शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं

शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं

शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणंशाहरूख खान सध्या आपल्या करिअरमध्ये खूपच चढउतार बघत आहे. शाहरूख खानने गेल्या तीन वर्षात एकही हिट चित्रपट दिलेला नाही. गेल्या वर्षी आलेला ‘झिरो’देखील बॉक्स ऑफिसवर झिरो ठरला. तर दुसरीकडे अक्षय कुमार आपल्या फिल्मी करिअरमध्ये बॅक टू बॅक चित्रपट देत आहे. आतापर्यंत इतक्या वर्षात अक्षय कुमार आणि शाहरूख खानने बेबीमध्ये अक्षय कुमारबरोबर स्पेशल अपिरियन्स गाण्यात दिला होता. तर अक्षयकुमारनेदेखील ओम शांती ओम या चित्रपटामध्ये शाहरूख खानबरोबर स्पेशल अपिरियन्स दिला. पण त्यानंतर एकदाही हे दोघे कलाकार एकत्र कोणत्याही चित्रपटामध्ये काम करताना दिसले नाहीत. पण या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नक्कीच त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याविषयीच एका मुलाखतीमध्ये शाहरूखला प्रश्न विचारला असता शाहरूखने आपली अडचण सांगितली. आपल्याला अक्षयकुमारबरोबर नक्कीच काम करायला आवडेल पण अक्षयबरोबर काम करायचं म्हणजे सर्वात मोठी अडचण आहे ती ‘टायमिंग’ची, असं शाहरूखने स्पष्ट केलं.


शाहरूख आणि अक्षय कुमारमध्ये आहे टायमिंगची अडचण


अक्षयकुमार वेळ किती पाळतो याची सर्वांनाच कल्पना आहे. अक्षयच्या दिवसाची सुरुवात खूपच लवकर होते आणि चित्रीकरणालाही अक्षय वेळेवर येतो आणि वेळेवर संध्याकाळी घरी जातो. याविरुद्ध शाहरूख लेट नाईट अर्थात रात्रभर काम करू शकतो. शाहरूखच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा शाहरूख घरी येतो तेव्हा अक्षय झोपेतून उठतो आणि कामाला लागतो. अक्षय त्यामुळे जास्त काम करू शकतो. तर शाहरूखला रात्रीच्या शिफ्टमध्ये चित्रीकरण करणं जास्त सोपं जातं. त्यामुळेच अक्षयकुमारबरोबर त्याचं टायमिंग जुळत नाही असं शाहरूखने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर अक्षय रविवारी सुट्टी घेतो आणि दिवसभर अगदी त्याच्या शेड्युलप्रमाणचे काम करतो. तर शाहरूख हा कामाच्या बाबतीत अतिशय ढिसाळ आहे. शाहरूखला सेटवर यायलादेखील खूपवेळा उशीर होतो. त्यामुळे अक्षय कुमारबरोबर काम करण्यासाठी स्वतःला शिस्त असणं खूपच गरजेचं आहे. जे शाहरूखला करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहणं शक्य होत नाहीये.


Untitled design %286%29


अक्षयकुमार कमालीचा व्यग्र


अक्षय कुमारचे या वर्षामध्ये पाच चित्रपट प्रदर्शित होणार असून केसरी, गुड न्यूज, मिशन मंगल, हाऊसफुल 4, सूर्यवंशी अशी या चित्रपटांची नावं आहेत. आठ वर्षानंतर पुन्हा एकदा अक्षयकुमार ‘गुड न्यूज’मध्ये करिना कपूरबरोबर काम करत आहे. तर सध्या रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामा सूर्यवंशीचं चित्रीकरण अक्षयकुमार करत आहे. यानंतर ऐतिहासिक चित्रपट पृथ्वीराज चौहानच्या चित्रीकरणाला अक्षयकुमार सुरुवात करणार आहे. अक्षयकुमार दरवर्षी अनेक चित्रपट करतो त्यापैकी दोन ते तीन चित्रपट हे हिट ठरतातच. 


good news


शाहरूख खान सध्या करिअरवर करत आहे विचार


शाहरूख खानच्या करिअरविषयी सांगायचं तर मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला झिरो बॉक्सऑफिसवर कमालीचा आपटला. त्यानंतर शाहरूख आता आपल्या करिअरविषयी खूपच सजग झाला असून त्याला आता कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. दरम्यान राकेश शर्माच्या बायोपिकमधून शाहरूखने माघार घेतली आहे. आपलं करिअर पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्याच्या प्रयत्नात सध्या शाहरूख आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र


भाई व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धातील 'नाच रे मोरा' गाणं प्रदर्शित


दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका