनेक वेगवेगळी नावं बाहेर आली आणि अनेक अशा मुलींना आवाज उठवला ज्यांनी इतके वर्ष हा अन्याय सहन केला होता. यामध्ये आलोक नाथ, विकास बहल, साजिद खान अशी अनेक नावं गुंतल्याचं समजलं. बऱ्याच लोकांचा खरा चेहरा समोर आला. अजूनही यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरीही सध्या या कलाकारांबरोबर कोणीही काम करायला पुढे धजावत नाही. नाना पाटेकर आणि साजिद खानला या सगळ्या प्रकरणामुळे ‘हाऊसफुल 4’ मधून बाहेर पडावं लागलं होतं.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा
निक जोनाससोबत पिग्गी चॉप्स आली भारतात,शेअर केला फोटो
कार्तिक- क्रितीच्या ‘लिव्ह ईन रिलेशन’वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
जेव्हा होणाऱ्या सूनेसोबत सासू-सासऱ्यांनीही धरला ठेका