रेडीमिक्स मधील वैभव आणि प्रार्थनाचं 'का मन हे' रोमॅंटिक गाणं प्रदर्शित

रेडीमिक्स मधील वैभव आणि प्रार्थनाचं 'का मन हे' रोमॅंटिक गाणं प्रदर्शित

फेब्रुवारी महिन्यात सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहत असतात. ‘व्हॅलेटाईन डे’ निमित्त प्रेम व्यक्त करण्याची खास संधीच तरुणांना मिळत असते. यंदा फेब्रुवारीमध्ये रेडीमिक्स हा प्रेमपट प्रदर्शित होत आहे. रेडीमिक्स चित्रपटातील ‘का मन हे’ रोमॅंटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे या गाण्यासोबतच आता प्रेम व्यक्त करण्याला उधाण येणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही सुपरहीट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना पाहता येणार आहे. 'का मन हे' गाणं आर्या आंबेकर आणि फर्हाद भिवंडीवाला यांनी गायलं आहे. अविनाश - विश्वनाथ या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे. अश्विनी शेंडे या गाण्याची गीतकार आहे. 'का मन हे' गाण्यातील वैभव आणि प्रार्थना चा हा रोमॅंटिक अंदाज अनेकांचं मन मोहरुन टाकत आहे.


 


 

Subscribe to POPxoTV

फेब्रुवारी महिन्यात रेडीमिक्स होणार प्रदर्शित


प्रेमावर आधारित या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट आठ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. रेडीमिक्स चित्रपट लव्ह टॅंगलवर आधारित  आहे. खंरतर प्रेम ही एक असामान्य गोष्ट आहे. मात्र असं असूनही प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेम मिळतंच असं नाही. प्रेमाच्या भावनेला अव्यक्त असे अनेक कंगोरे असतात. त्यामुळे प्रत्येक चित्रपटातून प्रेम हे निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त केलं जातं. अर्थातच प्रेमाच्या या तरल भावनेतून निर्माण झालेली भावनिक गुंतागुत या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैभव, प्रार्थना आणि नेहाने साकारलेल्या भूमिकांमधून प्रेमाचा एक नवा रंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रेडीमिक्स चित्रपटाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केलं आहे तर अमेय खोपकर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं. 

Subscribe to POPxoTV

 


वैभव आणि प्रार्थनाचा अनोखा अंदाज


वैभव तत्ववादी  आणि प्रार्थना बेहेरे या जोडीने आतापर्यंत अनेक हीट रोमॅंटीक चित्रपट केले आहेत. कॉफी आणि बरंच काही , मि.अॅंड मिसेस. सदाचारी, व्हॉटस्अॅप लग्न या चित्रपटातून या दोघांना आपण एकत्र पाहिले आहे. रेडिमिक्स मध्येदेखील पुन्हा आता या जोडीचा एक नवा अंदाज असण्याची शक्यता आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

'रेडीमिक्स'च्या निर्मितीसाठी अनुभवाची पराकाष्टा! निर्माते प्रशांत घैसास, निर्माते सुनील वसंत भोसले अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत, ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शितनवा चित्रपट ‘रेडीमिक्स’ येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवाचीही एक सुरस कथा सांगताहेत निर्माते प्रशांत घैसास आणि 'चोखंदळ' निर्मितीसाठी अल्पावधीत परिचयाचे झालेले निर्मातेसुनील वसंत भोसले. ‘रेडीमिक्स’ हे या दोन प्रतिथयश निर्मात्यांच्या अनुभवांचं गाठोडं म्हणता येईल. या चित्रपटासाठी त्यांनी थेट अमेय विनोद खोपकरांना प्रस्तुतीचा मान देऊन अर्धी लढाई जिंकली आहे. अमेय खोपकरांच्या पसंतीला उतरलेला ‘रेडीमिक्स’ तरुणाईलाही आपलासा वाटावा यासाठी या चित्रपटचं अफलातून पब्लिसिटी डिझाइन्स सचिन गुरव करीत आहेत. तर सोशल मीडियाचं ऑरगॅनिक पब्लिसिटी कॅम्पेन समीर भोसले यांच्या संकल्पनेतून राबविले जात आहे. चित्रपटाच्या निर्मितीत तरुण पिढी आघाडीवर असून आजच्या तरुण पिढीचं भावविश्व हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी, सुनील तावडे,आनंद इंगळे, नेहा शितोळे इत्यादी कलाकारांनी मांडले आहे. डीओपी संदिप पाटील, गीतकार गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार, संगीतकार अविनाश–विश्वजित, गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा,फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी, कोरिओग्राफर दिपाली विचारे, संकलक संतोष गोठस्कर, कार्यकारी निर्माता प्रवीण वानखेडे मातब्बर कलावंत - तंत्रज्ञ ‘रेडीमिक्स’ देणार असतील तर प्रेक्षक आनंदाने तो स्वीकारणारच. #redimix #ameykhopkar #vaibhavtatwawadi #prathanabehere @vaibhav.tatwawaadi @prathana1812


A post shared by Cine Marathi (@cinemarathiofficial) on

फेब्रुवारीत वाहणार प्रेमाचे वारे


फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे या काळात प्रेमावर आधारित अनेक चित्रपट निर्माण होत असतात. कॉलेज जीवन आणि प्रेम याचांदेखील घनिष्ठ संबंध  आहे.कॉलेज डायरी,युथट्यूब आणि प्रेमवारी हे तरुणांच्या जीवनावर आणि प्रेमकथेवर आधारित चित्रपटदेखील फेब्रुवारीत प्रदर्शित होत आहेत. त्यासोबतच आता रेडीमिक्स चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याने चार प्रेमपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.


FI readymix


अधिक वाचा


‘ती & ती’ चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता


फोटोसौैजन्य- इन्स्टाग्राम